PM Kisan चे 2,000 रुपये अजून मिळाले नाहीत? लगेच हे काम करा! तरच मिळतील मोदीचे पैसे

मित्रांना शेअर करा:

pm-kisan-13th-installement

PM Kisan: शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता बऱ्याच दिवसापासून आलेला आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan चे पैसे जमा झालेले आहेत, परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नसतील; तर तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल, तरच तुम्हाला PM Kisan योजनेचे पैसे मिळणार आहेत.

PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता येऊन 3 आठवडे पूर्ण झाले आहेत, 22 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी एवढी रक्कम सरकार द्वारे जमा करण्यात आली आहे.

मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळालेला नाही. 13 वा हप्ता जमा करण्यापूर्वी सरकारद्वारे शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली होती, त्या यादीनुसार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळण्यात आलं होतं. पण अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अपूर्तते मुळे देखील PM Kisan योजनेचा 13 हप्ता मिळालेला नाही आहे.

PM Kisan 13th instalment (पी एम किसान चा 13 वा हप्ता अजून मिळाला नाही, फक्त हे काम करा)

शेतकरी बांधवांनो! ज्यांना पीएम किसान चा 13 वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी पैसे मिळवण्यासाठी काय करायचे हे आम्ही या पोस्टमध्ये सांगणार आहोत.

PM Kisan योजनेसाठी नोंदणी अर्ज करत असताना, जर शेतकऱ्यांनी बँक पासबुकची चुकीची प्रत किंवा माहिती दिली असेल तरी देखील पी एम किसान चे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.

तसेच अर्ज करत असताना बँक पासबुक बरोबरच जर शेतकऱ्याने आधार कार्ड संबंधीची चुकीची माहिती दिली असेल, तरी देखील पीएम किसान चे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.

तुम्ही नोंदणी करताना बरोबर माहिती टाकली होती की नाही जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

जर अर्जामध्ये चुकीची माहिती असेल तर ती माहिती दुरुस्त करून घ्या, माहिती दुरुस्त केल्यानंतर तुमची अडकलेली PM Kisan ची रक्कम एका आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

जर पी एम किसान चा हप्ता वरील सर्व बाबी करून सुध्दा बँक खात्यावर जमा होत नसेल, तर शेतकऱ्याने पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे नवीन बँक अकाउंट काढून घ्यावे. कारण अधिकृत रित्या सांगण्यात आले आहे, जर इतर बँकेच्या खात्यावर शेतकऱ्याचे पैसे जमा होत नसतील; तर पोस्टाचे बँक खाते शेतकऱ्याने काढून घ्यावे. जेणेकरून जेव्हा नवीन हप्ता येईल तेव्हा तुमच्या पोस्ट ऑफिस बँक खात्यात त्याची रक्कम लगेच जमा होईल.

Post office चे बँक अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला ते बँक अकाउंट PM Kisan च्या अर्ज नोंदणी मध्ये लिंक करावे लागेल, आगोदर लिंक असलेले बँक खाते रद्द करावे लागेल.

त्याचबरोबर जर तुमचे वय जास्त असेल आणि तुम्ही अजूनही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुमच्या बोटाचे ठसे, तसेच तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. जेणेकरून Adhar Verification करत असताना तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. (हे E-KYC साठी महत्वाचे आहे)

वरील सर्व बाबी वापरून शेतकरी PM Kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळवू शकतात. जरी तुमच्या खात्यात अजून रक्कम आली नसेल तरीही तुम्ही, वरील स्टेप वापरल्या तर तुमच्या खात्यामध्ये एका आठवड्याच्या आत रक्कम जमा केली होईल.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *