Rabbi Pik Vima 2022-23: शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पिक विमा भरला होता त्यांना आता पिक विमा मिळणार आहे. सरकार तर्फे शासन निर्णय जाहीर झालेला आहे. कोणते शेतकरी विम्या साठी पात्र ठरणार? कोणत्या शेतकऱ्यांना हा रब्बी हंगामासाठी विमा मिळणार? या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात तुम्हाला मिळेल.
शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत Rabbi Pik Vima Yojana साठी अर्ज भरला होता, महाराष्ट्रात 5 पीक विमा कंपन्यांद्वारे रब्बी हंगामासाठी पिक विमा योजना राबवली होती. रब्बी पिक विमा योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आणि कवच प्राप्त करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता, त्यासाठी आता शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार आहे.
रब्बी पीक विमा साठी अग्रिम स्वरूपात 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर
राज्य शासनाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पिक विमा वाटप व्हावा याकरिता 136 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी राज्यातील पीक विमा योजना राबवणाऱ्या पाच विमा कंपन्यांकडे देण्यात आला आहे. पीक विम्याचे वाटप हे पिक विमा कंपन्या द्वारे केले जाणार आहे, ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे आणि त्यांचे नुकसान झाले आहे; अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या द्वारे आता रब्बी हंगामाचा पिक विमा मिळणार आहे. लवकरच रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप सुरू होणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या रब्बी हंगामाचा पिक विमा देणार आहेत, हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट टाकला जाईल.
पिक विमा कंपनी राज्य शासन आणि केंद्र शासनाचा पिक विम्याचा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा देत असते. आता राज्य शासनाचा रब्बी हंगामासाठीचा हप्ता Pik Vima कंपन्यांना मिळाला आहे, त्यामुळे लवकरच रब्बी हंगामाचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळेल.
136 कोटी रब्बी अग्रिम पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?
शेतकरी बांधवांनो राज्य शासनाने जाहीर केलेला 136 कोटी अग्रीम पिक विमा निधी हा अग्रिम स्वरूपात, पिक विमा कंपन्यांना वाटप केला असून; राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक विम्याचा दावा केला आहे अशाच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळणार आहेत.
रब्बी पीक विमा वाटपाचा शासन निर्णय जाहीर
राज्य शासनाने शेतकऱ्यांना Rabbi Pik Vima वाटप करण्यासाठी, विमा कंपनीला 136 कोटी रुपयांचा अग्रीम निधी वितरित केला आहे. त्या संदर्भात शासन निर्णय काढून त्यास मंजुरी देखील दिली आहे. महाराष्ट्र शासनाचा Rabbi Pik Vima संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी, आम्ही खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे; तेथून तुम्ही शासन निर्णयाची PDF पाहू शकता आणि डाऊनलोड देखील करू शकता.
136 कोटी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय येथे पहा
ही महत्त्वाची अपडेट आहे, सर्व शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा.
आणि अशाच नवीन अपडेट साठी Agrobharti या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद, जय महाराष्ट्र!