पोस्टात फक्त 795 रुपयांत मिळणार 20 लाख रुपयांचा विमा! | Post Office insurance scheme in marathi

मित्रांना शेअर करा:

post-office-insurance-scheme-marathi

Post Office insurance scheme in Marathi: मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिस च्या अपघाती विमा संरक्षण योजने बद्दल जाणून घेणार आहोत, या योजनेचे फायदे काय आहेत? योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे पण या पोस्ट मध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

व्यक्तीचा अपघात झाला असता, संबधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. हॉस्पिटल चा खर्च कधी कधी एवढा होतो ज्यामुळे कुटुंबाची पूर्ण जमा पुंजी संपून जाते. 

हे असे आर्थिक संकट येऊ नये, यासाठी भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस विभागामार्फत वेगवेगळ्या अपघाती विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका योजने बद्दल आपण माहिती घेऊया.

Post office Insurance policy information in Marathi (पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना माहिती)

पोस्ट ऑफिस तर्फे सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा संरक्षण योजनेत व्यक्तीला वार्षिक फक्त 795 रुपये भरून 20 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. 

पोस्ट ऑफिस ची ही अपघाती विमा संरक्षण योजना, टाटा एआयजी व बजाज अलायंस या दोन कंपन्यांशी एकत्रित करार करून बनवण्यात आली आहे. ही अपघाती विमा संरक्षण योजना नागरिकांना टपाल कार्यालयातून काढता येते. (Post Office insurance scheme in marathi)

Post Office insurance scheme Benefits (पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना लाभ)

पोस्ट ऑफिस च्या या अभिनव योजनेद्वारे व्यक्तीला 20 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षण प्राप्त होते. अपघातात जर व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यु झाला तर त्याच्या वारसांना पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजने अंतर्गत 20 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हे 20 लाख रुपये योजनेत सामील झालेल्या टाटा एआयजी व बजाज अलायंस या दोन कंपन्यांतर्फे 10 – 10 लाख रुपये असे दिले जातात. 

जर विमाधारक व्यक्तीला कायम अर्धांगवायू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास देखील प्रत्येकी 10 – 10 लाख रुपये मिळतात. {Post Office insurance scheme in marathi}

हे पण वाचा: कृषी सहाय्यक भरती महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती जाणून घ्या!

अपघातात जर विमाधारक व्यक्ती बचावला तर त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी या योजने द्वारे आर्थिक मदत केली जाते. ही मदत एकूण 1,20,000 रुपयांची असते, टाटा एआयजी व्यक्तीला 60,000 रुपये मिळतात. आणि बजाज अलायंस कडून पण 60,000 रुपये आर्थिक मदत मिळते. अपघातातील व्यक्तीवर वैद्यकीय उपचार केल्या नंतर पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजने अंतर्गत ही वैद्यकीय उपचार मदत केली जाते.

Post Office insurance scheme Premium (पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना हप्ता रक्कम)

पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजना पॉलिसी मध्ये दोन कंपन्यांच्या एकत्र सहयोगाने विमाधारक व्यक्तीला रक्कम मिळते, ज्या व्यक्तीला या योजनेचा घ्यायचा असेल त्यांना योजनेसाठी असलेल्या हप्त्याची रक्कम भरणे गरजेचे आहे.

या योजनेत सामील होण्यासाठी व्यक्तीला 795 रुपयांचा हप्ता भरावा लागतो, हा हप्ता वार्षिक स्वरूपाचा असतो यामध्ये टाटा एआयजीला वार्षिक 399 रुपये (post office insurance scheme 399 in marathi) व बजाज अलायंस ला 396 रुपयांचा हप्ता जातो. 

विमा पॉलिसी काढत असताना व्यक्तीला हा हप्ता भरावा लागतो, जर हप्त्याची 795 रुपये रक्कम भरली गेली नाही तर पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना रद्द केली जाऊ शकते. विमा पॉलिसी हप्ता हा वार्षिक स्वरूपाचा आहे म्हणजेच महिन्याला केवळ 66.25 रुपये हप्ता येतो. तर प्रत्येक दिवसाला 2.13 रुपये विमा हप्ता रक्कम येते. (Post Office insurance scheme in marathi)

हे पण वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023, 5 हजार रिक्त जागांची बंपर भरती

Post Office insurance scheme Documents (पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना कागदपत्रे)

पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना मध्ये सामील होण्यासाठी व्यक्तीला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन विमा योजना पॉलिसी काढावी लागते, त्या साठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागते. 

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते पासबुक (बँक खाते हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे असणे अनिवार्य आहे)

पॉलिसी साठी अर्ज करताना वरील कागदपत्रे अनिवार्य आहेत, आवश्यकते नुसार दुसरी कागदपत्रे लागू शकतात. 

अर्ज करताना फक्त इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते ग्राह्य धरले जाते, इतर कोणत्याही बँकेचे पासबुक किंवा खाते व्यक्ती देऊ शकत नाही.

Post Office insurance scheme Apply (पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना अर्ज प्रक्रिया) 

ज्या व्यक्तींना पोस्ट ऑफिस च्या अपघात विमा संरक्षण योजनेत सामील व्हायचे आहे, त्यांना विमा योजने साठी अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागते. 

पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, वर सांगितलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये सादर करायची आहेत. 

कागदपत्रे योग्य असतील, आणि तुमच्या कडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असेल तर तुम्ही अगदी सोप्या रीतीने पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजने साठी अर्ज करू शकता.

अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असल्याने तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. तेथे गेल्या नंतर तेथील कर्मचाऱ्यांना या अपघाती विमा संरक्षण योजने संबंधी माहिती विचारावी लागेल. नंतर कर्मचाऱ्यांना विनंती करून तुम्ही तुमची अपघात विमा संरक्षण पॉलिसी काढू शकता. अर्ज प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला पोस्टमन किंवा पोस्टातील कर्मचारी मदत करतील. [Post Office insurance scheme in marathi]

Post office Insurance yojana FAQ

पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना साठी किती रुपये हप्ता आहे?

वार्षिक 795 रुपये

पोस्ट ऑफिस अपघाती विमा योजनेत किती रुपये मिळतात?

विमाधारक मृत्यू पावल्यास 20 लाख रुपये मिळतात, तर अपघात झाला तर उपचारासाठी 1 लाख 20 हजार रुपये मिळतात.

पोस्ट ऑफिस विमा योजने साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे, अर्ज प्रक्रिया कशी याबद्दल सविस्तर माहिती लेखात दिली आहे.

तर ही होती पोस्ट ऑफिस अपघाती विमा संरक्षण योजना संबंधीची महत्त्वाची अशी माहिती. जर तुम्हाला या पोस्ट मुळे फायदा झाला असेल तर ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. 

अशाच महत्वाच्या माहिती साठी Agrobharti चा Free Whatsapp Group Join करा, जेणेकरून अशीच नव नवीन माहिती तुमच्या पर्यंत पोहचत राहील.

👇👇👇


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *