DBT for Ration – शेतकऱ्यांना राशन ऐवजी मिळणार पैसे, या 14 जिल्ह्यासाठी लागू!

मित्रांना शेअर करा:

DBT for Ration: मित्रांनो रेशन संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे, आता रेशन ऐवजी महिन्याला पैसे मिळणार आहेत. दिनांक 28 फेब्रुवारी, 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढला आहे. नेमका काय आहे हा शासन निर्णय? कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे? कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत? तसेच ही रक्कम मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे कृपया लेख संपूर्ण वाचावा आणि अर्ज प्रक्रिया समजून घ्यावी.

DBT for Ration

DBT for Ration संपूर्ण माहिती in Marathi

बऱ्याच दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होती, की शेतकऱ्यांना राशन ऐवजी सरकारद्वारे पैसे दिले जाणार. आता सरकार द्वारे अधिकृत रित्या शासन निर्णय देखील जाहीर झाला आहे.

मित्रांनो अन्नसुरक्षा योजने अंतर्गत सर्वांना राशन दिले जाते, परंतु शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राशन कार्डवर पुरेसा तांदूळ आणि गहू उपलब्ध नसतो. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार द्वारे DBT for Ration संदर्भात विचार मंथन सुरू होते. काल अखेर सरकार द्वारे शासन निर्णय निर्गमित झाला आहे, याचा अर्थ DBT for Ration योजना शेतकऱ्यांसाठी लागू करण्याचे आदेश निघाले आहेत.

DBT for Ration साठी पात्र जिल्हे

शेतकऱ्यांना राशन ऐवजी थेट पैसे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्यांचा समवेश करण्यात आला आहेत. या जिल्ह्यातील केसरी रेशन कार्ड धारक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना आता रेशन मिळणार नाही. त्या जागी आता शेतकऱ्यांना बँक खात्यावर थेट पैसे मिळणार आहेत, ज्या प्रकारे पी एम किसान चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतात; तसेच आता रेशन चे पैसे सुध्दा थेट बँक खात्यात येणार आहेत. पात्र जिल्हे पुढील प्रमाणे आहेत..

छत्रपती
संभाजी नगर
नांदेड
जालनाबीड
धाराशिवपरभणी
लातूरहिंगोली
अमरावतीवाशीम
अकोलाबुलढाणा
यवतमाळवर्धा

वरील 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केसरी राशन कार्ड वरती अन्नधान्य बंद करून, त्या कार्ड धारकांना दर महा 150 रुपये प्रति लाभार्थी देण्यात येणार आहेत. रोख रक्कम Direct Benifit transfer Ration म्हणजेच DBT for Ration माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.

DBT for Ration पात्रता निकष (अटी)

  • अर्जदार शेतकरी केसरी रेशन कार्ड धारक असावा.
  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड शी link असावे.
  • शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे आधार कार्ड नंबर रेशन कार्ड सोबत link असावेत.
  • DBT योजनेचा लाभ केवळ कुटुंब प्रमुखाला मिळणार आहे.
  • शेतकऱ्याने योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केलेला असावा.
  • अर्जदार वर दिलेल्या 14 जिल्ह्यातील असावा.
  • शेतकरी महराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • बँक खात्याला आधार कार्ड link असावे.

DBT for Ration शासन निर्णय PDF अर्ज नमुना (फॉर्म) Download

ज्या शेतकऱ्यांना DBT for Ration योजनेसाठी लाभ मिळवायचा आहे, त्यांना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी; शासनाने अधिकृत रित्या जाहीर केलेला शासन निर्णय वाचणे गरजेचे आहे. सोबतच अर्ज करण्यासाठी महत्त्वाचा असा अर्थचा नमुना फॉर्म देखील मिळवणे गरजेचे आहे. शासन निर्णय pdf मध्ये शेवटच्या पानावर अर्जाचा नमुना दिलेला आहे, त्याची प्रिंट आउट काढून फॉर्म भरून घ्या.

शासन निर्णय व अर्ज नमुना (फॉर्म)

click here

👉डाऊनलोड करा👈

DBT for Ration Apply Online (अर्ज प्रक्रिया)

शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी online किंवा offline अर्ज भरावा लागणार आहे, DBT for Ration साठी भरावयाचा फॉर्म अर्ज आम्ही लेखात दिला आहे. अर्ज करण्यासाठी दिलेला फॉर्म भरणे अत्यावश्यक आहे.

  1. दिलेल्या फॉर्मची झेरॉक्स किंवा प्रिंट आऊट काढून तो फॉर्म भरायचा आहे, फॉर्मवर दिलेली माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.
  2. तसेच फॉर्म भरत असताना तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकावा लागेल. तो नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेरा रेशन या ॲपवरून तुमचं रेशन कार्ड साठी चा बारा अंकी नंबर शोधू शकता.
  3. रेशन कार्डचा बारा अंकी नंबर भरून झाल्यानंतर, तुम्हाला फॉर्म सोबत रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडायची आहे. झेरॉक्स प्रत पहिल्या आणि शेवटच्या पानाची असावी.
  4. बँक खात्याचा तपशील किंवा बँक पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म, तुमच्या गावातील रेशन दुकानावर किंवा तहसील कार्यालयात जमा करायचा आहे.
  6. अशा रीतीने तुम्ही डीबीटी फॉर रेशन या योजनेसाठी लाभार्थी बनू शकता.

जर तुम्ही हा फॉर्म भरून रेशन दुकानावर किंवा तहसील कार्यालय जमा केला नाही तर तुम्हाला योजनेसाठी लाभार्थी स्वरूपात पात्रता मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून रेशन दुकानात किंवा तहसील कार्यालयात जमा करावा.

FAQ

DBT for Ration साठी शेतकऱ्यांना महिन्याला किती रुपये मिळणार आहेत?

दरमहा 150 रुपये.

DBT for Ration योजना किती जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे.

शेतकरी आत्महत्या ग्रस्त 14 जिल्हे, लिस्ट लेखामध्ये दिली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना रेशन ऐवजी पैसे मिळणार आहेत?

केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी.

हे पण वाचा:

मित्रांनो अशाच नव नवीन अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईट ला भेट देत रहा. तुम्हाला शासन निर्णय, सरकारी योजना आणि जॉब अपडेट येथे मिळतील!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *