BSF Recruitment 2023 : 12 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी बीएसएफ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदावर निघाली भरती, पहा…

मित्रांना शेअर करा:

BSF Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येतात. विशेषता ज्यांना सीमा सुरक्षा दलात अर्थातच बीएसएफ मध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की बीएसएफने विविध रिक्त पदांसाठी नुकतीच एक भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात देखील बीएसएफच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बीएसएफ मध्ये विविध रिक्त पदांच्या जवळपास 247 जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती?
बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदाचा रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

पदानुसार रिक्त जागांची संख्या
हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर या पदाच्या एकूण 217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदाच्या तीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजेच बीएसएफ मध्ये 247 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार या पदासाठी विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयासह बारावी उत्तीर्ण उमेदवाराच यासाठी पात्र राहतील. सोबतच सदर उमेदवाराने आयटीआय केलेला असणे देखील यासाठी बंधनकारक आहे.

किती पगार मिळणार
बीएसएफ मध्ये या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 81,100 रुपये वेतन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. https://bsf.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक अन पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात.

अधिसूचना कुठं पाहणार
 या लिंक वर जाऊन बीएसएफद्वारे जारी झालेल्या या भरतीची अधिसूचना पाहता येणार आहे.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *