बँक ऑफ इंडिया भरती 2023 – जाहिरात PDF, अभ्यासक्रम, पात्रता निकष

मित्रांना शेअर करा:

मित्रांनो बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी भरती निघालेली आहे या भरतीसाठी पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया सोबतच जाहिरात PDF आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया. बँक ऑफ इंडिया 500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. दिनांक 11 फेब्रुवारी, 2023 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, 25 फेब्रुवारी 2023 ही अर्जाची शेवटची तारीख असेल. त्यामुळे ज्या अर्जदार उमेदवारांना बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी अर्ज करायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर बँक ऑफ इंडिया 2023 भरती अर्ज भरून घ्यावा.

या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक दिलेली आहे त्यामुळे पूर्ण माहिती वाचून आणि समजून घेऊन नंतरच अर्ज भरा. मित्रांनो अर्ज भरण्या अगोदर बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेली जाहिरात वाचून घ्या, या जाहिरातीची PDF आम्ही आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

bank-of-india-bharti-2023

बँक ऑफ इंडिया भरती 2023 संपूर्ण माहिती

भरतीचे नाव बँक ऑफ इंडिया भरती 2023
पदाचे नाव क्रेडीट ऑफिसर (GBO), IT ऑफिसर (SPL)
पदसंख्या 500 रिक्त जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
वयोमर्यादा 20 ते 29 वर्षे, (SC / ST: 5 वर्षे सुट, OBC: 3 वर्षे सुट)
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (जाहिरात PDF पहावी)
परीक्षा फीजनरल/OBC: 850 रुपये, SC/ST/PWD:175 रुपये
अर्ज पद्धतऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख
25 फेब्रुवारी, 2023
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक ऑफ इंडिया भरती 2023 PDF Download

बँक ऑफ इंडियाने 2023 भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जाहिराती मध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे.

बँक ऑफ इंडिया भरती 2023 जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

बँक ऑफ इंडिया भरती 2023 जाहिरात PDF डाऊनलोड करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा.👈

बँक ऑफ इंडिया भरती 2023 साठी पात्रता निकष

वयोमर्यादा:

उमेदवाराची वय एक फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे असावे एस सी आणि एसटी वर्गासाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षांची सूट दिली आहे तर ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची सूट दिलेली आहे बाकी इतर वर्गातील मुलांना अर्जदारांना वयोमर्यादा ही दिलेल्या अटीप्रमाणेच असेल.

परीक्षा फी:

बँक ऑफ इंडिया 2023 भरती साठी परीक्षा फी 850 रुपये आहे एससी एसटी प्रवर्गासाठी परीक्षा फी 175 रुपये आहे बाकी इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ इंडिया भरती 2023 परीक्षा फी दिलेल्या अटीप्रमाणे असेल ओबीसी आणि जनरल वर्गासाठी 850 तर एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 175 रुपये महिलांसाठी कोणत्याही स्वरूपाची सूट दिलेली नाही.

शैक्षणिक पात्रता:

क्रेडीट ऑफिसर (GBO)कोणत्याही शाखेतील पदवी
IT ऑफिसर (SPL)B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)
किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिक्शन/
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level

बँक ऑफ इंडिया भरती 2023 अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप

क्र.विषयाचे नाव प्रश्न मार्क वेळ
1.इंग्रजी 354040 मिनिटे
2.तर्क आणि संगणक अभियोग्यता456060 मिनिटे
3.सामान्य/अर्थव्यवस्था/बँकिंग जागरूकता404035 मिनिटे
4.डेटा विश्लेषण आणि व्याख्या356045 मिनिटे
4.इंग्रजी वर्णनात्मक पेपर (पत्र लेखन आणि निबंध)22530 मिनिटे

इंग्रजी भाषेची चाचणी आणि इंग्रजी वर्णनात्मक पेपर वगळता वरील चाचण्या द्विभाषिक, म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असतील. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी वर्णनात्मक पेपरची चाचणी पात्रता स्वरूपाची असेल म्हणजेच गुणवत्ता यादी तयार करताना इंग्रजी भाषेत मिळालेले गुण आणि इंग्रजी वर्णनात्मक पेपर जोडले जाणार नाहीत.

BOI PO परीक्षा 2023 साठी किमान पात्रता गुण

सामान्य/EWS श्रेणीसाठी किमान पात्रता गुण 40% असतील. SC/ST/OBC/PWD प्रवर्गातील उमेदवार, संबंधित प्रवर्गासाठी राखीव जागा भरताना, सामान्य/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी निर्धारित केलेल्या 5% गुणांच्या सवलतीसाठी पात्र असतील. बँक आपल्या आवश्यकतेनुसार किमान पात्रता गुण बदलू शकते.

BOI PO परीक्षा 2023 मध्ये चुकीच्या उत्तरांसाठी दंड : वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी दंड आकारला जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी ज्या उमेदवाराने चुकीचे उत्तर दिले असेल त्या प्रश्नाला नियुक्त केलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश गुण योग्य गुणांवर येण्यासाठी दंड म्हणून वजा केले जातील. जर एखादा प्रश्न रिक्त सोडला असेल, म्हणजे उमेदवाराने कोणतेही उत्तर चिन्हांकित केले नसेल; त्या प्रश्नासाठी कोणताही दंड होणार नाही.

बँक ऑफ इंडिया भरती 2023 FAQ’s

Q : BOI PO Bharti 2023 साठी पदसंख्या किती आहे?

Ans : 500

Q : BOI PO Bharti 2023 परीक्षा फी किती आहे?

Ans : जनरल/OBC: 850 रुपये, SC/ST/PWD:175 रुपये.

Q : बँक ऑफ इंडिया भरती 2023 अर्जाची शेवटची तारीख काय आहे?

Ans : 25 फेब्रुवारी, 2023

हे पण वाचा:


ग्रुप मध्ये जॉईन व्हा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *