आता शिंदे सरकार प्रत्येक शेतकऱ्याला देणार 6 हजार रुपये! नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर | Namo Shetkari Yojana 2023

मित्रांना शेअर करा:

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2023

Namo Shetkari Yojana 2023: आज विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी आणि आता मागील आठवड्यात देखील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते, यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगली मदत जाहीर केली जाईल; अशी आशा करून शेतकरी बळीराजा मायबाप सरकारकडून अपेक्षा लावून होता.

याच्याच फल स्वरूप या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. राज्यामध्ये आता नमो शेतकरी योजना Namo Shetkari Yojana जाहीर करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना फडवणीस म्हणाले, अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्न डबल होण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत शासनाने अनुदानाची भर घालून शेतकऱ्यां साठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Shetkari Yojana योजना जाहीर केली आहे.

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना काय आहे? (नमो शेतकरी महासन्मान निधी योजना)

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना
सुरुवातमहाराष्ट्र अर्थसंकल्प 2023
घोषणा कोणी केलीअर्थमंत्री देवेंद्र फडणवीस
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
लाभवार्षिक ₹6,000
अधिकृतवेबसाईट अजून उपलब्ध नाही
हेल्पलाइन नंबरNAN

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळत आहेत आता राज्य सरकार यामध्ये आणखीन सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून भर घालणार आहे. यामुळे राज्यांमधील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहेत. याचा लाभ महाराष्ट्र मधील एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

हे पण वाचा:

नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता (Namo Shetkari Yojana Elegeblity)

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होतील यासाठी पात्रता काय आहे? हे आपण जाणून घेऊ.

  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र असावा.

नमो शेतकरी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे (Namo Shetkari Yojana Documents)

बँक खाते पासबुक

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

शेतीची सातबारा & होल्डींग

मोबाईल नंबर (आधार कार्ड आणि बँक खात्याला लिंक असलेला)

नमो शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया (How to apply for Namo Shetkari Yojana)

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना दिनांक 9 मार्च, 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वारे जाहीर करण्यात आली होती. या योजने संबंधी अजून शासनाकडून कोणताही GR निघालेला नाही, त्या सोबतच या योजनेसाठी कोणतेही पोर्टल अजून बनवण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अजून तरी या नमो शेतकरी योजना साठी अर्ज कसा करायचा याबद्दल सांगू शकणार नाही.

जेव्हा शासनाकडून या योजने संबंधी नवीन अपडेट येईल, तेव्हा आम्ही अर्ज प्रक्रिया अपडेट करू.

शेतकरी बांधवांनो ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त बांधवांना या नवीन योजनेबद्दल माहिती मिळेल.

नमो शेतकरी योजना बद्दल विचारले जाणारे प्रश्न FAQ

नमो शेतकरी योजना केव्हा पासून सुरू झाली?

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये सर्वप्रथम या योजनेची घोषणा करण्यात आली.

नमो शेतकरी योजनेद्वारे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत?

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

Namo Shetkari Yojana द्वारे शेतकऱ्याला किती रुपये मिळणार आहेत?

वार्षिक स्वरूपात 6 हजार रुपये नमो शेतकरी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *