महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2023 | शेळ्या आणि बोकड 50% अनुदानावर मिळणार!

मित्रांना शेअर करा:

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यांमध्ये शेळीपालन अनुदान योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्जदारांना शेळी आणि बोकड 100% अनुदानावर दिले जाणार आहे. यासाठी काही जिल्ह्यांची निवड केली आहे, सोबतच नवीन GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत.

महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना 2023

मराठवाडा पॅकेज च्या धर्तीवर शेळीपालन अनुदान योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात धाराशिव, यवतमाळ, गोंदिया आणि सातारा या जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे.

आणि पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड आणि भंडारा या जिल्ह्यासाठी शेळीपालन अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत 20 शेळी आणि 2 बोकड गटानुसार वाटप केले जाणार आहे. 2023 मध्ये या योजनेला लागू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

शेळी पालन अनुदान योजना शासन निर्णय 2023

शेळीपालन अनुदान योजनेसाठी ज्या अर्जदारांनी अर्ज केला आहे, त्यांना गटानुसार शेळ्या अनुदानावर दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने GR शासन निर्णय काढला आहे, गटानुसार अपेक्षित खर्च हा 2 लाख 31 हजार 400 रुपये इतका असणार आहे.

शेळी गटाची स्थापना केल्या नंतर सुरुवातीला शासनाकडून या योजनेअंतर्गत, लाभ मिळवण्यासाठी वित्तीय संस्थे द्वारे 50% निधी कर्ज स्वरूपात घेणे आवश्यक आहे. त्यानंतर योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रत्यक्ष कर्ज रकमेवर 1 लाख 15 या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.

वर सांगितल्याप्रमाणे शेळी अनुदान योजना ही महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. यामध्ये 1) धाराशिव, 2) यवतमाळ, 3) गोंदिया, 4) सातारा, 5) बीड, 6) भंडारा 7) जालना

शेळी पालन अनुदान योजना साठी शासन किती अनुदान देणार?

प्रति शेळी गटासाठी योजनेद्वारे प्रत्यक्ष खर्चाच्या 50% आणि कमाल मर्यादा 1 लाख 15 हजार या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.

तपशील दर एकूण किंमत
2 शेळ्यांची खरेदी. ₹6,000. ₹1,20,000
2 बोकड खरेदी. ₹8,000. ₹16,000
शेळ्यांचा वाडा (450 चौ. फुट) ₹292 (चौ. फुट). ₹94,400
एकूण. ₹2,31,400

गटाचे स्वरूप गटाची किंमत. 50% अनुदान रक्कम
20+2 शेळी गट वाटप. ₹2,31,400. ₹1,15,700

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी शेळीपालन अनुदान योजनेविषयीची माहिती. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल, अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *