आता १ रुपयांत काढता येणार पीकविमा, CSC केंद्राद्वारे होणारी लूट थांबणार! | Pik vima Maharashtra 2023 new update

मित्रांना शेअर करा:

pik-vima-maharashtra-2023-new-update

Pik vima Maharashtra 2023 new update: शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 मध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्यानुसार आता पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपात प्रीमियम भरणे गरजेचे राहणार नाही राज्य सरकार स्वतः राज्यातील सर्व जनतेसाठी पिक विमा भरणार आहे.

पीक विमा योजनेत मोठा बदल – आता मोफत विमा मिळणार

यापूर्वी पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्याला पूर्ण विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम त्याच्या स्वरूपात भरावी लागत होती परंतु आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे आता फक्त शेतकऱ्याला प्रीमियम स्वरूपात पिक विमा योजनेसाठी एक रुपया भरावा लागणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याला मोफत पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे ही सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आणली आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.

मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितले आहे की हे शेतकऱ्यांना अधिक सुदृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे शेतीमध्ये पावसामुळे जे नुकसान होते ते नुकसान आता शेतकऱ्यांना विनामूल्य मिळणार आहे पूर्वी पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरावा लागत होता आणि तब्बल दोन ते तीन वर्ष शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नव्हता परंतु आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून प्रीमियम स्वरूपात पिक विमा मिळणार आहे सर्व प्रीमियम आणि पिक विमा हप्ता हे राज्य सरकार द्वारे भरण्यात येणार आहे.

पीक विमा योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मिळणार पिक विमा

राज्य सरकारने हे पाऊल का उचलले यामागे एक मोठं कारण म्हणजे शेतकरी पिक विमा योजनेचा लाभ घेत नव्हते एकूण संख्येच्या केवळ दोन टक्के शेतकरी हे पीक विमा योजनेसाठी अर्ज करत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पिक विमा योजने पासून वंचित होता त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता हे ओळखून राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनव योजना करण्यासाठी पिक विमा योजनेला राज्य सरकारद्वारे चालना देण्यासाठी आता पिक विमा पूर्णपणे महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे भरला जाणार आहे.

पीक विमा भरण्यासाठी CSC केंद्राद्वारे होणारी लूट थांबणार, शेतकऱ्यांना सुखद धक्का

यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबण्यासाठी एक मोठी मदत होईल यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा पिक विमा भरायचा असेल तर शेतकरी ऑनलाईन सेंटर मध्ये जात होते आणि तेथे त्यांना पीक विमा भरण्यासाठी चार्जेस लावले जायचे शासनाद्वारे सीएससी केंद्राला रक्कम मिळायची तरी देखील सीएससी केंद्र शेतकऱ्यांकडून प्रति अर्जासाठी शंभर रुपये वसूल करायचे आता ही लूट संपूर्णपणे थांबणार आहे त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. (Pik vima Maharashtra 2023 new update)

शेतकरी बांधवांना ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना देखील ही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *