मोबाईल वरून फक्त 1 मिनिटात, पॅन आणि आधार कार्ड लिंक करा! | How to link pan with aadhaar in marathi

मित्रांना शेअर करा:

link-pan-with-aadhaar-marathi

How to link pan with aadhaar: नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड संबंधी महत्त्वाची माहिती घेणार आहोत, आधार कार्ड ला पॅन कार्ड मोबाईल मधून कसं लिंक करायच? हे आपण पाहूया त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे, त्यासंबंधी सरकार द्वारे नागरिकांना आवाहन देखील करण्यात आले होते. दिनांक 30 जून पर्यंत नागरिकांना आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करता येणार आहे. त्यानंतर ज्या लोकांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केलेले नाही, अशा लोकांना सरकार द्वारे दंड लावण्यात येणार आहे.

म्हणजेच आता लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्यावे लागेल. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला फ्री मध्ये आधार आणि पॅन कार्ड कसे लिंक करायचं हे सविस्तर असे सांगितले आहे.

सोबतच How to link pan with aadhaar प्रक्रिया तुम्ही मोबाईलवर करू शकणार आहात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नाही किंवा कोणत्याही ऑनलाईन केंद्रावर जाण्याची गरज नाही मोबाईलवर खाली दिलेल्या स्टेप वापरून पॅन कार्ड  आधार कार्ड ला लिंक करा.

चला तर आता जाणून घेऊया पॅन कार्ड ला आधार कार्डशी कसे लिंक करायचे.

पॅन कार्ड ला आधार कार्ड कस लिंक करायचे? Step by step guide in Marathi

सर्वात आधी तुम्हाला income tax department च्या www.incometax.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

वेबसाईट उघडल्यानंतर डॅशबोर्ड वर दिलेल्या Link Aadhar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. हा पर्याय तुम्हाला वेब पेज च्या उजव्या बाजूला सापडेल.

Link Aadhar या पर्याया वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यावर एक form असेल तो तुम्हाला fill करायचा आहे. (How to link pan with aadhaar)

फॉर्ममध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, संपूर्ण नाव अशी माहिती अचूक भरायची आहे.

माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म च्या खाली दिलेल्या लिंक आधार या बटनावर क्लिक करायचे आहे.

नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला फॉर्म च्या खाली रिकाम्या डब्यामध्ये टाकायचा आहे.

OTP Verification झाल्यानंतर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक होतील.

परंतु जर तुमचे आधार आणि पॅन कार्ड अगोदरच लिंक असतील तर डॅशबोर्ड वर तसा मेसेज येईल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे, या तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. अन्यथा तुम्हाला 1000 हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. {How to link pan with aadhaar}

हे पण वाचा: घरगुती गॅस सिलेंडर इतके स्वस्त होणार! पुन्हा सबसिडी योजना सुरू

How to check Pan Aadhar link status (step by step guide in Marathi)

आधार आणि पॅन कार्ड लिंक असेल किंवा आता तुम्ही लिंक केले असेल, तर तुम्हाला तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक चे स्टेटस पाहावे लागेल. म्हणजेच तुमचे आधार आणि पॅन कार्ड आतापर्यंत लिंक झाले आहे की नाही? हे तुम्हाला कळेल त्याच्या स्टेप खालील प्रमाणे आहेत.

वेबसाईटवर उजव्या बाजूला Link Aadhar status वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, तेथे तुम्हाला आधार नंबर आणि पॅन नंबर टाकायचा आहे. आवश्यक सूचनांचे पालन करायचे आहे.

नंतर खाली दिलेल्या View Link Aadhar status या बटण वर क्लिक करायच आहे.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन Tab उघडेल, त्यामध्ये तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक संबंधित संपूर्ण माहिती प्रदर्शित होईल.

तुमच्या आधार आणि पॅन कार्ड लिंक झाले असेल, किंवा अजून Pending असेल तर त्या प्रकारचा मेसेज तुम्हाला तेथे Show होईल.

जर तुम्ही आत्ताच आधार आणि पॅन कार्ड लिंक केला असेल, तर ते Approve होण्यासाठी काही अवधी लागतो. तुम्ही या स्टेप वापरून काही वेळानंतर पुन्हा एकदा आधार लिंक स्टेटस पाहून घ्या.

मित्रांनो आधार आणि पॅन कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्या, 30 जून, 2023 नंतर सरकार द्वारे दंड लावण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर या पोस्टमध्ये दिलेल्या step वापरून तुमच्या मोबाईलवरून तुमचा दोन मिनिटांचा वेळ काढून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या.

हे पण वाचा: पोस्टाद्वारे सर्वाँना मिळणार 20 लाख रुपयांचा अपघाती विमा! येथे करा अर्ज

तुमचे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड लिंक करा, सोबतच तुमच्या कुटुंबातील आई-वडिलांचे, भाऊ बहिणीचे देखील आधार व पॅन कार्ड लिंक करून घ्या. कारण एका व्यक्तीला एक हजार रुपये दंड लावण्यात येणार आहे.

तर मित्रांनो [How to link pan with aadhaar] संबंधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा, आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी माहितीसाठी आमच्या Agrobharti वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *