पीक विमा 2022: नमस्कार शेतकरी बांधवांनो! पीक विमा 2022 संबंधी एक महत्वाची अपडेट आली आहे. आता सर्व शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा मिळणार आहे, बांधवांनो कालच आपल्या राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या संबंधी विधानसभेत माहिती दिली.
पिक विमा 2022 महाराष्ट्र जाहीर, तारीख ठरली..
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर उर्वरित पिक विमा मिळावा, यासाठी निर्णय घेतला आहे. त्या नुसार शासनाने राज्यातील सर्व पिक विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत, लवकरात लवकर पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करा! असा महाराष्ट्र शासनाकडून आदेश निघाला आहे.
हे पण वाचा: 2017 ची कर्जमाफी मंजूर, उर्वरित शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होणार
शासनाने पिक विमा कंपन्यांना दिनांक 31 मार्च च्या आगोदर सर्व शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा अदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर या निर्णयाची अंमलबजावणी पिक विमा कपन्यांकडून वेळेवर झाली नाही, तर शासन कंपन्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा 2022 सरसकट दिला जाणार असल्याची शासनाद्वारे हमी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, अखेर एवढ्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उर्वरित पिक विमा रक्कम मिळणार आहे.
आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च आगोदर उर्वरित पिक विमा रक्कम सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी वेळी जे बँक खाते पासबुक दिले होते त्या बँकेतच पिक विमा 2022 चे पैसे येणार आहेत.
हे पण वाचा: या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 31 मार्च आगोदर! पहा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार
शासनाद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँकेतून उचलून घेण्याचे आवाहन केले आहे. पीक विमा रक्कम पुढील 15 दिवसात विमा कपन्यांद्वारे दिली जाणार आहे, त्यामुळे या संकटाच्या काळात ही पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना खूप मदतीला येईल.