नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता येणार या तारखेला ! नवा निर्णय जाहीर

मित्रांना शेअर करा:

Namo Shetkari Samman Nidhi Yojana :- नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेस संबंधित महत्वाचे अपडेट आली आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेप्रमाणेच महाराष्ट्रात नव्याने सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना लवकरच सुरू होणार आहे. योजनेच्या पहिला हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून माहिती प्रसारित करण्यात आली आहे, त्या संबंधितच अपडेट आपण या आर्टिकल मध्ये पाहूया.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जाहीर, या तारखेला रक्कम मिळणार!

पी एम किसान योजनेमध्ये ज्याप्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये रोख रक्कम तीन हफ्त्यांच्या स्वरूपात दिले जाते त्याच प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिंदे सरकार मार्फत सहा हजार रोख रक्कम ही वर्षाकाठी दिली जाणार आहे.

पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजनेची रक्कम ही तीन हप्त्यांमध्ये विभागीत करण्यात आली आहे, ज्याप्रकारे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये दोन हजार रुपये प्रमाणे वर्षातून तीन वेळेस मिळतात त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेची रक्कम भेटणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे, अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली ही नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्यरूपात मदत करणारे एक अभिनव योजना आहे. योजनेचा पहिला हप्ता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल असे मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

नमो शेतकरी योजनेची पहिल्या हप्त्याची रक्कम ही पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच दिली जाणार आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता प्रत्येकी 12 हजार रुपये रोख रक्कम मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी फक्त हे शेतकरी पात्र असणार

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणाला मिळाला, तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम मिळते अशा सर्व महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने कोणत्याही स्वरूपाची अर्ज प्रक्रिया करण्याची गरज शेतकऱ्यांना पडणार नाही, पी एम किसान योजनेच्या वेरिफिकेशन वरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

मे महिन्यामध्ये म्हणजेच चालू महिन्यामध्ये 31 तारखेच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *