kisan pushpak yojana 2023: मित्रांनो किसान पुष्पक योजना ही शेतकऱ्यांना Drone loan मिळवून देण्यासाठी राबवली आहे, union bank of India यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे.
मुळात ही योजना शेतीला डिजिटल करण्यासाठी बनवली गेली आहे, देशात राबवण्यात येणाऱ्या या किसान पुष्पक योजने अंतर्गत 150 ड्रोन साठी युनियन बँक कर्ज देणार आहे. गरुड एरोस्पेस या कंपनी मार्फत हा उपक्रम चालवला जात आहे, याच कंपनीने युनियन बँकेशी ड्रोन कर्जासाठी करार केला आहे.
शेतकऱ्यांचे शेतीचे काम सुलभ व्हावे यासाठी ड्रोन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात आणन्याचा देशातला हा एक अभिनव उपक्रम आहे. गरुड एरोस्पेस च्या करारा नुसार किसान पुष्पक योजनेसाठी 150 ड्रोन ची मंजुरी देण्यात आली आहे.
ड्रोनचा शेती मध्ये कशा साठी वापरले जाणार
Table of Contents
शेतकऱ्यांना पूर्ण शेतात खते, कीटनाशक स्वतः हुन टाकावी लागतात, जास्त शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ फवारणी करण्यासाठीच खूप वेळ लागतो आणि श्रम पण लागते. यावर ड्रोन शेतकऱ्यांचा एक मोठा उपाय बनू शकतो, ड्रोन द्वारे कोणतेही शारीरिक कष्ट न घेता शेतकरी फवारणी आणि खते शेतीला पिकांना देऊ शकतो, सोबतच शेतकऱ्यांचे काम देखील जलद होते.
या एक रक्कमी गुंतवणुकी मुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच ही किसान पुष्पक योजना शासनाने बनवली आहे. मोठ्या शेतकऱ्यांना ड्रोनचा खूप फायदा होऊ शकतो, शेती साठी एक प्रकारे ड्रोन तंत्रज्ञान वरदान ठरू शकते.
किसान पुष्पक योजना संपूर्ण माहिती
केंद्र शासनाने पुढाकार घेऊन किसान पुष्पक योजनेला सर्व प्रथम कर्ज पुरवठा केला आहे, जुलै 2022 ला केंद्रीय कृषी मंत्रालया कडून किसान पुष्पक योजने साठी 1 हजार कोटी ची तरतूद केली होती. ‘ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ च्या (एआयएफ) माध्यमातून शासनाने हा निधी दिला आहे.
AIf च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गरुड ड्रोन वर 3 महिन्याच्या हप्त्यावर सूट देण्यात आली आहे. तसेच तरुण शेतकऱ्यांना 5% व्याज दरावर 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे.
युनियन किसान पुष्पक योजना कर्ज
शासना बरोबर आता युनियन बँक ऑफ इंडियाने देखील, शेती ड्रोन मय करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गरुड एरोस्पेस कंपनीच्या करारामुळे शेतकऱ्यांना 150 ड्रोनचा फायदा होणार आहे. युनियन बँक स्वतः शेतकऱ्यांना गरुड ड्रोन साठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
गरुड एरोस्पेस कंपनी देशातील 1 लाख तरुणांना ड्रोनचे प्रशिक्षण देणार आहे, आणि 31 मार्च 2023 पर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना 5 हजार ड्रोन विक्रीचे नियोजन कंपनी द्वारे करण्यात आले आहे.
किसान पुष्पक योजना पात्रता अटी आणि तरतुदी
अर्जदार शेतीचा मालक असावा.
अर्जदारा कडे रिमोट पायलट परवाना असणे आवश्यक.
अर्जदार 10 वी उत्तीर्ण असला पाहिजे.
अर्जदार शेतकऱ्याचे वय 25 ते 60 दरम्यान असावे.
युनियन बँकेतून ज्यांनी कृषी कर्ज घेतले आहे त्यांना प्राधान्य.
कागदपत्रे आणि इतर सूचनांसाठी जवळच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संपर्क साधावा.
किसान पुष्पक योजना कर्ज रक्कम, तारण, मुदत, पेमेंट
शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 ड्रोन खरेदी करता येणार आहेत, त्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया शेतकऱ्याला गरुड ड्रोन च्या मूळ किमतीच्या 75% रक्कम दिली जाणार आहे. गरुड ड्रोन खरेदी करण्यासाठी देण्यात येणारे कर्ज मुदत कर्ज आहे, कमाल कर्जाची रक्कम ही 20 लाख रुपये आहे.
बँके द्वारे योजने साठी सर्व प्रकारची आवश्यक process केली जाणार, कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्याला तारण स्वरूपात बँके कडे काही तरी गहाण ठेवावे लागेल. तारण ठेवलेल्या वस्तू अथवा गोष्टीचे मूल्य कर्ज रकमेच्या 100% अधिक असणे अनिवार्य आहे.
कर्जाची रक्कम अर्जदार शेतकऱ्यांना NEFT किंवा RTGS द्वारे दिली जाणार आहे. कर्ज परतफेड कलावधी जास्तीत जास्त 3 वर्षांचा असेल, कर्जाचे व्याज हे मासिक स्वरूपात भरावे लागणार.