नमस्कार मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अखेर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासंबंधी सविस्तर अशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत. सोबतच अंगणवाडी मदतनीस भरती संबंधी पात्रता निकष कोणत्या जिल्ह्यात भरती होणार आहे? अशी महत्त्वाची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 information in Marathi
पदाचे नाव | अंगणवाडी मदतनीस |
नोकरीचे ठिकाण | जाहिरात पहा |
नोकरीचा कालावधी | कायमस्वरूपी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्जाची तारीख | 15 जुन 2023 पासून अर्ज सुरू |
अर्ज पाठिण्याचा पत्ता | जाहिरात पहा |
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 जाहिरात PDF Download
राज्यात अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जाहिरातीमध्ये अंगणवाडी मदतनीस भरती 2023 संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच जाहिरात मध्ये नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख तसेच पत्ता अशी माहिती देखील देण्यात आली आहे. खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अंगणवाडी मदतनीस भरती 2023 ची जाहिरात PDF डाऊनलोड करू शकता.
सातारा – जाहिरात पहा
बुलढाणा – जाहिरात पहा
लातूर – जाहिरात पहा
अहमदनगर – जाहिरात पहा
अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस पदासाठी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भरती निघाली आहे. सोबत अधिकृत रित्या या भरतीसाठी काही शैक्षणिक पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर उमेदवार बारावी उत्तीर्ण नसतील तर त्यांना अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 वयोमर्यादा
अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अधिकृतरित्या वयोमर्यादा निकष देखील ठरवण्यात आले आहेत. भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान आहे. विधवा महिलांसाठी यामध्ये सूट देण्यात आले असून त्यांना 18 ते 40 वर्ष दरम्यान वयोमर्यादा निकष ठरवण्यात आले आहेत.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पात्रता निकष
उमेदवाराला मराठी भाषेविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.
मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषेमधून उमेदवारांनी दहावी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवाराला मराठी लिहिता वाचता येणे अनिवार्य आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 निवड प्रक्रिया
अंगणवाडी मदतनीस भरती ही ऑफलाइन स्वरूपाची असणार आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा विचार केला जाणार आहे. सोबतच सर्वसाधारण प्रवर्ग आणि इतर प्रवर्गांमध्ये बारावी इयत्ता मध्ये त्यांना जितके मार्क किंवा गुण मिळाले आहेत, त्याच्या आधारे निवड प्रक्रियेमध्ये कार्यप्रणाली करण्यात येणार आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 अर्ज प्रक्रिया
अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, मला वर दिलेला अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊन तो अचूक रित्या भरायचा आहे. त्यानंतर तो अर्ज अधिकृत पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचे आहे. त्यानंतर विभागामार्फत तुमचा अर्ज तपासला जाईल आणि त्यानुसार कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर तुमची अंगणवाडी मदतनीस पदासाठी निवड केली जाईल.
मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरती संबंधी जास्तीची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे भरती संबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात नक्की वाचा.
हे पण वाचा :
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ
जुनी पेन्शन योजना काय आहे? कोणत्या सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली होती?
सरकारचा मोठा निर्णय! मुलगी असेल तर मिळणार 1 लाख रुपये