वारस नोंदीसाठी आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते ? वाचा सविस्तर

मित्रांना शेअर करा:

Agriculture News : एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर वारस नोंद करावी लागते. जर सदर व्यक्तीच्या नावावर कोणत्याही प्रकारची संपत्ती असेल, जमीन असेल तर अशी जमीन किंवा संपत्ती सदर मयत व्यक्तीच्या वारसांना मिळते. यासाठी मात्र वारस नोंद आवश्यक असते. वारस नोंद करण्यासाठी सदर व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला अर्ज करावा लागतो. सातबाऱ्यावर वारस नोंद करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज केला जातो.

पण वारस नोंदसाठी वारस प्रमाणपत्र अर्थातच (heirship certificate) हेअरशिप सर्टिफिकेट लागते. यासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना दिवाणी न्यायालयात अर्ज करावा लागतो. दिवाणी न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर माननीय न्यायालयाकडून अशा प्रकरणावर सुनावणी घेतली जाते आणि यातून सदर अर्जदार व्यक्ती मयत व्यक्तीचा कायदेशीर वारस असल्यास त्याला वारस प्रमाणपत्र दिले जाते. आता आपण वारस प्रमाणपत्र काढण्यासाठी कायदेशीर वारसांना कोण कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात यासाठी दिवाणी न्यायालयात कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो, याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वारस प्रमाणपत्रासाठी दिवाणी न्यायालयात कसा अर्ज करता येतो 

जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असेल आणि अशा मयत व्यक्तीच्या नावावर जमीन, घर, बंगला, फ्लॅट किंवा इतर संपत्ती असेल तर अशा व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना वारस नोंद करावी लागते. त्यासाठी हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजेच वारस प्रमाणपत्र लागते. हे सर्टिफिकेट काढण्यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र काढावे लागते.

मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित गावातील ग्रामपंचायत मधून प्राप्त केले जाऊ शकते. मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि सदर मयत व्यक्तीच्या सर्व कायदेशीर वारसांचे आधार कार्ड जोडून मग दिवाणी न्यायालयात वारस प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो. अर्ज दाखल केल्यानंतर मग 3 ते 4 महिन्यात माननीय न्यायालयाकडून यावर निकाल दिला जातो. सर्वकाही बरोबर असेल तर असे प्रकरण निकाली काढून लगेचच कायदेशीर वारसांना वारस प्रमाणपत्र दिले जाते.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *