दिनांक 1 फेब्रुवारी ला निर्मला सीतारामन देशाचे बजट सादर करणार आहेत, या बजट मध्ये शेती कृषी क्षेत्रासाठी कोणते नवे धोरण असणार (Budget 2023 Expectations) याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकी पूर्वीचा, मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे तज्ञांच्या मते या अर्थसंकल्पात मोदी सरकार काही ठोस पाऊले उचलणार हे निश्चित आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योग, करदाते, तज्ञ, व्यापारी, वेगवेगळ्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आपल्या अपेक्षा पाठवत आहेत. कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना देखील या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत.
शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात काय मिळणार?
Table of Contents
कृषी आणि शेतकरी बांधवांना यंदाच्या बजट द्वारे, सरकार कडून येणाऱ्या मदतीत आणखीन वाढ होईल अशी आशा आहे. शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी ही योजना अमलात आणली होती. आणि त्या द्वारे सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 देत होते, आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांना मिळणारी किसान सन्मान निधी ₹8,000 पर्यंत वाढवतील अशी अपेक्षा आहे.
कृषी क्षेत्राला नवीन तंत्रज्ञान आणि विकासाची आशा!
शेतकऱ्यांच्या सार्वांगीण विकासासाठी सरकारने या अर्थसंकल्पात कृषी तंत्रज्ञान आणि विकासाची धोरणे आखावी असा कृषी तज्ञांचा सल्ला आहे. शेतकऱ्यांना थेट रोख मदत देण्या व्यतिरिक्त सरकारने त्यांना शाश्वत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळवून देणे, त्यांना मालाचा योग्य मोबदला देणे. सोबतच शेतीचे डिजिटल स्वरूप करण्यासाठी देखील सरकारने आवश्यक धोरणे आखणे येणाऱ्या अर्थसंकल्पातून अपेक्षित आहेत.