lek ladki yojana 2023 Maharashtra आता या मुलींना मिळणार 98 हजार रुपये; महाराष्ट्र शासनाची नवीन योजना जाहीर!
lek ladki yojana 2023: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींसाठी एक मोठी घोषणा केली आहे, त्याद्वारे त्यांनी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू करण्यात येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे हा शासनाचा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील अर्धी लोकसंख्या या योजनेसाठी लाभार्थी ठरणार आहे, राज्य शासनाचा स्त्री सक्षमीकरणावर जास्त जोर असल्यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे. महिला दिनाच्या पर्वावर या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.
महिलांसाठी लेक लाडकी योजनेप्रमाणेच अर्थसंकल्पामध्ये अनेक बाबी समाविष्ट केल्या आहेत. त्यापैकी काही म्हणजे चौथे महिला धोरण राबवण्याचा निर्णय, एसटी बस मध्ये महिलांना तिकिटावर सरसकट 50 टक्के सवलत. मुलींसाठी ज्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ झाला आहे त्या योजनेबद्दल आज आपण या पोस्टमध्ये माहिती घेऊया.
लेक लाडकी योजना 2023 संपूर्ण माहिती (Lek ladki yojana information in Marathi)
Table of Contents
माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या लेक लाडकी योजनेद्वारे मुलींना सक्षम होण्यासाठी एक प्रकारे संधी मिळाली आहे. लेक लाडकी योजनेमध्ये मुलींना त्यांच्या कुटुंबाच्या रेशन कार्ड वरून; मदत किती आणि कशी होणार हे ठरवले जाणार आहे. केशरी आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारक मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र (Lek Ladki Yojana Mahiti)
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
घोषणा कोणी केली | महाराष्ट्र शासन (उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस) |
योजनेची सुरुवात केव्हा झाली | 9 मार्च, 2023 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुली |
उद्देश | मुलींचे सक्षमीकरण करणे, आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे. |
हेल्पलाईन नंबर | NAN |
अधिकृत वेबसाईट | NAN |
शासन निर्णय | NAN |
अधिकृत माहिती जारी झाल्या नंतर वेबसाईट वर अपडेट केले जाईल.
लेक लाडकी योजना काय आहे? (What is Lek Ladki Yojana in Marathi)
लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) महाराष्ट्र शासनाची एक अभिनव योजना ठरणार आहे, या योजनेमुळे स्त्रियांचे तथा मुलींची सबलीकरण होण्यास मदत होणार आहे. चौथ्या महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत नक्कीच मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत.
ही योजना मुलींना आर्थिक मदत करणार आहे; या योजनेद्वारे ज्या पाल्यांना मुली आहेत, त्यांना त्यांच्या मुलींच्या नावे ठराविक रक्कम आर्थिक मदत केली जाणार आहे. जेणेकरून मुलींचे शिक्षण तसेच त्यांचे सबलीकरण यात तडजोड होणार नाही.
लेक लाडकी योजनेचा उद्देश (Lek Ladki Yojana goal)
महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलींना सक्षम करणे हा आहे. ही योजना मुलींच्या भविष्यासाठी आणि शैक्षणिक बाबींसाठी वरदान ठरणार आहे. लेक लाडकी योजनेची काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे.
- मुलींना आर्थिक मदत करणे
- मुलींचे सबलीकरण करणे
- मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
- मुलींना सक्षम करणे.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळेल? (Who will get Benifit from Ladki lek yojana Maharashtra)
- केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना या लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे.
- केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्यांना 5,000 रुपये सहायता राशी देण्यात येईल.
- जेव्हा मुलगी शाळेत जाउ लागेल, तेव्हा तिला पहिली साठी राज्य शासनाद्वारे 4,000 रुपये मिळतील.
- मुलगी सहावीत गेल्यानंतर तिला 6,000 रुपये सहायता राशी मिळणार आहे.
- तसेच मुलीचा प्रवेश अकरावी मध्ये झाल्यास तिला 8,000 रुपये मिळणार आहेत.
- आणि जेव्हा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिला राज्य शासनाद्वारे तब्बल 75 हजार रुपये दिले जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे मुलींना एकूण आर्थिक मदती 98 हजार रुपयांची होणार आहे, 18 वर्षाच्या अगोदर एकूण आर्थिक मदत 23 हजार रुपये असणार आहे. 18 वर्षे झाल्यानंतर मुलीला राज्य शासनातर्फे 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम मुलीच्या बँक अकाउंट वर राज्य शासनातर्फे थेट जमा होणार आहे.
लाडकी लेक योजना पात्रता (Ladki lek yojana Elegeblity Criteria)
- लाडकी लेक योजने चा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा.
- मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
लेक लाडकी योजनेसाठी मुख्य पात्रता ही एकच; ती म्हणजे कुटुंब हे केशरी आणि पिवळे शिधापत्रिका धारक (रेशन कार्डधारक) असावे. त्याखेरीस पात्रता निकष हे शिथील आहेत, फक्त शिधापत्रिका केशरी किंवा पिवळी असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड आहे, त्या कुटुंबातील मुलगी लेक लाडकी (lek ladki yojana) या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
लेक लाडकी योजना कागदपत्रे (Lek Ladki Yojana Maharashtra Document)
- मुलीचे आधार कार्ड ओळखपत्र
- आईचे वडिलांचे किंवा मुलीचे बँक पासबुक.
- केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
योजनेसाठी अर्ज करत असताना वरील (lek ladki yojana Document) कागदपत्रे अर्जदाराला सादर करणे आवश्यक आहेत.
हे पण वाचा: नमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2023
लेक लाडकी योजना शासन निर्णय Pdf (Lek Ladki Yojana 2023 PDF Download)
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 साठी, अधिकृतरित्या अजून शासन निर्णय जाहीर झालेला नाही. योजनेची घोषणा ही 9 मार्चला करण्यात आलेली आहे, त्यामुळे सध्या लेक लाडकी योजना lek ladki yojana ही नव्याने सुरुवात केलेली योजना असून; त्यासंबंधी शासनाद्वारे अपडेट आले नाही. ज्यावेळी शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय येईल, त्यावेळी आम्ही वेबसाईटवर शासन निर्णय pdf टाकू.
हे पण वाचा: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023
लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय केव्हा येणार? (When will lek ladki yojana GR Come)
लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेली आहे, त्यामुळे या योजनेसाठी शासनाचा शासन निर्णय घेण्यास वेळ लागू शकतो. कदाचित (अंदाजे) एका महिन्यामध्ये लेक लाडकी योजनेसाठी शासन निर्णय पारित होऊ शकतो.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? (lek ladki yojana online apply)
ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे, त्या कुटुंबातील मुलींना या लाडकी लेक योजनेचा लाभ मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये ही योजना राबवली जाणार आहे. (Maharashtra budget 2023) दिनांक 9 मार्च रोजी लाडकी लेक योजना “ladki lek yojana Maharashtra” माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मांडली.
हे पण वाचा: लेक लाडकी योजने बद्दल शिंदे सरकारचा नवा निर्णय
लेक लाडकी योजना वेबसाईट (Lek Ladki Yojana Official Website)
Lek ladki yojana Maharashtra ही योजना सध्या नवीन आहे, या योजनेसंबंधी अजूनही कोणत्याही स्वरूपाचे अधिकृत पोर्टल किंवा संकेतस्थळ निर्माण केले गेले नाही. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी lek ladki yojana 2023 online apply करता येणार नाही.
योजनेसंबंधी लवकरच राज्य शासनाद्वारे शासन निर्णय प्रसिद्ध होईल, तेव्हा राज्यातील पात्र अर्जदार लाडकी लेक योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. लवकरच लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरणे सुरु होणार आहेत.
लेक लाडकी योजना ऑनलाइन फॉर्म (Lek Ladki Yojana form)
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन एप्लीकेशन करायचा असल्यास, तुम्हाला सर्वप्रथम त्यासंबंधी फॉर्म PDF डाउनलोड करावी लागेल; आणि फॉर्म fill करून, सर्व कागदपत्रे ऑनलाइन फॉर्म ला जोडून अधिकृत पोर्टलवर ती सबमिट करायचे आहे. फॉर्म भरत असताना वडिलांची नाव, आईचे नाव, मुलीचे नाव, मुलीची जन्म तारीख, मोबाईल नंबर हे सर्व फॉर्म वर टाकणे अनिवार्य आहे.
Lek Ladki Yojana बद्दल विचारले जाणारे प्रश्न FAQ
लेक लाडकी योजना द्वारे मुलींना किती रुपये मिळणार?
एकूण 98 हजार रुपये, अठरा वर्षांपर्यंत 23 हजार रुपये तर अठरा वर्षे झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जाणार. लाभ कसा घ्यायचा जाणून घ्या.
लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहेत?
ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र आहेत. कोणत्या मुली अपात्र असणार पहा.
लेक लाडकी योजना कोणी घोषित केली?
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली. का घोषित केली पहा.
लेक लाडकी योजना साठी चे अधिकृत संकेत स्थळ कोणते?
लेक लाडकी योजनेसाठी कोणते स्वरूपाच्या अधिकृत संकेतस्थळ बनवली गेली नाही त्यासंबंधी अपडेट आल्यावर तुम्हाला माहिती मिळेल. फॉर्म कसा भरायचा पहा.
लेक लाडकी योजना काधी सुरू होणार
शासनाकडून GR आल्यानंतर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. अजून शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला नाही.
Ladki lek from
Koshti gali daraga road paranda