सद्या वाढत चाललेल्या मुला मुलींच्या आकडेवारीतील विषमता दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता महत्वाचे पाऊले उचलली आहेत. त्याच धर्तीवर मुलींची संख्यात्मक आकडेवारी वाढिण्याकरिता ‘mkby yojana’ अंतर्गत शासन प्रयत्नशील आहे.
माझी कन्या भाग्यश्री (MKBY) योजने अंतर्गत शासन 1 मुलगी असेल तर 1 लाख रुपये देत आहे, शिंदे सरकारने सद्या या योजने वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पालकांना तसेच समाजाला मुलींच्या बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे.
जर तुम्हाला 1 मुलगी असेल, तर शिंदे सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे पैसे मिळवण्यासाठी नक्की प्रकिया काय आहे? या योजनेसाठी अर्ज कोठे केला जातो? या बद्दल सविस्तर माहिती पाहूया.
माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज कोठे करावा?
Table of Contents
राज्य सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना (MKBY) अर्ज नोंदणी करावी लागणार आहे, या योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय महिला उपायुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध असतील.
माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करताना मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिके कडे मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- उत्पत्तीचे प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
सर्व कागदपत्रांसह तुमच्या गावातील अंगणवाडी सेविके कडील फॉर्म A किंवा B मधे सादर करायचा, अश्या तऱ्हेने तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता अटी आणि तरतुदी
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
एखाद्या पाल्याला 1 किंवा 2 मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेसाठी अपात्र ठरतील.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹7.5 लाख पेक्षा कमी असावे
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणत्या निकषावर पैसे मिळणार?
1 मुलगी असेल आणि आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, तर मुलीच्या नावावर 50,000 रुपये बँकेत जमा केले जातात. जर मुली दोन असतील आणि त्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, दोन्ही मुलींच्या नावे 25,000 ₹ – 25,000 ₹ बँकेत टाकले जातात.