नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविका भरती 2023 बद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, पुणे जिल्हा प्रशासनामार्फत अंगणवाडी सेविका भरती निघाली आहे. यासंदर्भात शासनाकडून जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, सोबतच या संदर्भात माहिती देखील देण्यात आली आहे त्याविषयी आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
अंगणवाडी भरती 2023 संपूर्ण माहिती in Marathi
ज्या उमेदवारांना अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर पुणे जिल्हा प्रशासन अंगणवाडी सेविका भरती साठी अर्ज करावा.
अंगणवाडी सेविका भरती साठीची ही जाहिरात, दिनांक 8 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती पुणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेटणार आहे.
अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदे भरण्याबाबतची ही जाहिरात महिला व बालकल्याण विभागा मार्फत काढण्यात आली आहे.
अंगणवाडी भरती 2023 आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष
आता आपण पाहणार आहोत या अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी पात्रता काय आहे.
- स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला.
- अपल्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला.
- नांवा बाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत 4. शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
- उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला, (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./ वि. भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र. / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग)
- उमेदवार सेविका पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मदतनीस पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असावा.
- आधार कार्ड (झेरॉक्स प्रत)
- रेशन कार्ड (झेरॉक्स प्रत)
- विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला / अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
- किमान वय 18 ते 35 वर्ष आसावे.
- नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणून कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास वालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला. या प्रयोजनासाठी खाजगी संस्थेतील सेवा अनुभव ग्राहय धरणेत येणार नाही. अशी खाजगी संस्था मान्यताप्राप्त अथवा अनुदानित संस्था असली तरीही अशा संस्थांमधील अनुभव गुणांकनासाठी ग्राहय धरण्यात येणार नाही.
अंगणवाडी भरती 2023 अर्ज प्रक्रिया step by step guide in Marathi
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अंगणवाडी भरती 2023 पुणे जिल्हा मर्यादित साठी अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
- सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति (झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात
A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असू नयेत. - ज्या मुद्दया बाबत माहिती लिहावयाची नसेल तेथे रेषा मारावी. माहिती कोरी ठेवण्यात येवु नये.
- अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या पदाचा
अर्जावर स्पष्ट उल्लेख असावा. 15. अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास
दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करन्यात यावेत.
- खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारास कोणतीही पूर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
- अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर (४) अशी खुण करावी.
- ज्या मुळ प्रमाणपत्रांची कार्यालयाने मागणी केलेली नाही परंतु अशी कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास कार्यालय त्याची जबाबदारी घेणार नाही.
- अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत.
- अर्जासोबत जोडलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर खोटी बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, संबंधित शासन आदेश / नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान न केलेली असल्याचे आढळुन आल्यास प्रकल्प कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या निवडीपासून उमेदवारास कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात येईल. शिवाय उमेदवाराची शिफारस झाली असल्यास ती पूर्वलक्षी प्रभावाने रदद करणेत येईल. तसेच इतरही कायदे शासन नियमानुसार कारवाई करन्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
पुणे जिल्हा अंगणवाडी भरती शासन निर्णय, जाहिरात Download करा
तर मित्रांनो ही होती महत्त्वाच्या अशी अंगणवाडी भरती 2023 संबंधीची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.