राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.
शिंदे शिवसेना आणि भाजप सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. शेतीक्षेत्रासाठी काय तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्यात पाहूया.
अर्थसंकल्पातील शेती क्षेत्रासाठी प्रमुख तरतुदी- Maharashtra Budget 2023
राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत राज्य सरकार ६ हजार रुपये प्रतिवर्षी देणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या ६ हजार रुपये अनुदाना राज्य सरकार ६ हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सहा हजार रूपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रूपये असे एकूण १२ हजार रूपये दरवर्षी मिळणार आहेत. (Maharashtra Budget 2023)
- शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.
- राज्यात गोपीनाथ मुंडे अपघात योजना राबवण्यात येणार
- सेंद्रिय शेतीसाठी एक लाख कोटीची तरतूद करण्यात आली.
- शेळी, मेंढी पालनासाठी राज्य सरकारची १० हजार कोटी बिनव्याजी कर्जाची तरतूद
- ८६ हजार कृषी पंपाना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार
-कोकणातील नदीजोड प्रकल्पातून नदी मराठवाड्यातून आणणार - धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी १५ हजार मदत देण्यात येणार आहे.