Bailgadi anudan yojana – लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र (अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ, अनुदान रक्कम)

मित्रांना शेअर करा:

Bailgadi anudan yojana, Maharashtra bailagdi anudan yojana 2023, (लोखंडी बैलगाडी अनुदान योजना), “बैलगाडी अनुदान योजना अर्ज प्रक्रिया”, लोखंडी बैलगाडी योजना महाराष्ट्र राज्य, lokhandi bailgadi yojna Maharashtra, bailgadi anudan yojana, iron bullock cart scheme maharashtra, apply process, eligibility, benefits, subsidy

Bailgadi anudan yojana: शेतकरी मित्रांनो शासनातर्फे एक शेतकरी पूरक आणि उपयोगी अशी योजना आली आहे, या योजनेचे नाव लोखंडी बैलगाडी अनुदान योजना असं आहे. या योजनेच्या नावातच सगळ कार्य स्पष्ट होत, थोडक्यात शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी मिळवून देण्यासाठीची ही योजना आहे. या बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बैलगाडी मिळणार आहे.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here

ग्रामीण भागात बैलगाडीचे पूर्वी फार महत्व होते, शेतमाल वाहून नेणे यासाठी बैलगाडी वापरली जायची. आजही अनेक खेड्यांमध्ये बैलगाडी प्रचलित आहे, ग्रामीण शेतीचा महत्वाचा पैलू बैलगाडीला मानता येईल.

Bailgadi anudan yojana
लोखंडी बैलगाडी अनुदान योजना 2023 महाराष्ट्र

बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र माहिती (lokhandi bailgadi anudan yojana maharashtra)

पूर्वी शेती बरोबरच बैलगाडी ही दळणळणाचे एक मुख्य साधन होती, परंतु काळाच्या ओघात बैलगाडीचा दळणळणा साठी होणारा वापर कमी झाला आणि त्याची जागा आधुनिक वाहनांनी घेतली.

शेती देखील आता आधुनिक झाली आहे, काही जागी तर शेतकरी ड्रोन चा वापर करून शेती करताना दिसून येत आहे. पण आजही ग्रामीण भागात बैलगाडी अबधित आहे, शेती साठी आजही लोक बैलगाडीला पसंती दर्शवतात; याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील शेतीला जाण्या साठी असणारे पाणंद रस्ते, या रस्त्यांवर आजचे आधुनिक वाहने जात नसल्याने शेतकरी दूर अंतरावरील शेतात जाण्यासाठी बैलगाडी वापरतात. यामुळेच शासनाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी Bailgadi anudan yojana जाहीर केली आहे.

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र (bailgadi yojana maharashtra)

Bailgadi anudan yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बनवली गेली आहे, ही योजना राज्य स्तरावर लागू केलेली नाही ‘लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र’ ही योजना जिल्हा स्तरावर लागू केलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जावे लागेल.

जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कमेतून समाजकल्याण विभागा मार्फत, मागासवर्गीय व्यक्तीसाठी व महिला अर्जदारांसाठी दरवर्षी जिल्हा परिषद वेगवेगळया योजना राबवत असते, त्यातीलच एक योजना म्हणजे (Bailgadi anudan yojana)

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना पात्रता निकष – Bailgadi anudan yojana eligibility criteria

Bailgadi anudan yojana maharashtra साठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत, मोफत 100% अनुदानावर बैलगाडी मिळिण्या करिता, अर्जदार शेतकरी या सर्व अटी आणि तरतुदी मध्ये बसला पाहिजे.

अर्जदार शेतकरी हा मागासवर्गीय असणे आवश्यक आहे, तेव्हाच जिल्हा परिषद त्याला बैलगाडी खरेदीवर 100% अनुदान देऊ शकते.

Bailgadi anudan yojana maharashtra बद्दल सर्व अटी आणि तरतुदी जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या समाजकल्याण कार्यालयाला भेट द्या.

बैलगाडी अनुदान योजना अर्ज प्रक्रिया (How to apply for Bailgadi anudan yojana)

Bailgadi anudan yojana मध्ये सामील होण्यासाठी पात्र अर्जदार शेतकऱ्याला तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाला भेट द्यावी लागेल, जिल्हा परिषद कार्यालयात तुम्हाला लोखंडी बैलगाडी अनुदान योजना बद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल.

जिल्हा परिषद अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला या Bailgadi anudan yojana संदर्भात माहिती विचारली असता, जिल्हा परिषद अधिकारी या योजने आवश्यक अशी सर्व माहिती तुम्हाला सांगतील.

जसे की बैलगाडी अनुदान योजना अर्ज कसा भरायचा, बैलगाडी अनुदान योजना पात्रता आणि अटी काय आहेत?, जिल्ह्यासाठी बैलगाडी अनुदान योजना आहे किंवा नाही, बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्याला किती रुपये अनुदान मिळेल अश्या पद्धतीने तुम्हाला योग्य ती माहिती मिळून जाईल.

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना साठी अर्ज भरताना काही जिल्हा परिषद ऑफलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारतात, तर काही मोजक्या जिल्हा परिषद या ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्विकारतात. जिल्हा परिषद कार्यालय ज्या स्वरूपात अर्ज भरण्यास सांगत असेल त्याच स्वरूपात अर्जदार शेतकऱ्याला अर्ज भरने आवश्यक आहे.

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना लाभ आणि फायदे – maharashtra bailgadi anudan yojana benefits

bailgadi anudan yojana मध्ये अर्ज भरल्या नंतर शेतकऱ्याला बैलगाडी अनुदानावर दिली जाते, कमीत कमी पैशाने गरीब मागासवर्गीय शेतकऱ्याला बैलगाडी जिल्हा परिषद द्वारे उपलब्ध करून दिली जाते.

शेतकऱ्यांना लाकडी बैलगाडी ऐवजी, या bailgadi anudan yojana द्वारे लोखंडी बैलगाडी 100% अनुदानावर शासन देते.

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्याला मिळणारे लाभ आणि फायदे.

  • कमी पैशाने बैलगाडी मिळते
  • सरकार द्वारे 100% पर्यंत अनुदान मिळते
  • पारंपरिक लाकडी बैलगाडी ऐवजी लोखंडी टिकाऊ आणि मजबूत बैलगाडी मिळते
  • बैलांच्या पाठीवर कमी भार पडतो *कारण “लोखंडी बैलगाडी या लाकडी बैलगाडी पेक्षा हलक्या आणि टिकाऊ मजबूत असतात, म्हणून बैलांना बैलगाडी ओढण्यास सोपी जाते.”

शेती करत असताना बैलगाडीचे महत्व (शेतकऱ्यांसाठी बैलगाडीचे महत्व) Importance of Bailgadi in Marathi

शेती मध्ये काम करताना शेतकऱ्याला शेतमालाची आणि अनेक वस्तूंची घराकडे वाहतूक करावी लागते, मग त्यासाठी पहिला पर्याय शेतकऱ्याच्या डोक्यात येतो तो म्हणजे बैलगाडी. शेतीतील धान्य, खते, रसायने, आणि औषधे यांची वाहतूक नियमित पणे शेतकऱ्याला करावी लागते.

जास्त मोठ्या आणि जड वस्तूंची वाहतूक आपण स्वतः करू शकत नाही मग त्यासाठी शेतकऱ्याला सोपा वाहतूक पर्याय हवा असतो, आणि बैलगाडी ही शेती साठी सोपा वाहतूक पर्याय आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या शेती दूरवर असतात, त्यांना रोज तेवढे चालणे झेपत नाही त्यासाठी शेतकरी बैलगाडी वापरतात. ज्या रस्त्यावर वाहने जाऊ शकत नाही तेथे बैलगाडी नेता येते, बऱ्याच शेतकऱ्यांची शेती ही अश्या ठिकाणी असते जेथे वाहनांनी जाणे अशक्य नसते, मग अश्या शेतीसाठी कृषी क्षेत्राचे पारंपरिक वाहन (बैलगाडी) कामी येते.

काळ बदलत आहे शेती आधुनिक तंत्रज्ञानाने होत आहे, तसेच शेतीत ड्रोन वापरून फवारणी देखील होत आहे, परंतु आजही ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना बैलगाडी आवश्यक आहे.

आताच्या या महागाईच्या काळात बैलगाडी स्वतः घेणे मोठे खर्चिक, शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून महाराष्ट्र शासनाने लोखंडी बैलगाडी अनुदान योजना (bailgadi anudan yojana) गरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे असे सरकारचे प्रयत्न आहेत.

संपूर्ण बैलगाडी नव्याने खरेदी करण्यासाठी ₹30,000 ते ₹35,000 हजार एवढा एकूण खर्च येतो, रक्कम पाहूनच अनेक शेतकरी बैलगाडी घेण्यापासून वंचित राहतात. त्यामुळेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदानावर, बैलगाडी देण्याची योजना अमलात आणली. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कमी पैशात बैलगाडी उपलब्ध होते.

बैलगाडी अनुदान योजना 2023 बद्दल अधिक माहिती जाणून घ्या..

FAQ

Q : लोखंडी बैलगाडी योजना साठी अनुदान किती मिळते?

Ans : बैलगाडी खरेदी साठी अनुदान 100% पर्यंत मिळते, तसेच अनुदान रक्कम ही ₹30,000 ते ₹35,000 इतकी असते.

Q : बैलगाडी अनुदान योजना शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे चालवली जाते?

Ans : महाराष्ट्र समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र.

Q : Bailgadi anudan yojana साठी पात्रता काय आहे?

Ans : अर्जदार शेतकरी हा मागासवर्गीय (EWS) कॅटेगरी मधील असावा.

हे पण वाचा :


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *