गारपीट नुकसान भरपाई : शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई सुरू ! शासन निर्णय आला

मित्रांना शेअर करा:

नमस्कार शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे. राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना गारपीट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल.

नुकसान भरपाई किती मिळणार? आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार?

याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत

तर मित्रांनो दिनांक ४ मार्च ते 19 मार्च या कालावधी दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसा मुळे नुकसान झाले होते त्यांनाच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

राज्य शासनाकडून आज जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये या नुकसान भरपाई साठी तब्बल 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे.

राहिला प्रश्न तो म्हणजे नुकसान भरपाई किती मिळणार?

तर शेतकरी बांधवांनो शासनाकडून वर सांगितलेल्या कालावधी दरम्यान च्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्यांनाच मदत दिली जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ठराविक रक्कम दिली जाणार नाही शेतकऱ्याचे नुकसान किती झाले आहे यावर नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे.

समजा जर तुमच्या शेतीचे किंवा पिकाचे नुकसान 80 टक्के झाले असेल तर तुम्हाला शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम जास्त मिळणार आहे. आणि जर तुमचे नुकसान फक्त 50 किंवा 40% या दरम्यान झाले असेल तर तुम्हाला दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम कमी असणार आहे.

शेतकऱ्यांची जेवढी नुकसान झाले आहे तेवढी भरपाई शासन करणार आहे आणि ही भरपाई सरसकट असणार आहे, असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही लवकरात लवकर नुकसान भरपाई वाटप करू असे सांगितले आहे.

नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण आज शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई वाटप करणे लवकर सुरू होणार आहे.

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी नुकसान भरपाई संबंधित अपडेट आवडली असेल तर कमेंट करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा.

आणि आपल्या वेबसाइटला भेट देत रहा. धन्यवाद!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *