आदर्श गाव योजना महाराष्ट्र 2023 | Adarsh Gaon Yojana Maharashtra

मित्रांना शेअर करा:

Adarsh Gaon Yojana Maharashtra: आदर्श गाव योजना सरकारच्या नेतृत्वाखालील एक महत्त्वाची आणि विकासात्मक स्वरूपाची योजना आहे. या योजनेचा उद्देश गृहनिर्माण, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी या सोबतच मूलभूत सुविधा ग्रामीण भागातील व्यक्तींना, तसेच गावांना उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे असे आहे.

ग्रामीण भागातील अडचणींना दूर करणे तसेच गरिबी, बेरोजगारी, आणि मूलभूत सुविधा यांचे निराकरण करणे, हे या योजनेचे उद्देश आहे. ग्रामीण भागात या उपक्रमाची अंमलबजावणी स्थानिक सरकार, विविध सहकारी संस्था, ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्य करणारया संस्था यांच्या सहकार्याने राबवली जाते. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे आणि गावाचा विकास करणे हे आदर्श गाव योजनेचे अंतिम ध्येय आहे.

Adarsh Gaon Yojana Maharashtra

Adarsh Gaon Yojana Maharashtra 2023 in Marathi

योजनेचे नाव आदर्श गाव योजना महाराष्ट्र
सुरुवात11 ऑक्टोंबर, 2014 (केंद्र सरकार)
महाराष्ट्रात सुरुवात 1992 साली (थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रेरणेतून)
संकल्पना लोक सहभागातून ग्रामविकास व लोकाभिमुख कार्यक्रमात शासनाचा सहभाग.
उद्देश गावाचा सर्वांगीण विकास करणे.
कार्य रस्ते, शिक्षण, दवाखाने, रोजगार संधी आणि स्वच्छता सोबतच पाणीपुरवठा अशी वेगवेगळी कामे.

आदर्श गाव योजना ही मुळात गावाचा विकास करण्यासाठी सादर करण्यात आली, या योजने मागील उद्देश हा स्पष्ट आहे ज्या गावांमध्ये सुविधा नाहीत अथवा सुविधांचा अभाव आहे; अशा गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आणि ग्रामीण जनतेचे एक प्रकारे जीवनमान सुधारणे. आदर्श गाव योजना मुळात 11 ऑक्टोंबर, 2014 पासून सुरू करण्यात आली जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवसा निमित्त भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरुवात केली. या योजनेचे मूळ नाव संसद आदर्श ग्राम योजना असे आहे महाराष्ट्रात याच योजनेला आदर्श गाव योजना असं म्हणतात.

आदर्श गाव योजना ही महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने सुरु झाली आहे, महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं “खेड्यांकडे चला!” मग त्याच आधारावर गावांचा विकास करणे हे या योजनेचे मूळ आहे. आजच्या या आर्टिकल मध्ये आपण आदर्श गाव योजना महाराष्ट्र बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

आदर्श गाव योजना नेमकी काय आहे? (Adarsh Gaon Yojana Maharashtra)

आदर्श गाव म्हणजे ज्या गावांमध्ये लोक विज्ञानवादी आहेत आणि विकासाच्या वाटेवर आहेत कोणताही व्यक्ती बेरोजगार नाही अशा गावाला आदर्श गाव म्हटलं जात.

आदर्श गाव योजना काय आहे? या योजनेद्वारे ग्रामीण भागातील विविध गावांचा विकास कसा घडवला जातो? आणि याचा मूळ उद्देश काय आहे? गावांचा विकास करण्यासाठी ही योजना मुळात बनवली गेली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम आदर्श गाव योजना थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन यांच्या प्रेरणेतून 1992 साली सुरू झाली.

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पहिले आदर्श गाव घडले ते म्हणजे, आपल्या सर्वांच्या परिचयाचे हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील छोटेसे गाव. पोपटराव पवार या विज्ञानवादी आणि आधुनिक माणसाने घडवलेले हे गाव आजच्या घडीला आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. पूर्वी या गावाची स्थिती ही खूप दयनीय होती, दुष्काळी भाग असल्यामुळे या गावांमध्ये शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध नव्हतं. तरीही या सर्व संकटावर मात करत या गावाने आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून आपले गाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडात नावारूपास आणलं.

हिवरे बाजार आदर्श गाव का ठरलं यामागे सर्वात मोठा हात, या गावातील सरपंच पोपटराव पवार यांचा आहे. या गावात पूर्वी नागरिकांची स्थिती अतिशय खराब होती रोजगार नव्हता तरुण बेरोजगार होते, परंतु पोपटराव पवार यांच्या दूरदृष्टीने आणि कार्यक्षम कार्यप्रणालीमुळे आज हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. फक्त पंधराशे लोकसंख्या असणारे हे गाव 95 टक्के साक्षर आहे. पोपटरावांनी आदर्श गाव योजनेचा वापर करून त्याचा फायदा घेऊन आपल्या गावाला आदर्श गाव बनवलं, त्यामुळे आता तुम्हाला देखील कळलं असेल की आदर्श गाव योजना ही गावांच्या विकासासाठी आर्थिक मदत देखील करते.

Adarsh Gaon Yojana Maharashtra वैशिष्ट्ये (features)

  • ग्रामीण भागातील कुटुंबांना गरिबीपासून बाहेर काढण्यासाठी मदत करते
  • आरोग्य विषयक वेगवेगळी शिबिरे गावात घेतले जातात
  • नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या योजनेद्वारे सभा भरवल्या जातात
  • गाव स्वच्छ आणि सुंदर बनवला जातो
  • गावचा पाणी प्रश्न मिटवला जातो पाणी जपून वापरण्यासाठी माहिती दिली जाते
  • गावामध्ये मूलभूत गोष्टी पुरवले जातात
  • शिक्षण शेती गृह उद्योग नोकरी उद्योग धंदा इत्यादी बाबत मार्गदर्शन केलं जातं
  • गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी या योजनेद्वारे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात
गावातील ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आणि मूलभूत स्वरूपाच्या आहेत, त्या सर्व गोष्टी या योजनेद्वारे राबवल्या आणि केल्या जातात. सोबतच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण केली जाते, आणि सार्वजनिक शौचालय अशा विविध बाबींवर भर दिला जातो.

आदर्श गाव योजना ही गावासाठी जे कामे करते ते सर्व कामे ही ग्रामपंचायत द्वारे केली जातात, म्हणजे या योजनेद्वारे ग्रामपंचायतीला सढळ हाताने आर्थिक मदत केली जाते. साधारणपणे ही योजनेसाठी पाच गावांना प्राधान्य दिले जाते, पाच वर्षांमध्ये शंभर गावे निवडले जातात आणि यातून 25 गावांचा प्रस्ताव हा विभागाकडे जलसंधारणासाठी दिला जातो, प्रत्येक गोष्टीचे नियोजन हे जिल्ह्याच्या कलेक्टर द्वारे केले जाते.

शहरी भागाप्रमाणे गावांमध्ये देखील प्रत्येक सोयीसुविधा असाव्यात, मूलभूत बाबींचा अभाव असू नये हे या आदर्श गाव योजनेद्वारे केले जाते. रस्ते, शिक्षण, दवाखाने, रोजगार संधी आणि स्वच्छता सोबतच पाणीपुरवठा अशा वेगवेगळ्या योजना या आदर्श गाव योजनेचे अंतर्गत आहेत.

Adarsh Gaon Yojana Maharashtra अर्ज प्रक्रिया (application)

आदर्श गाव योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाद्वारे कोणतीही ऑनलाईन अर्ज Adarsh Gaon Yojana Maharashtra online apply प्रक्रिया सांगितली नाही, आदर्श गाव योजनेत सामील होण्यासाठी अर्ज प्रक्रिया हि केवळAdarsh Gaon Yojana Maharashtra ofline apply स्वरुपात केली जाऊ शकते. ऑफलाईन माध्यमाने आदर्श गाव योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण जाणून घेऊ.

आदर्श गाव योजनेत समावेश होण्यासाठी इच्छुक गावाने ग्रामसभा बोलावून ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा. अर्ज सादर केल्या नंतर आवश्यक कागदपत्रे कर्मचाऱ्यांकडून सुपूर्द करावे लागतात, कागदपत्रे दिल्यावर कृषी अधिकारी कलेक्टर च्या परवानगीने तुमच्या गावाला आदर्श गाव योजने साठी निवडले जाऊ शकते.

Adarsh Gaon Yojana Maharashtra निवड प्रक्रिया

ग्राम सभेने शिफारस केलेल्या गावाची मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील जिल्हास्तरीय समिती मार्फत शिफारस करण्यात येते. गावाच्या निवडीस अंतीम मान्यता राज्यस्तरीय कार्यकारी समियी देते. राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष (कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना) हे श्री. पोपट राव पवार असुन सदस्य सचीव हे संचालक मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे आहेत.

Adarsh Gaon Yojana Maharashtra कागदपत्रे (document)

  • ग्राम सभेची चित्रफीत (व्हिडिओ)
  • ग्रामसभेद्वारे गाव निवडीचा ठराव.
  • संस्था निवडीचा ठराव.
  • सरपंच आणि ग्रामसेवक यांचे लेखी विहित नमुन्यातील अर्ज (स्वाक्षरी सोबत)
  • सप्तसुत्री अंमलबजावणीचा ठराव.
  • आदर्श गाव ग्राम समितीची निवड.
  • ग्राम कार्यकर्ता  निवडीचा ठराव ( ग्राम कार्यकर्ता हा संस्थेशी संबंंधीत नसावा)
  • ग्राम विकास निधी उभारणे बाबत ठराव.
  • आवश्यक प्रमाण पत्र-
  • ग्रामपंचायतीचे लोक संख्या प्रमाणपत्र
  • सिंचन क्षेत्र व महसुली क्षेत्र बाबत तलाठ्याचे प्रमाणपत्र
  • विविध अभियानात मिळालेले पुरस्कार प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • कृषी विभागाचे पाणलोट विकास कामास 50 टक्के पेक्षा जास्त वाव असल्याचे प्रमाणपत्र
  • मजुराबाबत चे प्रमाणपत्र
  • पाणी टंचाई बाबत प्रमाणपत्र

Adarsh Gaon Yojana Maharashtra FAQ’s

Q : आदर्श गाव योजना कोणी सुरु केली?

Ans : सर्वप्रथम आदर्श गाव योजना 1992 साली महाराष्ट्र शासनाने सुरु केली होती, आता 2014 साली केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी आदर्श ग्राम योजना सुरु केली आहे.

Q : हिवरे बाजार गाव आदर्श गाव कसे बनले?

Ans : हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी आदर्श गाव योजनेला गावात राबवले, त्यामुळेच हिवरे बाजार गाव आदर्श गाव बनले.

Q : आदर्श गाव योजनेचा उद्देश काय आहे?

Ans : गावाचा सर्वांगीण विकास करणे.

हे पण वाचा:

आदर्श गाव कस असाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा..

मित्रांनो आदर्श गाव योजना संबंधी आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा, आणि इतरांना ही माहिती नक्की कळवा. इतपर्यंत तुम्ही लेख वाचला या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद!

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *