Ration Card Update 2023: नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण रेशन कार्ड विषयी ची नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. या नव्या अपडेट नुसार आता राज्यातील अनेक लोकांचे रेशन कार्ड जप्त होणार आहेत. नवीन नियम लागू झाले आहेत, शासकीय अधिकाऱ्यांनी या संबंधी माहिती दिली आहे. तीच माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल, त्यामुळे Ration Card Update 2023 ही महत्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि जास्तीत जास्त शेअर करा.
रेशन कार्ड बंद होणार! नवीन अपडेट Ration Card Update 2023
Table of Contents
मित्रांनो कोरोना काळापासून केंद्र सरकारने देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप करणे सुरू केले होते. या मागील उद्देश गरीबांना मदत करने होता, परंतु या योजनेचा लाभ देशातील अपात्र लोकांनी घेतला असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने अपात्र लोकांचे रेशन कार्ड जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Ration Card Update 2023)
पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील अनेकांनी मोफत रेशनचा फायदा घेतला, यामुळे गरीब लोकांपर्यंत मोफत रेशन पोहचू शकले नाही. मोफत रेशनच्या लाभापासून गरीब लोक वंचित राहू नये, यासाठी शासनाने कठोर निर्णय घेतले आहेत.
हे पण वाचा: LPG Gas सिलेंडर स्वस्त होणार, सबसिडी योजना नव्याने सुरू
यानुसार आता जे लोक अपात्र होते आणि त्यांनी मोफत रेशनचा लाभ घेतला अशा सर्वांवर कारवाई होणार आहे परंतु त्या अगोदर त्यांना संधी देण्यात आली आहे, यामध्ये फक्त ज्या पात्र लोक आहेत त्यांनी स्वतःहून तहसील कार्यालयात जाऊन त्यांचे रेशन कार्ड जमा करायचे आहेत या संधीचा लाभ न घेता जर अपात्र व्यक्ती रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करत नसेल तर महसूल विभागाच्या तपासणी मध्ये अशा सर्व शिधापत्रिका धारकांवर कठोर करवाई केली जाणार आहे. {Ration Card Update 2023}
व्यक्तीचे रेशन कार्ड जप्त करण्या बरोबर त्या व्यक्तीला आर्थिक दंड लावण्यात येणार आहे. आणि आता पर्यंत देण्यात आलेले सर्व मोफत रेशन वसूल करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: मोबाईल वरून पेमेंट केल्यास Charges लागणार, नवे नियम 1 एप्रिल पासून लागू होणार
मोफत रेशन साठी कोणते शिधापत्रिका धारक अपात्र आहेत? Ration Card Update 2023
ज्या शिधापत्रिका धारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून घेतलेला शंभर चौरस मीटरचा प्लॉट किंवा घर असेल आणि चार चाकी गाडी ट्रॅक्टर शस्त्र परवाना सोबतच कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी दोन लाख तर शहरी भागासाठी तीन लाख रुपये पेक्षा जास्त असणारे असे सर्व लोक सरकारच्या मोफत रेशन योजनेसाठी अपात्र आहेत. [Ration Card Update 2023]
वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कोणत्याही एका निकषांमध्ये येत असाल तरीदेखील तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड सरेंडर करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाजवळील किंवा शहरा जवळील तहसील कार्यालयात जावे लागणार आहे आणि तिथे रेशन कार्ड सरेंडर संबंधीचा फॉर्म भरून तुमच्या रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करायचे आहे. {Ration Card Update 2023}
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा