महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023: मित्रांनो आज राज्य सरकार द्वारे महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यासंबंधी GR शासन निर्णय निघालेला आहे. अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी घोषणा केलेली होती, त्यानुसार आता त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारद्वारे हा GR काढण्यात आलेला आहे.
या GR द्वारे आता महिलांना सरसकट महाराष्ट्र राज्यासाठी सीमित 50% एसटी प्रवास सवलत देण्यात येणार आहे. त्यासंबंधी काही अटी आणि शर्ती सांगण्यात आलेले आहेत त्या आपण पाहूया.
महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023 अटी आणि शर्ती
Table of Contents
- महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना रा.प. एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये 50% सवलत दि. 17/03/2023 पासुन सुरु करण्यात येत आहे. सदरची सवलत ही भविष्यात रा.प. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहणार आहे.
- सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे. सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंतच लागू करण्यात आलेली आहे.
- सदर सवलत शहरी वाहतूकीस लागू नाही.
- ज्या महिलांनी रा.प. एसटी महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना 50% सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही. महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023
- सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
- सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
हे पण वाचा: लेक लाडकी योजना महाराष्ट्र, आता 18 वर्षाच्या सर्व मुलींना मिळणार 75,000 हजार रुपये
महिला सन्मान योजना (Mahila Sanman Yojana)
- मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही —महिलांना दिलेल्या 50% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही 50% असल्यामुळे त्या प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
- सर्व महिलांना प्रवास भाडयात 50% सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.5/-, रु.10/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. 10/-, रु. 20/- रु.30/-, रु.40/- रु.50/- व रु. 100/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. “महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023”
- सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये 77 क्रमांकावर प्राप्त होईल.
- लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.)
- वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार 100% सवलत अनुज्ञेय राहिल.
- महिला सन्मान योजना 65 ते 75 या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत लागू होणार आहे.
- महिला सन्मान योजना 5 ते 12 या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच 50% सवलत अनुज्ञेय राहिल.
सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये म्हणुन आणि महामंडळास शासनाकडुन मिळणारी प्रतिपुर्ती अचुक मिळावी या करीता आगार लेखाकार यांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब तपासणी, लेखा परीक्षणाची पद्धती याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे लेखा शाखेव्दारे निर्गमित करण्यात येणार आहे. महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023
हे पण वाचा: केंद्र शासनाची नवी योजना, या महिलांना मिळणार वर्षाला 1 लाख रुपये!
विभाग नियंत्रकांनी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानकप्रमुख यांच्या बैठका आयोजीत करुन सदर सवलतीबाबत सविस्तर सुचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत सवलतीची माहिती सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक वाहक यांना व्हावी या हेतुने कर्मचारी सुचना फलक, रोकड तिकिट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सुचना फलक इ. ठिकाणी सदर सवलती बाबतची माहिती वाचनीय व दर्शनीय स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी व वर्तमान पत्रातून सदर सवलतीस प्रसिद्धी देण्यात यावी.
FAQ
महिला सन्मान योजना महाराष्ट्रात केव्हा पासून लागू झाली आहे?
17 मार्च, 2023
सर्व प्रथम महिला सन्मान योजना केव्हा घोषित झाली?
दिनांक: 9 मार्च, 2023 (महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023)
महिला सन्मान योजनेचा लाभ काय मिळणार आहे?
महाराष्ट्रातील सर्व महिलांना एसटी प्रवासात 50% सूट