नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण 25 हजारात सुरू करता येणारे व्यवसाय तुम्हाला सांगणार आहोत. तुमच्याकडे जर फक्त 25000 भांडवल असेल तरीदेखील तुम्ही हे व्यवसाय करू शकणार आहात. या व्यवसायासंबंधीची सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया.
Business Ideas under ₹25,000 in india (₹25,000 हजारात सुरू करता येणारे व्यवसाय कोणते?)
मित्रांनो जर तुम्हाला 25 हजाराच्या आत व्यवसाय सुरू करायचे असतील, भांडवल हे फक्त 25000 असेल तर तुम्हाला खाली दिलेले व्यवसाय कल्पना नक्कीच आवडतील. Business Ideas under ₹25,000 in india बद्दल माहिती खालील प्रमाणे आहे.
#1 घरगुती फूड डिलिव्हरी व्यवसाय
या प्रकारच्या घरगुती फूड डिलिव्हरी व्यवसाय मध्ये, तुम्ही घरून तुमच्या ग्राहकांना फूड डिलिव्हरी करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 हजारापेक्षा कमी भांडवल लागते. अगदी कमी भांडवलात सुरू करता येणारा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाद्वारे तुम्ही घरगुती जेवण विद्यार्थ्यांना व्यक्तींना देऊ शकता किंवा तुम्ही मेस देखील चालू करू शकता.
व्यवसायाला मोठे स्वरूप देण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्स देखील वापर करू शकता, तुम्ही तुमच्या व्यवसाय सुरू करू फूड डिलिव्हरी चालू करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या व्यवसायाचा स्वतंत्र ॲप लॉन्च करू शकता.
#2 ऑनलाइन ब्युटी स्टोअर
ऑनलाइन ब्युटी स्टोअर व्यवसाय मध्ये तुम्ही वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट ऑनलाईन विक्री करून पैसे मिळवू शकता. ऑनलाइन ई-कॉमर्स चा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. ब्युटी स्टोअर सध्या मोठ्या प्रमाणात पारंपारिक स्वरूपात आहेत, ब्युटी प्रॉडक्ट ऑनलाईन नेले तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश नक्की मिळेल.
ब्युटी स्टोअर ऑनलाईन सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवल हे 25 हजाराच्या आत लागणार आहे. इतर व्यवसायाच्या मानाने यामध्ये तुम्हाला कोणताही स्वरूपाचे इतर भांडवल लागणार नाही. फक्त तुम्हाला ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करावे लागतील. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन ड्युटी स्टोअर वर तुम्ही तुमचे ब्युटी प्रॉडक्ट विक्री करू शकता.
#3 फोटोग्राफी सेवा
फोटोग्राफी व्यवसाय देखील 25000 च्या आत सुरू करता येणारा व्यवसाय आहे. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे ते हा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकांना फोटोज काढून देऊ शकता त्या बदल्यात पैसे मिळवू शकता.
तुम्हाला हवे असल्यास करण्यासाठी फक्त कॅमेरा आणि स्टुडिओ ची गरज आहे. स्टुडिओ नसेल तर देखील तुम्ही सुरुवातीला कॅमेराचा वापर करून व्यवसाय सुरू करू शकता. फोटोची डिजिटल प्रत देऊन देखील व्यवसायाची सुरुवात करता येते. यामध्ये तुम्ही बॅनर तसेच फोटो एडिट करून देऊ शकता.
#4 फ्लावर डिझाईन सेवा
फ्लावर डिझाईन सेवा हा व्यवसाय देखील कमी पैशात करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी भांडवल हे 25 हजाराच्या आत लागणार आहे. तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो सुरू करू शकता. वेगवेगळ्या समारंभात कार्यक्रमांमध्ये तुम्ही फ्लावर डिझाईन सेवा देऊ शकता. आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता.
या व्यवसायामध्ये तुम्ही ऑनलाईन सेवा देखील देऊ शकता, जसे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी इ कॉमर्स प्रमाणे वेबसाईट बनवून तुमच्या व्यवसायाविषयी माहिती देऊ शकता. फ्लावर डिझाईन सेवा ऑनलाइन देखील पुरवू शकता.
#5 फूड डिलिव्हरी सेवा
फूड डिलिव्हरी सेवा हा व्यवसाय कमी पैशात करता येणार व्यवसाय आहे, व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल हे 25 हजारापेक्षा कमी लागणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ वाहतुकीची गरज आहे. कोणत्याही प्रकारची मोटरसायकल अथवा गाडी द्वारे तुम्ही सेवा देऊ शकता.
तुमच्या व्यवसायाला तुम्ही ऑनलाईन देखील नेऊ शकता, ऑनलाइन वेबसाईट बनवून फूड डिलिव्हरी ग्राहकांना देऊ शकता. व्यवसाय मध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्थानिक हॉटेल रेस्टॉरंट इत्यादी सोबत कॉन्ट्रॅक्ट करून व्यवसाय करू शकता. किंवा स्वतः हॉटेल रेस्टॉरंट उघडून त्याद्वारे फूड डिलिव्हरी सेवा देऊ शकता.
#6 सोलर पॅनल सेवा
सद्यस्थितीला पारंपारिक ऊर्जा वापरण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, सोबतच अशा प्रकारच्या व्यवसायांना शासनाची मदत देखील दिले जात आहे. वेगवेगळ्या सबसिडी योजनांद्वारे अर्थसहाय्य केले जाते. लोक देखील सोलर पॅनल खरेदी करत आहेत, त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय मोठा यशस्वी होऊ शकतो.
सोलार पॅनल सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला कमी भांडवलाची आवश्यकता आहे. हा व्यवसाय तुम्ही 25 हजाराच्या भांडवलात देखील सुरू करू शकता. सोलर पॅनल ची खरेदी विक्री करून त्याद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता.
#7 एजुकेशनल कंसल्टेंसी
शिक्षण क्षेत्र सध्याला मोठे वाढले आहे, त्यासोबतच एज्युकेशन कन्सल्टन्सी देखील वाढली आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी मदत देखील करा आणि तुमचे स्वतःची करिअर देखील तुम्ही घडवाल.
एज्युकेशन कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर व्यवसाय प्रमाणे कोणते स्वरूपाचे मोठ्या प्रमाणात भांडवल लागत नाही. हा व्यवसाय कमी भांडवलात करता येणारा व्यवसाय आहे, एज्युकेशन कन्सल्टन्सी सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 25 हजाराच्या आत भांडवलाची आवश्यकता लागते.
खाली काही अजून व्यवसायाच्या कल्पना दिल्या गेल्या आहेत, तुम्ही हे व्यवसाय कमी भांडवलात करू शकता. 25 हजाराच्या आत करता येणारे हे सर्व व्यवसाय आहेत.
ऑनलाइन ट्युशन
डिजिटल मार्केटिंग
ग्राफिक डिझाईन
कुल्फी चा व्यवसाय
ज्यूस चे दुकान
मास्क बनवण्याचा व्यवसाय
हेल्मेट, टोपी आणि चष्मा बनवण्याचा व्यवसाय
तर मित्रांनो वर सांगितल्या प्रमाणे हे काही 25 हजाराच्या आत सुरू करता येणारे व्यवसाय आहेत. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल, 25000 च्या आत सुरू करताना रे अनेक असे व्यवसाय आहेत त्यांची लिस्ट आम्ही दिली आहे. तुम्हाला जर यापैकी कोणता व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यासंबंधी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आम्हाला कमेंट करू शकता. आम्ही त्या विषयावर नक्कीच तुम्हाला माहिती देऊ धन्यवाद.