Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 – (कागदपत्रे, हॉस्पिटल लिस्ट, अर्ज प्रक्रिया)

मित्रांना शेअर करा:

Mahatma Phule Jan Arogya Yojana माहिती मराठी, टोल फ्री नंबर, नाव नोंदणी, hospital list, surgery list, disease list, online application, registration, Mahatma Phule Jan Arogya Yojana in Marathi, महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी, wikipedia, शासन निर्णय, योजना माहिती

मित्रांनो आज आपण फुले जन आरोग्य योजना बद्दल माहिती घेणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा नाव नोंदणी कशी करायची त्याचबरोबर हॉस्पिटल लिस्ट आणि आजार लिस्ट हे देखील आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे कृपया महात्मा फुले जन आरोग्य योजना 2020 साठी ची माहिती संपूर्ण वाचा.

mahatma-phule-jan-arogya-yojana-2023

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 in Marathi (माहिती मराठी)

योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
विभागआरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात1 एप्रिल, 2017
घोषणाकेंद्र सरकार / राज्य सरकार
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभमोफत आरोग्य सुविधा
योजनेचा उद्देशगरीबांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे
अर्ज पद्धतीऑनलाईन
हेल्पलाईन टोल फ्री नंबर1800 233 2200
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

Mahatma Phule Jan Arogya Yojana Objectives (उद्देश)

महात्मा फुले जन आरोग्य योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी सुरू केलेली आहे, या योजनेचा उद्देश गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणे आहे. या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतात, शस्त्रक्रिया – प्रत्यारोपण थेरपी सारखे महागडे उपचार या योजनेच्या अंतर्गत गरिबांना मिळणार आहेत. सोबतच ही योजना सरकारी दवाखान्यांमध्ये राबवली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे देण्याची गरज भासणार नाही; याचा अर्थ नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत. परंतु सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही योजना खाजगी दवाखान्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये देखील सुरू करण्यात आलेली आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Eligibility (पात्रता निकष)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना साठी अधिकृतरित्या पात्रता निकष जारी केले आहेत, या योजनेमध्ये ज्यांना सामील व्हायचे आहे त्यांना खालील पात्रता अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना पात्रता निकष पुढीलप्रमाणे.

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
 • अर्जदाराचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे.
 • अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे.
 • नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
 • कुटुंबात दोन पेक्षा अधिक अपत्य असू नयेत.
 • महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Documents (कागदपत्रे)

 • आरोग्य प्रमाणपत्र
 • 3 पासपोर्ट साईज फोटो
 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • वयाचा दाखला
 • उत्त्पन्न प्रमाणपत्र
 • शहरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्याजवळील सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
 • गावातील उमेदवारांना शासकीय आरोग्य शिबिरात जाऊन आपल्या आजाराची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
 • यानंतर अर्जदाराला आपल्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी लागेल.
 • आजाराची पुष्टी झाल्यानंतर आजाराचा तपशील आणि खर्चाचा तपशील आरोग्य मित्राकडून नोंदविला जाईल.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Online Application (अर्ज प्रक्रिया) नाव नोंदणी

 1. प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे, होम पेजवर आल्यानंतर Log in किंवा Sign up या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 2. सर्व माहिती टाकून Sign up करून घ्या.
 3. नंतर आयडी पासवर्ड टाकून Log in करा.
 4. अशाप्रकारे वेबसाईट वर तुमचे अकाऊंट बनेल.
 5. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे; सर्व माहिती अचूक असावी.
 6. आगोदर सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे जवळ ठेवावी आणि योग्य Size आणि Ratio मध्ये अपलोड करावी.
 7. संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाच्या खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करावे, अशा तऱ्हेने तुमचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पूर्ण झालेला आहे.
 8. ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी पात्र बनाल.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Maharashtra 2023 (योजना तपशील)

Mahatma Phule Jan Arogya Yojana Beneficiary (लाभार्थी)

महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषे खालील म्हणजेच पिवळे रेशन कार्ड धारक तसेच दारिद्र्य रेषे वरील म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक, या योजनेसाठी पात्र आहेत. यांनाच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच लाभ मिळणार आहे, सोबतच नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana insurance protection (विमा संरक्षण)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी अर्जदारांना विमा संरक्षण प्रदान केले जाते, अर्जदाराच्या कुटुंबाला देखील हे विमा संरक्षण लागू असते. विमा पॉलिसीची राशी ही प्रति वर्ष दीड लाखापर्यंत असते, यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण साठी विमा संरक्षण मर्यादा ही प्रति वर्ष अडीच लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana Hospital List (हॉस्पिटल लिस्ट)

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे. ज्या अर्जदारांना या योजनेसाठी ची हॉस्पिटल लिस्ट पाहिजे असेल, किंवा त्यांचा संपर्क क्रमांक हवा असेल; अश्या अर्जदारांनी खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्यात.

 1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर जावे.
 2. वेबसाईट च्या मेन मेन्यू मधील Network Hospitals या Option वर क्लिक करावे.
 3. क्लिक केल्या नंतर तुमच्या सोयी प्रमाणे सुविधा निवडावी.
 4. जिल्हानिहाय हॉस्पिटल लिस्ट पाहिजे असल्यास District wise Hospital या Option वर क्लिक करावे.
 5. जर तुम्हाला Specially एखाद्या आजारासाठी हॉस्पिटल बघायचे असल्यास, Specialty Hospitals या Option वर क्लिक करावे लागेल.
 6. Option निवडल्या नंतर तुमच्या समोर दुसरा tab उघडेल तेथे तुम्हाला जिल्ह्याचे किंवा विभागाचे नावे दिसतील.
 7. तुमच्या विभागाचे किंवा जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून, तुम्ही तुमच्या जवळील सर्व हॉस्पिटल ची यादी पाहू शकता.
 8. सोबतच त्याच tab मध्ये तुम्हाला हॉस्पिटल चा संपर्क क्रमांक पण दिलेला असतो, तुम्ही हॉस्पिटल ला थेट संपर्क करून तुमच्या शंकांचे समाधान करू शकता.
होमपहा
Hospital Listक्लिक करा

Mahatma Phule Jan Arogya Yojana Disease List (आजार यादी)

शस्त्रक्रिया आणि आजार यादी हि एकाच ठिकाणी दिलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf (Surgery list, disease list)

कान, नाक, घसा शस्त्रक्रियाकर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार, रेडीओथेरपी कर्करोगत्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
जळीत, पॉलिट्रामा, प्रोस्थेसिस, जोखिमी देखभालनेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्री रोग व प्रसूतिशास्त्रअस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोट व जठार शस्त्रक्रियाकार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रियाप्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
मज्जातंतू विकृती शास्त्रजनरल मेडिसिन
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापनहृदयरोग
नेफ्रोलोजीन्युरोलोजी
पल्मोनोलोजीचर्मरोग चिकित्सा
रोमेटोलोजीइंडोक्रायनोलोजी
मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजीइंटरवेन्शनल रेडीओलोजी

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Helpline Number

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आम्ही या लेखात तुम्हाला दिली आहे. जर तुम्हाला अजूनही कोणत्या प्रकारची अडचण येत असेल, तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.

रुग्णालय- आरोग्य मित्र (MJPJA contact)

पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. 16565, वरळी पोस्ट ऑफिस
वरळी मुंबई – 4000018

टोल फ्री नंबर1800 233 2200

FAQ

Q : महात्मा फुले जन आरोग्य योजना द्वारे किती रुपये दिले जातात?

Ans : 5,00,000 लाख रुपये रक्कम

Q : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना contact number काय आहे?

Ans : टोल फ्री Contact Number – 1800 233 2200

Q : महात्मा फुले जन आरोग्य योजना साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

Ans : आरोग्य प्रमाणपत्र, 3 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, वयाचा दाखला आणि उत्त्पन्न प्रमाणपत्र.

हे पण वाचा :


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *