जगाच्या इतिहासात प्रथमच जनता सादर करणार अर्थसंकल्प – Maharashtra Budget 2023 | People’s Ideas for Maharashtra Budget 2023

मित्रांना शेअर करा:

People’s Ideas for Maharashtra Budget 2023: मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला, त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देखील येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहास सर्वप्रथमच देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री स्वरूपात अर्थसंकल्प मांडणार आहेत! या अर्थसंकल्पाची विशेष बाब म्हणजे या अर्थसंकल्पात सामान्य लोक देखील आपले विचार मांडू शकणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत वेगवेगळे पद भूषवले परंतु ते अर्थमंत्री स्वरूपात पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत, महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय जाहीर केला आहे. यंदाचा महाराष्ट्र अर्थसंकल्प हा सामान्य जनतेच्या विचारांवर चालून बनवण्यात येणार आहे, महाराष्ट्र अर्थसंकल्पा बद्दल तुमचे काय विचार आहेत? अर्थसंकल्पात कोणत्या स्वरूपाची बदल व्हायला हवे? आणि अर्थसंकल्पात कोणत्या बाबीवर विचार व्हायला हवा? जास्त कोणत्या विभागावर लक्ष केंद्रित करायला हवं? राज्याचा विकास कोणत्या विभागाद्वारे जास्त होईल? ही सर्व पैलू अर्थसंकल्पामध्ये सामान्य जनतेकडून विचारात घेतले जाणार आहेत.

Ideas for Maharashtra Budget 2023

image search 1675124345657लोकाभिमुख अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य 2023 (Peoples Ideas for Maharashtra Budget 2023)

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे अर्थमंत्रीदेवेंद्र फडणवीस
उपक्रमाचे नाव तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी, 2023 (अंदाजित)
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 केव्हा जाहीर होणार 09 मार्च, 2023
महाराष्ट्र 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशन कोठे होणार आहेमुंबई
तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023 उपक्रमाचा उद्देशमहाराष्ट्रातील सामान्य जनतेला अर्थसंकल्प कसा हवा आहे, हे जाणून घेणे.

तुम्ही देखील यंदाच्या Maharashtra Budget 2023 मध्ये तुमचे विचार मांडू शकणार आहात, अर्थसंकल्पात कोणत्या स्वरूपाचा बदल आवश्यक आहे हे देखील सांगू शकणार आहात, देशाचा अर्थसंकल्प जसा लोकाभिमुख मांडला त्या प्रकारे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देखील लोकाभिमुख करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. 

लोकाभिमुख अर्थसंकल्पा साठी चे पहिले पाऊल म्हणजे, प्रत्यक्ष रीतीने सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पा मध्ये सामील करून घेणे, 'अर्थसंकल्पामध्ये सामान्य नागरिकांचे विचार' ही एक अभिनव संकल्पना आहे. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात असे कधीच झाले नाही, प्रत्येक वेळी अर्थसंकल्प हा देशाचा अर्थमंत्री किंवा राज्याचा अर्थमंत्री मांडत असतो, परंतु यावर्षी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्राची जनता मांडणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प आहे, आर्थिक वर्ष 2023-24 साठी कोणत्या योजना राबवण्यात याव्यात? राज्याचा विकास कोणत्या गोष्टीत आहे? हे सर्व काही सामान्य नागरिक या नात्याने आपल्या सर्वांना सांगायचे आहे, असे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प महा बजेट 2023 (Ideas for Maharashtra Budget 2023)

आर्थिक वर्ष 2023-24 साठी चा अर्थसंकल्प करण्यासाठी People’s Ideas for Maharashtra Budget 2023 ही अभिनव योजना उपमुख्यमंत्र्यांनी सादर केली आहे, चला तर मग आपण पाहूयात “(Ideas for Maharashtra Budget 2023) उपक्रमात कसे सामील व्हायचे?” आणि ‘आपले विचार आणि आपल्या आयडिया कशा पद्धतीने अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या?’

महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपक्रमाच्या माध्यमाने पाहणार आहेत. त्यामुळे आता या ‘अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे?’ ‘तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या?’ (Maharashtra Budget 2023) अर्थसंकल्पा विषयी तुमचे मत तुम्ही मांडू शकणार आहात, नेमकी प्रक्रिया काय आहे हे step by step जाणून घेऊया.

‘तुमच्या संकल्पनेतील महा बजेट 2023’ महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प अभिनव उपक्रम – People’s Ideas for Maharashtra Budget 2023

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 27 फेब्रुवारी 2023 पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये होणार आहे. लवकरच कामकाज सल्लागार समितीमध्ये अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अर्थसंकल्पाची तयारी सुरू झालेली आहे, यासंबंधी सर्व शासकीय बैठक देखील पार पडल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या अर्थमंत्री या नात्याने महाराष्ट्रातील जनतेला एक आदर्श अर्थसंकल्प देण्याचे योजले आहे. त्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आणि विरोधी पक्ष नेते म्हणून पदभार सांभाळला. पण त्यांचा अर्थमंत्री म्हणून Maharashtra Budget 2023 हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे, त्यासाठी त्यांनी जनतेकडून अर्थसंकल्पासाठी (People’s Ideas for Maharashtra Budget 2023) अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तत्काळ लिहा.
लेखामध्ये दिलेल्या सर्व स्टेप पाळून तुम्ही ‘तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023’ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवू शकता…

अशाप्रकारे मांडा तुमच्या अर्थसंकल्पा साठीच्या अभिनव संकल्पना – How to register People’s Ideas for Maharashtra Budget 2023 (step by step guide in Marathi)

यंदाच्या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे? तुमच्या अभिनव संकल्पना कोणत्या? याविषयी मत मांडण्यासाठी  आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या कल्पना सांगण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.

  • 1. प्रथम तुम्हाला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या, “तुमच्या संकल्पनेतील महा बजेट 2023” या पोर्टल वर जावे लागेल. संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • 2. त्यानंतर (तुमच्या संकल्पनेतील महाबजट 2023) या पोर्टल वर गेल्यानंतर खाली दाखवल्या प्रमाणे एक फॉर्म दिसेल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
Ideas for Maharashtra Budget 2023
तुमच्या संकल्पनेतील महाबजट 2023 Registration form
  • 3. फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती अचूक भरून; नाव, जिल्हा, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, तसेच ‘तुमच्या संकल्पनेतील महा बजेट 2023’ बद्दल तुमच्या अभिनव संकल्पना तुम्हाला मांडाव्या लागतील.
  • 4. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत तुमच्या अभिनव संकल्पना पोहोचण्यासाठी फॉर्म वर दिलेली माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. ‘तुमच्या संकल्पनेतील महा बजेट 2023’ बद्दल अभिनव संकल्पना फॉर्म वर type करून झाल्या नंतर, फॉर्मच्या खाली दिलेल्या I am not robot या बटन वर टिक करावे लागेल, बटनावर right चिन्ह आल्यानंतर, Send बटन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या संकल्पना अर्थमंत्र्यांकडे पाठवू शकता. 

तर मित्रांनो अशाप्रकारे अगदी सहज आणि सोप्या रीतीने तुम्ही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा? याबद्दल तुमचे विचार अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवू शकता. या खास मोहिमेच्या माध्यमातून लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत, त्यामुळे निश्चितच लोकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब Maharashtra Budget 2023 अर्थसंकल्पात दिसून येणार आहे. यामुळे आपल्या राज्यातील एक महत्वाचा घटक राज्य प्रणाली शी जोडला जाणार आहे. निश्चितच महाराष्ट्राचे Budget 2023 भारतासाठी, इतर राज्यांसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक आदर्श-वास्तववादी आणि लोकशाही पूरक अर्थसंकल्प बनेल..

ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशाच शासकीय अपडेट आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या agrobharti.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

FAQ’s

Q : Ideas for Maharashtra Budget 2023 साठी पात्रता निकष काय आहेत?

Ans : अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

Q : When is maharashtra budget 2023

Ans : Maharashtra budget 2023 दिनांक 09 मार्च, 2023 ला जाहीर होणार आहे.

Q : महाराष्ट्राचे 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशन कोठे होणार?

Ans : महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशन 2023 मुंबई मध्ये पार पडणार आहे.

हे पण वाचा :


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *