10 फेब्रुवारी 2023 आगोदर हे काम करा, नाहीतर 14 लाख शेतकऱ्यांना PM Kisan चा 13 वा हप्ता मिळणार नाही.
देशातील 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान चा 13 वा हप्ता!
Table of Contents
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने द्वारे केंद्र सरकारकडून लवकरच, शेतकऱ्यांना 13 वा हप्ता दिला जाईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केला नाही अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता मिळणार नाही.
किसान सन्मान योजनेतून आगोदर लाभ मिळवलेल्या 14 लाख शेतकऱ्यांचा अजून आधार नंबर बँक खात्याला लिंक नाही, या अनुषंगाने सरकारने आधार नंबर बँक खात्याला लिंक करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर केली आहे.
या तारखे पर्यंत जर शेतकऱ्यांनी आधार नंबर बँक खात्याला लिंक केला नाही तर, अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान च्या 13 व्या हप्त्याची तारीख लांबणीवर करण्याचे कारण
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता हा जानेवारी 2023 च्या अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार होता, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याला लिंक न केल्याने, सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याची तारीख पुढे ढकलली.
👉प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता केव्हा येईल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.👈
आधार नंबर बँक खात्याला लिंक नसल्याने 14 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू नयेत, त्यांना योजनेचा लाभ मिळवा यासाठीच केंद्राने 13 व्या हप्त्याची तारीख आता पुढे ढकलली आहे.
आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य आहे, ज्यांनी बँक खात्याला आधार लिंक केला नसेल त्यांनी लवकर करून घ्यावा.
10 फेब्रुवारी, 2023 ही शेतकऱ्यांनी आधार जोडणी करून घ्यावी असे कृषी विभागाने सांगितले आहेत, 10 फेब्रुवारी, 2023 ही आधार जोडणी साठीची शेवटची तारीख आहे. जर अर्जदार शेतकरी या तारखे आगोदर आधार जोडणी करू शकला नाही तर तो पी एम किसान च्या 13 व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार नाही, त्या शेतकऱ्याला बँक खात्यात पैसे मिळणार नाहीत! म्हणून लवकरात लवकर आधार जोडणी करावी.
हे पण वाचा:
- शेतकऱ्यांना मिळणार मोफत बैलगाडी, शिंदे सरकारची नवी योजना जाहीर
- महिलांना होणार ₹2,00,000 लाख रुपयांचा फायदा, केंद्रांची नवी गुंतवणुक योजना