Mumbai Hill Station : अनेक जण पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन बनवतात. पावसाळी काळात विविध हिल स्टेशनला पर्यटक आवर्जून भेट देतात. पावसाळा म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच असते. दरम्यान जर तुम्हीही पावसाळ्यात नयनरम्य ठिकाणाची शोध घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. विशेषता ज्या पर्यटकांना या पावसाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायची असेल अशा पर्यटकांसाठी आज आम्ही महाराष्ट्रातील एका लोकप्रिय हिल स्टेशनची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण ज्या पर्यटन स्थळाविषयी जाणून घेणार आहोत ते मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेले आहे. आपल्या राज्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. मुंबईच्या शेजारी खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, नाशिक अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय माथेरान हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि एक नयनरम्य हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन खूपच लोकप्रिय असून लहान पण सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे.
येथे पावसाळ्याच्या काळात लाखो पर्यटक भेट देतात. माथेरान येथील सुंदरता पाहण्यासाठी येथे संपूर्ण देशभरातून पर्यटक हजेरी लावतात. मुंबई आणि पुण्यामधून देखील रोजाना हजारो पर्यटक या हिल स्टेशनला पाहण्यासाठी येतात. माथेरान हे कोकणातील एक प्रमुख हिल स्टेशन आहे. हे पर्यटन स्थळ रायगड जिल्ह्यात स्थित आहे. यामुळे जर तुमचा कोकणात जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी माथेरान हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
विशेष म्हणजे हे पर्यटन स्थळ मुंबई आणि पुण्यापासून खूपच जवळ आहे. मुंबई पासून अवघ्या 92 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून योग्य 121 किलोमीटरच्या अंतरावर हे स्थळ वसलेले आहे. या हिल स्टेशनला रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने पोहोचता येते. माथेरानचा आनंद घेण्यासाठी नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या टॉय ट्रेनने प्रवास केला जाऊ शकतो. ही टॉय ट्रेन नेरळ येथून सुरू होते आणि माथेरानच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाते. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि माथेरानला फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर आपण मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गाने अवघ्या तीन ते चार तासात माथेरानला पोहोचू शकता.