केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री कुसुम योजना, नव्याने महाराष्ट्रात सुरू केली आहे. Maha urja पोर्टल वर योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
PM kusum योजनेच्या पुढील टप्प्या अंतर्गत सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी 17 मे रोजी पोर्टल वर अर्ज स्वीकृती चालू केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करत, लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.
योजनेचे नाव: प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना 2023
पायरी : दुसरा टप्पा
लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अधिकृत वेबसाईट : https://mnre.gov.in/
महाराष्ट्र कुसुम सोलार पंप वेबसाईट : https://mahaurja.com/meda/en/node
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कागदपत्रे (Documents)
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- नोंदणीची प्रत
- अधिकृतता पत्र
- जमिनीच्या जमाबंदीची प्रत
- चार्टर्ड अकाउंटंटने जारी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र (प्रकल्प विकासकाद्वारे विकसित झाल्यास)
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
कुसुम सोलर पंप योजना अर्ज प्रक्रिया (फॉर्म)
सर्वप्रथम Maha Urja Official Website ला भेट द्या, अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करून पहा.
संकेतस्थळावर पोहोचल्या नंतर तुमच्या समोर कुसुम योजनेसाठी अर्ज करा, असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना साठीचा फॉर्म अर्ज प्रदर्शित होईल.
अर्ज आल्या नंतर तुम्हाला त्या अर्जावर सांगण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
कुसुम सोलार पंप योजना साठीचा अर्ज (फॉर्म) भरताना कोणतीही चूक करायची नाही, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेले सर्व कागदपत्रे Documents अपलोड करायचे आहेत.
मग फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटण वर क्लिक करायचे आहे.
तुमचा कुसुम सोलार पंप योजना साठी अर्ज पूर्ण होईल, यानंतर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर किंवा ईमेल दिला आहे. त्यावर तुम्हाला Confirmation साठी Massage येईल.
अशा प्रकारे अगदी सहज तुम्ही कुसुम सोलार पंप योजना साठी अर्ज करू शकाल. वरील स्टेप वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकता.