IPL 2023: आनंदाची बातमी! आता IPL चे सर्व सामने मोफत पाहता येणार, मोबाईल आणि टिव्ही वर सुध्दा

मित्रांना शेअर करा:

ipl-2023-live-streaming

IPL 2023 Live Streaming: नमस्कार मित्रांनो IPL 2023 ची सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता क्रिकेट प्रेमी खूप उत्साही आहेत आज पहिली मॅच होणार आहे. ती पाहण्यासाठी संपूर्ण देशभरात एकच जल्लोष होत आहे. पण त्याहुन अधिक आनंदाची बाब म्हणजे आता यावर्षीचा IPL सर्वांना फ्री मध्ये मोबाईलवर आणि टीव्हीवर दोन्हीमध्ये पाहता येणार आहे. ते पण Live Streaming आहे ना झक्कास! चला तर मग जाणून घेऊया तुम्ही टीव्हीवर आणि मोबाईलवर कशा पद्धतीने फ्री मध्ये IPL 2023 पाहू शकता.

मित्रांनो यापूर्वी जे कोणते IPL झाले ते सर्व Live पाहण्यासाठी चहात्यांना मोठी कसरत करावी लागायची, पैसे देऊन Live Streaming पहावी लागायची. परंतु आता 2023 मध्ये BCCI मार्फत एक मोठी ही घोषणा करण्यात आली आहे, त्यानुसार मोबाईल ॲप मार्फत देशभरातील चाहते IPL 2023 चा आनंद फ्री मध्ये घेऊ शकणार आहेत.

How to watch free IPL 2023 Live Streaming

चला तर आपण जाणून घेऊया! कोणत्या App द्वारे फ्री मध्ये IPL 2023 पाहता येईल, आणि त्याचा वापर मोबाईल मध्ये आणि TV मध्ये कसा करता येईल.

तर मित्रांनो मोबाईल साठी तुम्हाला Play Store वर जाऊन Jio Cinema ॲप डाऊनलोड करायचा आहे, App Open केल्यानंतर एकदम वरच्या बाजूला ज्या Slide असतील त्या स्लाईडमध्ये IPL 2023 वर क्लिक करायचे आहे. तुम्ही थेट IPL 2023 Live stream वर जाल, अशा तऱ्हेने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवर फ्री मध्ये IPL 2023 Live Streaming पाहू शकता.

हे पण वाचा: UPI Charges बद्दल सविस्तर माहिती, किती रुपये Transfer केल्यावर चार्ज लागणार

जर तुम्हाला टीव्हीवर फ्री मध्ये Live Streaming पहायची असेल तर त्यासाठी दोन पर्याय आहेत.

एक म्हणजे तुम्ही Star Ustav Movies या चॅनेलवर जाऊन फ्री मध्ये IPL 2023 पाहू शकता.

किंवा जर तुमच्याकडे Android TV असेल तर तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन Jio Cinema ॲप डाऊनलोड करू शकता. मोबाईल मध्ये ज्या प्रकारे IPL 2023 Live Streaming पाहिली, त्याच प्रकारे तुम्ही टीव्ही मध्ये देखील IPL 2023 Live Streaming पाहू शकता.

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी IPL 2023 Live Streaming बद्दलची माहिती. मोबाईलवर आणि टीव्हीवर फ्री मध्ये IPL 2023 Live stream कशी बघायची? हे तुम्ही या पोस्टमध्ये जाणून घेतले आहे. त्यामुळे ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा, आणि त्यांना पण ही फ्री IPL Live Streaming चा आनंद अनुभव करून द्या. धन्यवाद!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *