Agrowon Mahila Shakti Scheme: सकाळ ॲग्रोवन तर्फे महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. जागतिक महिला दिवस 2023 च्या निमित्ताने योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेद्वारे ज्या महिला अर्ज करतील त्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत, सर्व बक्षिसांचे एकूण मूल्य हे 55 लाख रुपये आहे. ॲग्रोवन तर्फे राज्यातील सर्व महिलांना या योजनेमध्ये सामील होण्यासाठी आव्हान केले गेले आहे. महिला बचत गटांना या योजनेमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला, ॲग्रोवन महिला शक्ती सन्मान योजना बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे? पात्रता काय आहेत? सोबतच अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत? आणि Agrowon Mahila Shakti Scheme साठी ॲग्रोवन तर्फे कोणकोणती बक्षीसे वितरित करण्यात येणार आहेत, हे देखील आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊ.
Agrowon Mahila Shakti Scheme (ॲग्रोवन महिला शक्ति सन्मान योजना महाराष्ट्र 2023)
ॲग्रोवन महिला शक्ती सन्मान योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला अर्ज करू शकतात, (Agrowon Mahila Shakti Scheme Elegeblity) योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धती खूप सोपी आहे. ही योजना 10 मार्च ते 21 जून दरम्यान असणार आहे, त्यानंतर Agrowon Mahila Shakti Scheme योजना बरखास्त केली जाणार आहे. त्यामुळे महिलांना या कालावधीतच योजनेत सामील होणे गरजेचे आहे.
हे पण वाचा: सर्व मुलींना शासना तर्फे सरसकट मोफत सेनेटरी पॅड मिळणार! नवी अस्मिता योजना जाहीर
या बक्षीस योजनेतून महिलांना 55 लाखांची 3000 हून अधिक बक्षिसे मिळणार आहेत, ॲग्रोवन तर्फे महिलांना ही सुवर्णसंधी देण्यात आली आहे. महिला शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ॲग्रोवन च्या वतीने महिला शक्ती सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.
Agrowon Mahila Shakti Scheme (महिला शक्ति सन्मान योजना साठी देण्यात येणारे बक्षीस)
महिला शक्ती सन्मान योजना मध्ये सामील झालेल्या महिलांना, ॲग्रोवन तर्फे बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. 55 लाखांची एकूण मूल्य असणारी ही बक्षिसे 3,000 हून अधिक आहेत. त्यासर्व बक्षिसांची नावे पुढीलप्रमाणे.
बक्षीसाचे नाव | एकूण संख्या | |
बंपर बक्षीस | इलेक्ट्रिक स्कूटी | 2 |
पहिले बक्षीस | ₹21,000 हजारांचे सोन्याचे नाणे | 10 |
दुसरे बक्षीस | स्मार्ट फोन (मोबाईल) | 12 |
तिसरे बक्षीस | सेमी पैठणी साडी | 100 |
चौथे बक्षीस | LED रिचार्जेबल इस्त्री / टॉर्च | 200 |
पाचवे बक्षीस | कृषी स्प्रे पंप (फवारणी पंप/ पिचकारी) | 1000 |
सहावे बक्षीस | स्टील हॉट पॉट ( स्टेन लेस स्तील चे पातेले) | 1000 |
उत्तेजनार्थ बक्षीस | फॉर्म टूल सेट (कृषी साहित्य) | 1001 |
शेतीमध्ये महिलांचा वाटा अनन्यसाधारण असून, या स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ योजना आखण्यात आली आहे. {Agrowon Mahila Shakti Scheme} योजने मधून आधुनिक शेतीची माहिती देखील सादर करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: 18 वर्षाच्या सर्व मुलींना मिळणार 75,000 हजार रुपये! लेक लाडकी योजना जाहीर
Agrowon Mahila Shakti Scheme Form (महिला शक्ति सन्मान योजना साठी अर्ज कसा करायचा?)
या योजनेत सहभागी होण्यासाठी ‘ॲग्रोवन’ मधून एक कूपन प्रसिद्ध होणार असून, 100 पैकी 90 कूपन कापून चिकटवून ॲग्रोवनच्या कार्यालयाला पाठवायचे आहे. यासाठी कूपनची मूळ प्रत आवश्यक असणार असून, याची झेरॉक्स ग्राह्य धरली जाणार नाही.
ॲग्रोवन द्वारे सुरू करण्यात आलेल्या महिला शक्ती सन्मान योजनेसाठी, ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांना ऍग्रोवनचा अंक वाचावा लागेल. ऍग्रोवनच्या दररोजच्या अंकामध्ये Agrowon Mahila Shakti Scheme योजनेसंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यात येईल सोबतच अंकामध्येच अर्ज पद्धती देखील सांगण्यात येणार आहे.
योजनेच्या नियम व अटी नियमितपणे ॲग्रोवन मधून प्रसिद्ध होणार आहेत. त्या वाचून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होण्यासाठी आणि योजने संबंधी अधिक माहिती घेण्यासाठी 98815-98815 (helpline number) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
Agrowon Mahila Shakti Scheme Result (महिला शक्ति सन्मान योजना साठीची निवड प्रक्रिया कशी आहे?)
ॲग्रोवन महिला शक्ती सन्मान योजना मध्ये सामील होण्यासाठी वर सांगितल्या प्रमाणे, प्रत्येक महिलेला अंकातील दररोज चे कुपन जमा करावे लागेल. योजनेसाठी अंकावर 100 कुपन येतील, एका महिलेला किमान 90 कुपन जमा करणे गरजेचे आहे, 90 कुपन जमा करून महिलेला ते कुपन ॲग्रोवनच्या कार्यालयाला पाठवायचे आहेत. ॲग्रोवनच्या कार्यालयाला पाठवल्यानंतर महिलेला बक्षीस वितरित होणार आहेत.
हे पण वाचा: महिलांना होणार 2 लाख रुपयांचा फायदा, केंद्र शासनाची नवी योजना जाहीर
ज्या महिलेने सर्वात जास्त कुपन जमा केले आहेत, त्या महिलेला बंपर बक्षीस मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी 90 किंवा त्यापेक्षा कमी अधिक कुपन जमा केले आहेत, त्यांना पहिल्या बक्षीस पासून ते सहाव्या बक्षीस पर्यंत पारितोषिके देण्यात येणार आहेत. सोबतच ज्या महिलांनी या योजनेमध्ये सहभाग घेतला आहे त्या सर्वांना, उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे. या बक्षीसामध्ये फार्म टूल सेट असेल, म्हणजेच कृषी साहित्याचा सेट / बॉक्स महिलांना भेट दिला जाईल. Agrowon Mahila Shakti Scheme
Tanavi Sopan Kahate