Maharashtra Havaman Andaj : येत्या काही दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र तरीही महाराष्ट्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. यामुळे राज्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. राज्यात जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस झाला. सुरुवातीला जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला. जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा राज्यात पावसाचा मोठा खंड पडला. यामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली.
अशीच काहीशी परिस्थिती मध्य महाराष्ट्रात पण पाहायला मिळाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. पण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस झालेला नाही. यामुळे तिथे पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. परिणामी तेथील जनता आणि शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आले आहेत. कमी पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती तर आहेच शिवाय आगामी काही दिवस पाऊस पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील अहिराणी वर येण्याची भीती आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर येत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर या काळात मराठवाडा विभागामध्ये 613 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. पण यावर्षी पावसाची मोठी निर्माण झाली असून आत्तापर्यंत फक्त 464 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात मराठवाडा विभागात तीन दिवस चांगला पाऊस झाला होता. यामुळे तेथील शेतकऱ्यांना आणि खरिपातील पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
मात्र असे असले तरी ऑगस्ट आणि जून महिन्यात तसेच जुलै महिन्यात देखील चांगला पाऊस झाला नसल्याने मराठवाडा विभाग अजूनही तहानलेलाच आहे. दरम्यान तहानलेल्या मराठवाड्याला आता दिलासा मिळणार आहे. कारण की आगामी काही दिवस मराठवाडा विभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रवात परिस्थिती तयार झाली असल्याने तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. याचा परिणाम म्हणून मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 तारखेला हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच २२ आणि २३ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे.
या काळात वाऱ्याचा वेग मात्र अधिक राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असे सांगितले जात आहे. हवामान तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात चक्रवात निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. तसेच 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत होणाऱ्या पावसामुळे विभागातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघेल असा आशावाद देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे.