Agri Assistant Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो! Agrobharti मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे, आज आपण कृषी सहाय्यक भरती महाराष्ट्र 2023 बद्दल माहिती घेणार आहोत.
Agri Assistant Recruitment 2023 Maharashtra
कृषी विभागात कृषी सहाय्यक पदांची भरती होणार आहे; तब्बल 2,115 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासंबंधीचा GR शासन निर्णय लवकरच राज्य सरकार काढणार आहे मुळात कृषी सहाय्यक पद ही शासकीय आहे, म्हणजेच कृषी सहाय्यक पदावरील व्यक्ती राज्य सरकारच्या कृषी विभागात काम करणार आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांना ही एक मोठी संधी आहे.
पुढील पंधरा दिवसात म्हणजेच 31 मार्च च्या अगोदर कृषी सहाय्यक पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील राज्य सरकारकडून पारित करण्यात येणार आहे.
या संबंधीची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेमध्ये दिलेली आहे त्यांनी सांगितले की राज्यातील कृषी विभागातील रिक्त 2215 जागा भरण्यासाठी या आर्थिक वर्षाच्या अगोदर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. (Agri Assistant Recruitment 2023)
विधानसभेमध्ये विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केल्यानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केलेली आहे कृषी सहायकांच्या रिक्त जागांमुळे शेतकऱ्यांना तसेच कृषी कामकाजामध्ये अडचणी येत आहेत कामे सुरळीत पार पडत नाहीत त्यामुळे लवकरात लवकर कृषी सहाय्यकांची रखडलेली भरती सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती या मागणीच्या उत्तरात कृषीमंत्र्यांनी कृषी सहाय्यक पदांच्या 2215 रिक्त जागा भरण्यासाठी निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 5,000 हजार पदांसाठी बंपर भरती
त्यानुसार या आर्थिक वर्षाच्या अगोदर म्हणजेच या पंधरा दिवसात यासंबंधी निर्णय होणार आहे शासन निर्णय जाहिरात पीडीएफ लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे कदाचित कृषी विभागातील कामकाज पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी आशा आहे.
त्यासोबतच कृषी सहाय्यक यांचे पदनाम कृषी सहाय्यक अधिकारी करण्याचा निर्णय देखील आज विधानसभेमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे यामुळे कृषी सहाय्यकांच्या पगारामध्ये वाढ होणार नाही परंतु त्यांच्या पद दर्जामध्ये वाढ होणार आहे. {Agri Assistant Recruitment 2023}
5दिवसात कधी जाहिरात निघेल आम्हाला कधी कळणार.
याच वेबसाईट वर त्यासंबंधी पोस्ट टाकली जाईल! त्यामुळे तुम्हाला जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. अपडेट साठी आमचा Free Whatsapp group, किंवा Telegram group जॉईन करा..