आधार नसेल तरी होणार RTE प्रवेश, फॉर्म सुरू जाणून घ्या अर्ज प्रक्रिया | RTE Admission 2023-24 Maharashtra

मित्रांना शेअर करा:

RTE Admission 2023-24 Maharashtra – ‘आधार’ नसले, तरी होणार आरटीई प्रवेश आधारची पावती अनिवार्य; तीन महिन्यांचा अवधी मिळणार.

RTE Admission 2023-24 Maharashtra

Rte प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना शिक्षण विभागाद्वारे आधार कार्डची पावती असणे बंधनकारक केले आहे. ज्यांच्या कडे आधार नसेल त्यांना RTe मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. राज्य शिक्षण विभाग सचिव संतोष गायकवाड यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. यामुळे आता RTE प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

RTE Admission 2023-24 Maharashtra

Right to education या कायद्या अंतर्गत RTE प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. राखीव असलेल्या 25% जागांसाठीच ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे, आर्थिक दुर्बल आणि वंचित मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मंत्रालयीन शिक्षण विभागाकडून आधार कार्ड संदर्भात मार्गदर्शक सूचना मागवून घेतल्या होत्या. त्या नुसार शिक्षण विभाग सचिव संतोष गायकवाड यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जर पा आधार कार्ड नसेल तर त्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवू नये असे सांगण्यात आले आहे, या वर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेत आधार नंबर ऐवजी आधार कार्ड पावती चा समावेश करावा असे सुचवले आहे. यामुळे नक्कीच फायदा होणार आहे, ज्या लहान मुलांचे आधार त्यांचे पालक काढू शकले नाहीत अथवा अजून अधिकृत रित्या पोस्टाने आले नाहीत, ते आधार कार्ड काढताना देण्यात आलेली पावती सुध्दा प्रवेश प्रक्रियेत वापरू शकतात. 25% प्रवेश प्रक्रिया पार पडताना सांगितलेले सर्व निकष पूर्ण असणे अनिवार्य आहेत. “RTE Admission 2023-24 Maharashtra”

परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत आधार कार्ड किंवा त्यासाठीची पावती सादर करणे शक्य नसेल, तर अशा वेळी  पाल्याला तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येणार आहे. पण त्यासाठी सर्व अटी आणि तरतुदींचे पालन करने गरजेचे आहे, आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे आधार कार्ड 3 महिन्यांच्या आत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड संबंधी अशी शिथिलता दिल्या मुळे RTE प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचे आढळून येते आहे.

कोरोना प्रभावित विद्यार्थी वंचित गटात

वंचित प्रवर्गात RTE प्रवेश प्रक्रिये साठी कोरोना प्रभावित मुलांचा समावेश करण्यात आला आहे. दिनांक 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोरोना मुळे ज्या पाल्याच्या आई – वडिलांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, कोरोना मुळे मुर्त्यु झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, कोरोना शी संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले आहे. ‘RTE Admission 2023-24 Maharashtra’

RTE प्रवेश प्रक्रियेत 7 शाळा वाढल्या

RTE प्रवेश प्रक्रिये साठी यापूर्वी राज्यातील एकूण 8 हजार 820 शाळांची निवड करण्यात आली होती, मात्र आता यामध्ये तब्बल 7 शाळांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशासाठी एकूण जागा या पूर्वी 1 लाख 1 हजार 881 होत्या, सात शाळांची संख्या वाढवल्या मुळे आता विद्यार्थ्यांना अतिरिक्त 117 जागा उपलब्ध झाल्या आहेत. {RTE Admission 2023-24 Maharashtra}

आधार नसेल तरी होणार RTE प्रवेश

RTE प्रवेश प्रक्रिये संदर्भात वर ज्या मार्गदर्शक सूचना विभागाद्वारे देण्यात आल्या आहेत, त्यानुसार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यासाठी NIC मध्ये संबंधित पोर्टल चे टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यातच RTE प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने कामकाज सुरू देखील केले आहे. [RTE Admission 2023-24 Maharashtra]

RTE Admission 2023-24 Maharashtra Online Form Process (अर्ज प्रक्रिया)

अर्ज सुरु होण्याची तारीख01 मार्च, 2023
अर्जाची शेवटची तारीख17 मार्च, 2023
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
शासन निर्णय pdfडाउनलोड करा
 1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
 2. त्यानंतर तुम्हाला होम पेज वरील Online Application या लिंक वर क्लिक करायचे आहे.
 3. नवीन Tab उघडल्यावर तुम्हाला New Registration वर क्लिक करून Sign up करावे लागेल.
 4. Sign up process सोपी आहे, दाखवल्या प्रमाणे तुम्हाला माहिती भरून, तुम्हाला फक्त Register बटण वर क्लिक करायचे आहे.
 5. Register झाल्या नंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल, तो तुम्हाला अचूक भरायचा आहे.
 6. सर्व माहिती योग्य रीतीने भरल्या नंतर कागदपत्रे अपलोड करून पुढील process पूर्ण करायची आहे.
 7. अशा रीतीने तुम्ही महाराष्ट्र शासन सहायता प्राप्त शाळेंमध्ये 25% आरक्षणावर अर्ज सादर करू शकता.

महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

RTE Admission 2023-24 Maharashtra Documents (कागदपत्रे)

 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे)
 • कुटुंबाचा उत्त्पान्नाचा दाखला
 • दिव्यांग प्रमाणपत्र
 • जन्माचा दाखला
 • मुलाचे पालक घटस्पोटीत असल्यास
  • न्यायालयाचा निर्णय
  • आईचा रहीवासी पुरावा
 • बालक अनाथ असल्यास सांभाळ करत असतील त्यांचे हमीपत्र/ अनाथालयाचे कागदपत्रे (आवश्यक असल्यास)

अर्ज भरताना विभागाच्या आवश्यकते नुसार कागदपत्रे कमी जास्त होऊ शकतात, याची नोंद घ्यावी.

FAQ

RTE प्रवेश प्रक्रियेत 2023-24 साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत?

राखीव प्रवर्ग 25% जागा (आर्थिक दुर्बल, वंचित गटातील मुले)

RTE प्रवेश प्रक्रिया 2023-24 साठी एकूण जागा किती आहेत?

1,01,998 रिक्त जागा

RTE प्रवेश प्रक्रिये साठी आधार कार्ड बंधनकारक आहे का?

हो! अपवदात्मक 3 महिने सूट (आधार कार्ड नंबर, आधार कार्ड पावती आवश्यक)

हे पण वाचा:


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *