Anganwadi Mandhan Vadh 2023: मित्रांनो राज्य शासना तर्फे एक मोठी अपडेट समोर आली आहे, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांना 1500₹ मानधन वाढ देण्याचे अखेर राज्य शासनाने मान्य केले आहे.
Join Our WhatsApp Group | Click Here |
Join Our Telegram Group | Click Here |
Anganwadi Mandhan Vadh 2023
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये 1,500 हजार रुपयांची वाढ, तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपाला अखेर दाद मिळाली आहे, विधानभवनात अंगणवाडी सेविका आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीड हजार रुपये वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे, संप मागे घेण्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघाने केली आहे.
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघाने मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी अशा अनेक मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे तब्बल दहा ते पंधरा दिवस राज्यातील सर्व अंगणवाडी बंद होत्या, त्यामुळे सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होती. हे चित्र बदण्यासाठी आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, राज्य शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. “Anganwadi Mandhan Vadh”
संपाचा परिणाम हा गर्भवती मातांची तपासणी सोबत बालकांचे लसीकरण, कुपोषण निर्मूलन अशा कार्यक्रमावर होत होता. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी कर्मचारी संघासोबत चर्चा केली, आणि त्यातून बैठकी अंती मानधन वाढ, पेन्शन योजना आणि इतर मागण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
FAQ
अंगणवाडी सेविका मानधन वाढ किती रुपयांनी झाली आहे?
1,500 रुपये
अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना केव्हा लागू होणार आहे?
मुख्यमंत्री शिंदे यांनी आंगणवाडी सेविका पेन्शन योजना साठी आश्वासन दिले आहे, त्यामुळे योजना लवकरच लागू होणार आहे.