State wise application form, notification pdf, application date, education, selection, post preference number for gds, gds 2023 salary, gds 2023 apply online, gds online apply 2023 last date, gds recruitment 2023 vacancy.
GDS 2023 Recruitment Latest vacancy, requirement, selection process, eligibility criteria, gds online recruitment February 2023 आणि इतर आवश्यक माहिती या लेखातून तुम्हाला मिळेल. agrobharti द्वारे पोस्ट भरती बद्दल पूर्ण माहिती या job article मध्ये सांगण्यात आले आहे, त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
पोस्ट ऑफिस भरती 2023 – GDS Recruitment Latest vacancy
Table of Contents
भारतीय टपाल पोस्ट ऑफिस मंत्रालयाने India post GDS Recruitment 2023, इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी notification जारी केले आहे. संपूर्ण भारतात इंडिया पोस्ट ऑफिस ची भरती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
जानेवारी 2023 ची पोस्ट ऑफिस भरती लेखी पेपर न देता होणार आहे, एकंदरीत या भरती साठी अर्जदाराचे 10 वी चे मार्क तपासले जाणार आणि त्यावरून system generated मेरिट लिस्ट लागणार आहे.
- विद्यार्थी स्कॉलरशिप वेबसाईट झाली बंद! पहा आता फॉर्म कोठे भरायचे?
- नवजात मुलींसाठी मिळणार शासनातर्फे 1 लाख रुपये! शिंदे सरकारची नवी योजना 2023
इंडिया पोस्ट ने रिक्त जागा भरण्या साठी ही महा भरती सुरू केली आहे, इच्शुक आणि पात्र अर्जदार विद्यार्थी या रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रकिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे, हा अर्ज तुम्ही स्वतः देखील अगदी भरू शकता कोणत्याही ऑनलाइन केंद्रावर फॉर्म भरण्यासाठी जाण्याची गरज नाही, या लेखामध्ये मी तुम्हाला मोबाईल वर इंडिया पोस्ट ऑफिस भरती application (gds online recruitment february 2023) कसे भरायचे ते सांगणार आहे.
इंडिया पोस्ट ऑफिस भरती प्रक्रिया संपूर्ण माहिती – GDS 2023 Post office Recruitment
इंडिया पोस्ट ऑफिस भरती PDF येथे डाऊनलोड करा
पोस्ट ऑफिस भरती अर्ज महत्वाच्या बाबी – important things for India post Recruitment 2023
- इंडिया पोस्ट GDS Recruitment साठी अर्जदाराने प्रथम notification PDF काळजी पूर्वक वाचली पाहिजे.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया या लेखात दिली आहे, त्याचा वापर करून काळजीपूर्वक अर्ज भरावा, अर्जात चूक केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- पोस्ट भरती साठी आवश्यक कागदपत्रे, आणि त्यांचा फॉरमॅट तपासून मोबाईल मध्ये कागदपत्रे save करने गरजेचे आहे. (मोबाईल द्वारे अर्ज भरण्यासाठी)
- फी भरल्याशिवाय तुमचा इंडिया पोस्ट GDS भरती अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- या भरती मध्ये केवळ एकाच जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता, अर्ज भरताना आपला जवळचा divison निवडावा.
- अर्ज भरण्यासाठी 100₹ फीस आहे, परंतु महिला, ट्रान्सजेंडर, SC, ST यांना कोणतीही फीस राहणार नाही.
- अर्जासाठी केवळ पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
- जेव्हा मेरिट मध्ये तुमचे नाव येईल, तेव्हा तुम्हाला कागदपत्रे सादर करण्यासाठी इंडिया पोस्ट द्वारे बोलावले जाईल.
- जर अर्जदार OBC किंवा EWS श्रेणी मधील असेल तर त्यांना सेंट्रल cast certificate काढावे लागेल.
- एकाच अर्जदाराने दोनदा फॉर्म भरला तर त्याचे दोन्ही फॉर्म reject केले जातात, त्यामुळे प्रथमच काळजीपूर्वक अर्ज भरावा.
- अर्ज भरताना 10 वि चे मार्क बरोबर टाका, बेस्ट five निवडू नका सर्व विषयांचे मार्क टाकने आवश्यक आहे.
- gds online apply 2023 last date 16 फेब्रुवारी, 2023 आहे, त्यामुळे अर्जदारांनी अर्ज लवकर भरून घ्यावा.
- gds recruitment 2023 vacancy संपूर्ण भारतासाठी 40,890 जागा आहेत, तर महाराष्ट्रात gds recruitment 2023 vacancy साठी 2508 जागा आहेत.
पोस्ट ऑफिस भरती 2023 Cut off किती लागेल (Post Office 2023 recruitment Cut off marks)
पोस्टात 40,000+ जागा निघाल्या आहेत, आणि या जागा 10 वीच्या मार्क वर आधारित आहेत. ज्या अर्जदाराला 10 विला मार्क जास्त असतील त्याला पोस्टात जॉब लागण्याचे चांसेस जास्त आहेत, यापूर्वी झालेल्या पोस्ट ऑफिस च्या भरतीसाठी कट ऑफ लागला होता 95+ मार्कचा.
यावर्षी देखील जागा मोठ्या प्रमाणात आहेत, सोबतच त्यासाठी अर्ज करणारे उमेदवार सुध्दा असंख्य आहेत. परंतु मागील वर्षाचा डेटा पहिला असता यावर्षी कदाचित कट ऑफ (Post Office 2023 recruitment Cut off marks) 85+ किंवा 90+ लागू शकते. यामधे 100% अचूक कट ऑफ मार्क सांगता येणार नाहीत परंतु किमान 85+ कट ऑफ लागेल हे तर निश्चित आहे.
पोस्ट ऑफिस भरती 2023 प्रेफरन्स जागा कशी निवडावी – what to fill in post preference in gds
post recrutment 2023 साठी apply करताना तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जागा कोणत्या निवडाव्या?(what to fill in post preference in gds)
अर्ज करत असताना अर्जदाराने जो जिल्हा निवडला आहे त्या जिल्ह्यातील जागा निवडत असताना, post preference मध्ये तुमच्या आवडी नुसार पोस्ट ऑफिस केंद्र निवडावे. post preference टाकताना जर तुम्हाला 5 ते 10 केंद्रात अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येकी पोस्ट ऑफिस समोर दिलेल्या रिकाम्या रखाण्यात 1, 2, 3,4… असे नंबर टाकायचे आहेत.
तुम्हाला ज्या पोस्ट ऑफिस मध्ये आपली निवड होईल असे वाटते! त्या त्या पोस्ट ऑफिस ला निवडून जास्त संभाव्यता असणाऱ्या पोस्ट ऑफिस केंद्रा समोर नंबर 1 टाका आणि त्यापेक्षा कमी वाटणाऱ्या ऑफिस समोर नंबर 2 टाका, अश्या तऱ्हेने तुम्ही gds 2023 form भरताना post preference टाकू शकता. ‘what to fill in post preference in gds’ याबद्दल अजून शंका असल्यास आम्हाला Comment करा.
पोस्ट ऑफिस भरती 2023 जिल्हानिहाय जागा (महाराष्ट्र)
जिल्हा | जागा | जिल्हा | जागा |
परभणी | 66 | नागपूर moffusil | 73 |
पंढरपुर | 66 | नांदेड | 42 |
पालघर | 59 | नाशिक | 33 |
उस्मानाबाद | 125 | नवी मुंबई | 38 |
अहमदनगर | 24 | पुणे east | 22 |
अकोला | 95 | पुणे west | 15 |
अमरावती | 90 | पुणे moffusil | 61 |
बारामती | 30 | रायगड | 156 |
बीड | 48 | रत्नागिरी | 100 |
भुसावळ | 60 | सांगली | 37 |
बुलढाणा | 50 | सातारा | 54 |
धुळे | 64 | श्रीरामपूर | 35 |
गोवा | 61 | सिंधुदुर्ग | 88 |
जळगाव | 71 | सोलापूर | 64 |
कराड | 37 | ठाणे | 37 |
कोल्हापूर | 103 | वर्धा | 52 |
मालेगाव | 65 | यवतमाळ | 99 |
ओरंगाबाद | 87 | चंद्रपूर | 40 |
मुंबई सिटी east | 01 | RMS LDN भुसावळ | 09 |
मुंबई सिटी north & west | 11 | RMS BM DN मिराज | 08 |
नागपूर सिटी | 04 |
पोस्ट ऑफिस GDS भरती तपशील
भरतीचे नाव: | इंडिया पोस्ट GDS भरती 2023 |
पदाचे नाव: | ग्रामीण डाक सेवक |
एकूण जागा: | 40,889 |
शैक्षणिक पात्रता: | अधिकृत बोर्डाद्वारे अर्जदार 10 वी पास असावा, इंग्रजी, गणित आणि मातृभाषा जसे- मराठी विषय पास असणे अनिवार्य आहे. अर्जदाराला बेसिक संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, अर्जदार MSCIT उत्तीर्ण असेल तर उत्तम. |
नोकरी ठिकाण: | संपूर्ण भारत |
वयोमर्यादा: | 18 ते 40 वर्षे |
कागदपत्रे: | आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, सही, 10 वी मार्कशिट. |
पगार: | 10 ते 12 हजार रुपये. (gds salary 2023) |
अर्ज शुल्क: | ₹100 (महिला, ट्रान्सजेंडर, SC, ST यांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही) |
अर्ज प्रक्रिया: | ऑनलाईन |
परीक्षा मोड: | लेखी परीक्षा होणार नाही, मेरिट लिस्ट नुसार अर्जदारांची निवड केली जाईल. |
अर्ज सुरू होण्याची तारीख: | 24 जानेवारी, 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 16 फेब्रुवारी, 2023 |
जाहिरात PDF: | येथे क्लिक करा |
फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट: | येथे क्लिक करा |
इंडिया पोस्ट अधिकृत वेबसाईट: | येथे क्लिक करा |
GDS पोस्ट भरती 2023 अर्ज प्रक्रिया (Step by step) – how to apply gds recruitment 2023 from mobile
- पोस्ट ऑफिस भरती साठी दिलेली अधिकृत वेबसाईट open करा, त्या नंतर आपले circle निवडा.
2) Registration या option वर क्लिक करा, नंतर जो tab उघडेल त्यावरील information fill करा.
3) Information fill केल्या नंतर submit या बटन वर क्लिक करा. (या सेक्शन मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी otp द्वारे valid करावा लागेल)
4) या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून, योग्य Resolution चा पासपोर्ट size फोटो,आणि पांढऱ्या पेज वर सही करून दिलेल्या सूचनांचे पालन करून अपलोड करायचं आहे.
5) सर्व माहिती योग्य आहे का ते तपासून सबमिट या बटन वर क्लिक करा.
6) वर दिलेले स्टेप पूर्ण केल्या नंतर तुमच्या मोबाईल वर एक मेसेज येईल, त्यातील रजिस्टर नंबर टाकून सर्कल निवडा आणि सबमिट करा.
7) मोबाईल वर आलेला otp टाकून next बटन वर क्लिक करा.
8) पुढच्या स्टेप मध्ये तुमचा पत्ता आणि शैक्षणिक माहिती भरावयाची आहे, 10 वी ला असलेले प्रत्येक विषयाचे मार्क अचूक टाकायचे त्यानंतर save and countine या बटन वर क्लिक करा.
9) या स्टेप मध्ये तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स निवडावे लागणार, पोस्ट प्रेफरन्स म्हणजे जॉब साठी विशिष्ट ठिकाणाला प्राधान्य देणे. Post preference मध्ये 1-2-3 असे अंक टाकावे, ज्या जॉब location ला तुम्हाला apply करायचं आहे ते निवडावे.
10) पोस्ट प्रेफरन्स सबमिट केल्या नंतर, मोबाईल स्क्रीन वर असा मॅसेज येईल Ok वर क्लिक करा.
11) show झालेल्या टॅब वरील सर्व माहिती काळजी पूर्वक तपासून घ्या.
12) सर्व माहिती तपासून झाल्यावर फॉर्म ची स्क्रीनशॉट काढून घ्या, अथवा Print या बटन वर क्लिक करून फॉर्म save करा.
अश्या प्रकारे तुमचे GDS Post office job recruitment 2023 साठिचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. मेरिट लिस्ट लागल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर त्यासंबंधी मॅसेज येईल.
ऑनलाईन फॉर्म मध्ये कुठेही डॉक्युमेंट लागणार नाही फोटो आणि सही सोडून, जेव्हा तुमचे selection होईल तेव्हा तुम्हाला document verification साठी बोलवलं जाईल.
टीप: वरील फॉर्म हा महिलांचा असल्याने (महिलांसाठी तसेच SC, ST वर्गातील अर्जदारांसाठी कोणतीही फी नाही आहे) यामध्ये फी भरण्यासाठी option आला नाही, तुम्ही अश्याच प्रकारे फॉर्म भरून फी चा option आल्या वर फी भरू शकता.
Post office भरती 2023 बद्दल विचारले जाणारे FAQ
Q : पोस्ट ऑफिस 2023 भरती साठी किती जागा निघाल्या आहेत?
Ans : संपूर्ण भारतात – 40,000+ आणि महाराष्ट्र – 2,500+
Q : पोस्ट ऑफिस भरती साठी पात्रता काय आहे?
Ans : उमेदवार 10 पास असावा, दहावीत मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित या विषयामध्ये पास असणे आवश्यक.
Q : 10 वी ला किती टक्के मार्क असल्यावर पोस्ट ऑफिस जॉब लागतो?
Ans : post office च्या प्रत्येक भरती मध्ये cut off marks बदलत असतात, परंतु जर तुम्हाला 10th मध्ये 70% च्या वर गुण असतील तर पोस्ट ऑफिस मध्ये तुमचा जॉब लागू शकतो.
Q : Post Office 2023 भरतीची शेवटची तारीख काय आहे?
Ans : 16 फेब्रुवारी, 2023