कांदा अनुदान 2023: नमस्कार मंडळी agrobharti मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे, आज आपण कांदा अनुदान 2023 बद्दल माहिती घेणार आहोत. विधानसभेत कांद्याला अनुदान देण्यासंबधी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. चला तर जाणून घेऊया कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती रुपये अनुदान मिळणार आहे.
कांदा अनुदान 2023 महाराष्ट्र
Table of Contents
महाराष्ट्र शासनाद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, अनुदान जाहीर केले आहे. प्रति क्विंटल 300 रुपये अशा स्वरूपाचे कांद्याला अनुदान मिळणार आहे. कालच्या विधानसभा अधिवेशनात शिंदे सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा: मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बांधवांना मिळणार, नुकसान भरपाई प्रत्येकी 6 लाख रुपये
कांद्याचे बाजारभाव सुस्थितीत यावे यासाठीचे हे पाऊल, राज्य शासनाने घेतल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कांदा 1 रुपये किलो एवढ्या नीच्चांकी दरावर विकावा लागतो आहे. लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने, बळीराजा मायबाप सरकार कडे कांदा बाजारभाव वाढविण्यासाठी मागणी करतो आहे.
नवीन कांदा अजून बाजारात नीट आला सुध्दा नाही, आणि एवढा बाजारभाव खाली आला! यासाठी विधानसभेत विरोधी पक्षाने आवाज उठवला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत कांद्याला 300 रुपयांचा प्रती क्विंटल अनुदान जाहीर केला आहे.
कांदा अनुदान 2023 – 600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांनी कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केल्या नंतर, विधानसभा गृहात विरोधी पक्ष नेत्यांनी कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा: नांदेड मधील या शेतकऱ्यांना मिळणार, सरकट कर्जमाफी!
शासनाच्या या नव्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, किंवा नाही हे वेळच सांगेल. पण आता नाफेड कडून कांद्याची खरेदी करा अशी मागणी वाढली असून, कांद्याला बाजारभाव केव्हा मिळेल! याचीच शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
कांदा इतर पिका प्रमाणे जास्त काळ टिकत नाही, तो नाशवंत असतो. त्यामुळे सरकारने कांदा बाजारभाव संबंधी काही ठोस निर्णय घ्यावेत असे स्तरावरून सांगितले जात आहे.
बांधवांनो ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, आणि अशाच नवीन अपडेट साठी आमच्या Agrobharti वेबसाईट ला भेट देत रहा.