सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न म्हाडा पूर्ण करणार, कोकण मंडळाची 5311 घरांसाठी सोडत, घरांची किंमत किती असेल ? वाचा

मित्रांना शेअर करा:

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक खाजगी विकासकांकडून घराची खरेदी करण्याऐवजी म्हाडाच्या घराच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. म्हाडाची घरे कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने या घरांना कायमच नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाच्या घरांच्या किमती देखील वाढल्या आहेत. नुकत्याच मुंबई मंडळाने काढलेल्या सोडतीत समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती करोडोच्या घरात होत्या.

मुंबई मंडळाच्या सोडतीत समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती सात करोड पर्यंत होत्या. यामुळे सर्वसामान्यांना म्हाडाची घरे देखील परवडत नसल्याचे बोलले जात होते. दरम्यान आता मुंबई मंडळानंतर म्हाडाच्या कोकण मंडळांने देखील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत पाच हजार 311 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त राहणार आहेत. परिणामी सर्वसामान्य लोकांचे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कोकण मंडळाची सोडत केव्हा ?

कोकण मंडळाच्या पाच हजार 311 घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सोडतीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरू झाली असून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक नागरिकांना अर्ज करता येणार आहे. तसेच इच्छुक नागरिकांना 18 ऑक्टोबर पर्यंत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. तसेच तीन नोव्हेंबरला या सोडतीसाठी सादर झालेल्या अर्जांपैकी पात्र अर्जांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. तसेच या घरांसाठी 7 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

घरांच्या किमती किती राहणार?

कोकण मंडळाच्या घराच्या किंमती नऊ लाख 89 हजारापासून ते 41 लाख 81 हजारापर्यंत आहेत. 9 लाख 89 हजार 300 रुपये किंमतीची घरे अत्यल्प गटातील असून ही घरे पालघरमधील गोखिवरे येथील आहेत. तसेच 41 लाख 81 हजार 834 रुपये किंमतीची घरे मध्यम उत्पन्न गटातील असून ही घरे विरार-बोळींज येथील आहेत. या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील मध्यम उत्पन्न गटासाठी घरे राहणार आहेत. या घरांच्या किंमती सरासरी 33 लाखांपर्यंत आहेत. विरार बोळींज परिसरात फक्त मध्यम गटासाठीच घरे आहेत असे नाही तर अल्पगटासाठी देखील येथे घरे आहेत.

येथील अल्प आणि मध्यम गटासाठीच्या घराच्या किमती 23 लाखांपासून 41 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, या सोडतीत शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे आहेत. या घरांच्या किंमती 14 लाखांपासून 21 लाखांपर्यंत आहेत. रायगडमधील खानावळे, तळेगाव आणि कल्याणमधील घरीवली येथे अत्यल्प गटासाठी घरे आहेत. यांच्या किंमती 12 ते 13 लाखापर्यंत आहेत. ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यातही अल्प गटासाठी घरे आहेत. तसेच त्यांची किंमत 12 ते 32 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. 


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *