90% शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार नाही! शिंदे सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या माहिती | kanda anudan news

मित्रांना शेअर करा:

kanda-anudan-news

kanda anudan news: नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, कांदा अनुदान 2023 संबंधी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तब्बल 90% शेतकऱ्यांना कांदा अनुदान भेटणार नाही असे सांगण्यात आले आहे.

शेतकरी मित्रांनो शासनाने कांदा अनुदान देण्यासाठी काही नवे नियम लागू केले आहेत, त्या नुसार ही माहिती सांगण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही तर या 90% शेतकऱ्यांमध्ये येत नाही ना! नक्की कोणते कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी पात्र असणार आहेत, आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत याबद्दल पोस्ट मध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. (kanda anudan news)

कांदा अनुदान 2023 महाराष्ट्र अटी आणि शर्ती (नवीन अपडेट) kanda anudan news

कांदा अनुदान 2023 साठी अर्ज दिनांक 3 एप्रिल पासून सुरू होणार आहेत, त्या अगोदर शासनाने अनुदानासाठी नियम व अटी जाहीर केल्या आहेत. या सर्व अटी पैकी सर्वात महत्वाची अट म्हणजे कांदा अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने सातबाऱ्यावर पिक पेऱ्याची नोंद केलेली असावी. ज्या शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्यांची नोंदणी सातबाऱ्यावर केली नाही अशांना कांदा अनुदान मिळणार नाही. [kanda anudan news]

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीक पेऱ्याची नोंद असेल तरच कांदा अनुदान देण्याच्या अटीमुळे 90% टक्के कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदान योजनेपासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अटीमध्ये सुधारणा करण्यासाठी आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे पत्र देऊन लक्ष वेधले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी 7/12 उताऱ्यावर पीक पाहणीची (पीक पेऱ्याची नोंद असावी अशी अट आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी ॲपमध्ये रब्बी हंगाम 2022-23 मध्ये कांदा पिकाची नोंद केलेली आहे, अशाच व्यक्तींच्या 7/12 वर कांदा पीक येईल. मात्र, सुमारे 10 टक्के शेतकऱ्यांनी उताऱ्यावर ई-पीक पेरे लावलेले नाहीत. त्यामुळे ज्यांच्या जवळ कांदा विक्री पट्टी, विक्री पावती आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी पात्र समजण्यात यावे, असे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. {kanda anudan news}


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *