सिट्रस इस्टेट प्रकल्प संपूर्ण माहिती – Citrus Estate information in Marathi

मित्रांना शेअर करा:

सिट्रस इस्टेट प्रकल्प नवीन शासन निर्णय (GR) जाहीर: महाराष्ट्र सरकारच्या 2021 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सिट्रस इस्टेट (Citrus estate GR) या प्रकल्पाची घोषणा केली होती, प्रामुख्याने शेतकऱ्यांना विचारात घेऊन हा प्रकल्प महराष्ट्रात राबवण्याचे ठरवण्यात आले होते. तद्नंतर राजकीय उलथपालथी मुळे या प्रकल्पाला वेग मिळाला नव्हता परंतु आता राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता देऊन त्यासंबंधी GR देखील काढला आहे.

Citrus Estate information in Marathi

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग या राज्य सरकारच्या विभागांद्वारे सिट्रस इस्टेट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, राज्यात सिट्रस इस्टेट ची सन 2022-2023 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी ₹ 5973.97 लाख कोटी एवढ्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ₹ 654.24 लाख कोटी एवढा निधी वितरित करण्यास मान्यता दिली गेली आहे. आज 25 जानेवारी, 2023 ला यासंबधी अधिकृत GR देखील आला आहे.

click here

सिट्रस इस्टेट प्रकल्प GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सिट्रस इस्टेट प्रकल्प संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे, विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरूड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्री प्रकिया स्थापन करण्यात येणार असून, मराठवाडा आणि आसपासच्या भागातील मोसंबी पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी संभाजीनगर मधील पैठण येथे 62 एकर जमिनीवर सिट्रस इस्टेट प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे.

पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रात सिट्रस इस्टेट प्रकल्प

सिट्रस इस्टेट ही एक सेमी गव्हर्मेंट संस्था आहे, पंजाब मध्ये या पूर्वी या संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकार या संस्थेला राज्यात घेऊन येणार आहे.

सिट्रस इस्टेट ही संस्था एक कृषी संशोधन संस्था असून या संस्थे मार्फत लागवड क्षेत्रातील मातीचे नमुने तपासणी केली जाते, सोबतच कोणती कमतरता आहे हे सुध्दा सांगितले जाते. या संस्थे मार्फत उच्च प्रतीच्या कलमा देखील उपलब्ध करून दिल्या जातात, रोपांपासून ते लागवडी पर्यंत मार्गदर्शन देखील सिट्रस इस्टेट करते. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी निवारण करण्यास मदत मिळेल.

सिट्रस इस्टेट द्वारे केवळ उत्तम प्रतीच्या कलमा पुरवल्या आणि मार्गदर्शन केले जात नाही तर, लागवडी पासून विक्री पर्यंत शेतकऱ्यांना सिट्रस इस्टेट मदत करते. ग्रेडिंग आणि कोटिंग साठी सवलत ऊपलब्ध करून देते, येवढंच नाही तर बाजारपेठे बद्दल माहिती सुध्दा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जाते. देशभरात संत्री विकण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक सबसिडी सुध्दा ऊपलब्ध करून दिली जाते.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *