मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 (अर्ज प्रक्रिया, पात्रता, व लाभ) Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra

मित्रांना शेअर करा:

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra, मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023, (अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ) मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 उद्देश, मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे फायदे, मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची अंमलबजावणी, Maharashtra fellowship, what is cm fellowship program, state government fellowship, cmf maharashtra, cm fellowship maharashtra 2023, maharashtra cm fellowship 2023, government of maharashtra phd research fellowship, (mahades.maharashtra.gov.in fellowship) cm fellowship maharashtra, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023,

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 सुरु केली आहे, या योजने अंतर्गत तरुणांना शासकीय यंत्रणेत काम करण्याची संधी मिळेल. Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra योजनेचा शुभारंभ मुळात याच उद्देशासाठी केला होता, कि जेणेकरून सरकारी कामकाजात तरुणांना प्रोस्ताहन मिळेल आणि त्यांना सरकारी कामांचा अनुभव होईल.

Mukhyamantri Fellowship Yojana सर्वात प्रथम महाराष्ट्रात 2015 ते 2020 पर्यंत राबवली गेली होती, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला होता, नंतर सरकार मधील अस्थिरते मुळे या Mukhyamantri Fellowship Yojana कडे दुर्लक्ष केले गेले.

30 जानेवारी, 2020 च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार Mukhyamantri Fellowship Yojana अधिकृत पणे संपुष्टात आणली गेली, मुख्यमंत्री फेलोशिप योजना पुन्हा सुरु करण्यसाठी सर्व स्तरावरील आग्रही मागणी लक्षात घेता, फेलोशिप कार्यक्रम तरुणांच्या भविष्यातील वाटचाली साठी उपयुक्त आणि महत्वाचा ठरेल या अनुषंगाने 20 जानेवारी, 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री फेलोशिप योजना नव्याने सुरु करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने दिला.

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra संपूर्ण माहिती

Table of Contents

योजनेचे नावमुख्यमंत्री फेलोशिप योजना
उद्देशराज्यातील तरुणांना शासकीय कामांचा अनुभव मिळवून देणे.
सुरुवात केव्हा झाली2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सुरुवात केली. (मध्यंतरी योजना बंद केली गेली होती, आता 2023 पासून ती नव्याने सुरु करण्यात आली आहे)
पगार70,000 रुपये +प्रवास खर्च आणि इतर खर्च 5000 रुपये.
परीक्षेचे स्वरूपMCQ Type (बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न)
माध्यमइंग्रजी (आवश्यक त्या ठिकाणी मराठी भाषांतर असेल)
अर्जाची शेवटची तारीख (last02 मार्च, 2023
प्रात्यक्षिक परीक्षा3 मार्च, 2023 ते 5 मार्च, 2023
ऑनलाईन परीक्षा4 आणि 5 मार्च 2023
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
हेल्पलाईन नंबर8411960005

मुख्यमंत्री फेलोशिप योजना काय आहे? (What is Maharashtra’s Chif Minister Fellowship Program?)

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra द्वारे तरुणांना राज्य शासनामध्ये काम करण्याची संधी मिळते, या योजनेमुळे तरुणांना अनुभव तर मिळतोच सोबतच खूप काही नव्या गोष्टी शिकायला मिळतात. ज्याप्रकारे तरुणांना या योजनेचा लाभ होतो तसाच लाभ राज्य सरकारला सुद्धा होतो, तरुणांच्या वेगवेगळ्या नवकल्पना आणि संकल्पना मुळे शासनाला पण मदत होते.

एक प्रकारे तरुण आणि नव युवकांना कार्यकारी प्रवाहात आणण्याचे काम हि मुख्यमंत्री फेलोशिप योजना करते, त्यामुळे हि योजना खऱ्या अर्थाने शासन आणि तरुणांमधील एक महत्वाचा दुवा आहे. तरुणांनाच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा या कार्यक्रमामुळे वाढण्यास मदत मिळते, नव्या तंत्रज्ञानाचा वापर तरुण वर्ग अधिक उत्सहाने करत असल्याने शासकीय कामांना गती प्राप्त होते.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 शासन निर्णय PDF Download

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, या विषयी दिनांक 20 जानेवारी, 2023 रोजी नवा शासन निर्णय देखील काढला गेला आहे. या शासन निर्णयात मुख्यमंत्री फेलोशिप योजना विषयी सर्व अटी/शर्ती मांडल्या आहेत, नामांकित शैक्षिणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने हा शासन निर्णय सादर करण्यात आला आहे.

सविस्तर शासन निर्णय PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी पात्रता निकष (Eligibility for Mukhymantri Fellowship Program)

  • मुख्यमंत्री फेलोशिप योजने साठी अर्ज सादर करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
  • अनुभव: अर्जदाराकडे किमान 1 वर्षाचा अनुभव असावा, तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची आर्टिकल शिप/इंटर्नशिप/ अप्रेंटशिप पूर्ण केलेली असावी. पूर्णवेळ रोजगार स्वयंरोजगार देखील ग्राह्य धरला जाईल, अनुभवासंबधी अर्जदाराला आपले स्वयंघोषणा पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • भाषा ज्ञान: मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • संगणकीय ज्ञान: अर्जदार व्यक्तीला संगणक चालवणे आणि इंटरनेटचा वापर करता यायला हवा.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे तर कमाल 26 वर्षे असायला हवे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 अटी व शर्ती (Chief Minister Fellowship Scheme 2023 Terms and Conditions)

  • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.
  • या 12 महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.
  • 12 महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.
  • ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.
  • फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.
  • फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.
  • फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेलफेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
  • नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.
  • फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी चे लाभ (Benefits of Mukhyamnatri Fellowship Scheme Maharashtra)

  • राज्य सरकार मध्ये काम करण्यासाठी संधी मिळते.
  • तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव मिळतो.
  • कार्यालयीन वापरा करिता स्वतःचा ई-मेल आयडी मिळतो.
  • तात्पुरत्या स्वरुपात कार्यालयीन ओळखपत्र मिळते.
  • महिन्याला 70,000 रुपये विद्यावेतन मिळते.
  • प्रवास खर्च आणि इतर खर्चांसाठी 5,000 रुपये अधिकचे दिले जातात.
  • फेलोशिप च्या कार्यकाळात एकूण 10 दिवसांची सुट्टी मिळते.
  • अपघात विमा कवच सुद्धा दिले जाते.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 निवड प्रक्रिया (Chief Minister Fellowship Scheme 2023 Selection Process)

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविली जाईल. निवड प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

टप्पा 1

भाग 1 : ऑनलाईन परीक्षा
भाग 2 : सर्वाधिक गुणांच्या आधारे टप्पा २ साठी २१० उमेदवार शॉर्टलीस्ट करणे

टप्पा 2

भाग 1 : शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करतील
भाग 2 : मुलाखत (शॉर्टलीस्ट केलेल्या व निबंध सादर केलेल्या उमेदवारांसाठी लागू)
भाग 3 : अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे

टप्पा 2 साठी उमेदवार शॉर्टलीस्ट करणे

एकूण गुण 100 पैकी राहतील,
सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल
शॉर्टलीस्ट केलेले उमेदवार 3 निबंध लिखित स्वरुपात सादर करतील. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतात
निबंधाचे विषय उमेदवारांना इमेल व संकेतस्थळाद्वारे कळविले जातील
सर्व 3 निबंध सादर करणाऱ्या शॉर्टलीस्ट केलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. सर्व 3 निबंध अपलोड न करणारे शॉर्टलीस्ट झालेले उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत.

अंतिम निवड

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.

  • ऑनलाईन चाचणीचे 100 पैकी गुण 15 पैकी गुणांमध्ये रुपांतरीत करुन+ निबंध 30 गुण+ मुलाखत 50 गुण + पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पदवी 5 गुण.
  • निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी व 15 उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी विहित मुदतीत ऑफर लेटर स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरण्यात येतील.

मुलाखती बाबत आवश्यक गोष्टी

  • मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांस आपल्यासोबत सर्व गुणपत्रिका, अनुभवाची प्रमाणपत्रे, ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रांची मूळ प्रत व नक्कल आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिवस व वेळ इमेल द्वारे कळविण्यात येईल.
  • मुलाखतीस हजर राहण्यासाठी उमेदवारांना प्रवासखर्च किंवा इतर कोणताही खर्च देण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 अभ्यासक्रम

एकूण गुण : 100. प्रत्येक प्रश्नास 1 गुण
कालावधी : 60 मिनिटे

ऑनलाईन परीक्षेतील विषय :

विषयप्रश्नांची संख्यामार्क तपशील
सामान्य ज्ञान5050महाराष्ट्र व भारतासंबंधी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, सामाजिक व अर्थशास्त्र यावर प्रश्न
तर्कशास्त्र1010तार्किक क्षमता
इंग्रजी भाषा1010वाक्य तयार करण्याची क्षमता, व्याकरण
मराठी भाषा0505व्याकरण व रचना
माहिती तंत्रज्ञान1010विंडोज 7, एमएस ऑफिस 2010, इंटरनेट
क्वान्टिटेटीव्ह ॲप्टीट्युड 1515डेटा चा अर्थ लावणे, अंकगणित, बीजगणित, मुलभूत भूमिती

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी नवीन अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra साठी अर्ज सादर करायचा असल्यास, अर्जदार उमेदवाराला मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी बनवलेल्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. संकेतस्थळावर या संबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे, तेथून तुम्ही सर्व माहिती काळजीपूर्वक पाहून मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठीची अर्ज प्रक्रिया स्वतःहून पूर्ण करू शकता.

होम पेज येथे क्लिक करा
अधिकुत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी PDFयेथे क्लिक करा

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी हेल्पलाईन नंबर

Mukhyamantri Fellowship Yojana 2023 Maharashtra संदर्भात अर्जदार उमेदवारांच्या अडचणीचे निराकारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 साठी हेल्पलाईन नंबर आणि ई मेल आयडी जारी केला आहे. जर तुम्हाला योजने संदर्भात काही अडचणी असतील किंवा कोणत्या बाबी समजल्या नसतील तर तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर आणि ई मेल आयडी वर थेट संपर्क करू शकता, तुमच्या सर्व अडचणींचे निराकारण होऊन जाईल.

हेल्पलाईन नंबर 8411960005
ई मेल आयडी[email protected]

मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 FAQ’s

Q : मुख्यमंत्री फेलोशिप योजना कोणी सुरु केली?

Ans: 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची सुरुवात केली. (मध्यंतरी योजना बंद केली गेली होती, आता 2023 पासून ती नव्याने सुरु करण्यात आली आहे)

Q : मुख्यमंत्री फेलोशिप योजने मध्ये फेलो ला किती पगार मिळतो?

Ans : 70,000 रुपये मासिक पगार +प्रवास खर्च आणि इतर खर्चासाठी 5000 रुपये.

Q : शिष्यवृत्ती पेक्षा फेलोशिप चांगली आहे का?

Ans : हो! मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमध्ये फेलो बनल्यावर मिळणारे विद्यावेतन हे शिष्यवृत्ती पेक्षा खूप जास्त असते, म्हणून नक्कीच फेलोशिप हि शिष्यवृत्ती पेक्षा उत्तम आहे.

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *