Old Pension Yojana: मित्रांनो गेल्या 7 दिवसांपासून जुन्या पेन्शन योजने साठी राज्यातील कर्मचारी संपावर होते, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या! नव्या पेन्शन योजनेला रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासाठी राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांनी संप केला होता, अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळ आणि सरकार मध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या मुळे आता सलग 7 दिवसांपासून चालू असणारा कर्मचारी संप मागे घेण्यात आला आहे.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहूया बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना नक्की कोणते आश्वासन दिले आहे. आणि जुन्या पेन्शन योजने संबंधी कोणता निर्णय घेतला आहे.
जुनी पेन्शन योजना नवीन अपडेट (बैठकीत कोण कोण ते निर्णय घेण्यात आले)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या सविस्तर अश्या चर्चे मधे, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. शासनासोबत जी चर्चा झाली ती यशस्वी झाली असे काटकर यांनी सांगितले आहे.
गेल्या सात दिवसांपासून सरकार जुनी पेन्शन योजना मुद्यावर गांभीर्याने विचार करत आहे, यासाठी वेगळी समिती सुध्दा स्थापन केली गेली आहे. त्याद्वारे प्रिंसिपल स्वरूपात जुन्या पेन्शन योजनेची मागणी मान्य करण्यात आली आहे.
जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना यात आगोदर भरपूर अंतर होते, परंतु आता घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात कोणतेही बदल असणार नाहीत.
जुनी पेन्शन योजना आणि नवी पेन्शन योजना यातील फरक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अशा स्वरूपाची माहिती राज्य शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना दिली आहे. जुनी पेन्शन योजन महाराष्ट्र राज्यात सुरु होईल, ती निकोप राहण्यासाठी सरकार प्रयत्न करेन. सोबतच बैठकीत संपकरी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईच्या नोटीसा मागे घेतल्या जातील असे आश्वासन सुध्दा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
जुनी पेन्शन योजना संपूर्ण देशात लागू नाही, परंतु फक्त महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना आता ती लागू करण्यात येणार आहे.