(फॉर्म PDF) संजय गांधी निराधार योजना 2023 – Sanjay Gandhi Niradhar Yojana

मित्रांना शेअर करा:

Sanjay Gandhi Niradhar Yojana: आज आम्ही तुम्हाला संजय गांधी निराधार योजना बद्दल या लेखामध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत. संजय गांधी निराधार पेन्शन योजना 2023 साठी लागणारे कागदपत्रे, लाभार्थी लिस्ट महाराष्ट्र, माहिती, अर्ज प्रक्रिया, हेल्पलाईन नंबर, अनुदान रक्कम, पात्रता निकष अशा महत्वाच्या बाबींवर मराठीत या आर्टिकल मध्ये माहिती मिळणार आहे; त्यामुळे कृपया लेख संपूर्ण वाचवा.

Join Our WhatsApp GroupClick Here
Join Our Telegram GroupClick Here
Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

Table of Contents

Sanjay Gandhi Niradhar Yojana हि मुळात वृद्ध व्यक्तींसाठी खास शासनाद्वारे बनवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाते, 65 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या निराधार व्यक्तींना सरकार या योजनेच्या माध्यमातून मदत करणार आहे. या योजनेसाठी पुरुष, महिला तसेच अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परिपक्वता महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला लाभार्थी बनू शकतात. आर्थिक सहाय्य करणे हा या योजने मागील मूळ उद्देश आहे, जेणेकरून अश्या निराधार गरजवंत लोकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतर लोकांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

संजय गांधी निराधार योजना 2023 Highlights

योजनेचे नावसंजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र (श्रावण बाळ पेन्शन योजना)
विभागन्याय व विशेष सहाय्य विभाग
योजनेची सुरुवात1980
योजना कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
उद्देशनिराधार गरजवंत व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे
लाभदर महिन्याला 1,200 रुपये आर्थिक मदत
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील स्त्री आणि पुरुष
अर्ज पद्धतीऑनलाईन / ऑफलाईन
सर्व सरकारी योजनापहा

संजय गांधी निराधार योजना उद्देश (objectives)

Sanjay Gandhi Niradhar Yojana purpose: संजय गांधी निराधार योजना म्हणजेच श्रावणबाळ पेन्शन योजना हि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बनवण्यात आलेली एक खास योजना आहे, या योजनेची सुरुवात हि केंद्र सरकारने 1980 साली केली होती. तेव्हा पासून या योजनेच्या माध्यमातून सरकारने नागरिकांना अर्थ सहाय्य केले आहे, संजय गांधी निराधार योजना उद्देश (objectives) विचारात घेतले असता या योजनेचा मुख्य उद्देश सामान्य निराधार गरजवंत नागरिकांना आर्थिक स्वरुपात मदत पुरवणे हं आहे. योजनेसाठी जे नागरिक पात्र आहेत त्यांना दर महा ठराविक राशी या योजनेच्या माध्यमातून अदा केली जाते हेच संजय गांधी निराधार योजनेचे एकमात्र उद्देश आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी (Beneficiary List)

Sanjay Gandhi Niradhar Pension Scheme beneficiary list: संजय गांधी निराधार योजना या शासनाच्या विशेष सहाय्य योजनेसाठी लाभार्थी कोण कोण होऊ शकतात याची लिस्ट खालील प्रमाणे.

  • अपंगातील अस्तिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री-पुरुष.
  • क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, प्रमस्तीष्कघात, एड्स (HIV+), कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतः चे दैनंदिन जीवन चालवू न शकणारे पुरुष व महिला.
  • अनाथ मुले (१८ वर्षाखालील).
  • निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला.
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी.
  • घटस्पोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.
  • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला (तृतीयपंथी)
  • देवदासी
  • 35 वर्षाखालील अविवाहित स्त्री

संजय गांधी निराधार योजना पात्रता निकष अटी (Eligibility Criteria)

Sanjay Gandhi Niradhar yojana Eligibility Criteria: संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना खाली दिलेल्या सर्व अटी शर्ती तसेच पात्रता निकष यांचे पालन करून त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा.
  • अर्जदाराचे नावे कोणतीही जमीन नसावी.
  • अर्जदार कमीत कमी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषे खाली असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची मुले 21 वर्षांची होतील तो पर्यंत किंवा त्यांना नोकरी लागेल तेव्हा पर्यंत लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळेल.
  • लाभार्थ्याना फक्त मुलीच असतील तर अशा लाभार्थ्याच्या बाबतीत मुलीचे वय 25 वर्षे झाले, अथवा त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचे लग्न झाले तरी सुध्दा योजनेचा लाभ पुढेही चालु राहील.
  • कुटुंबाचे एकूण उत्पन्न मुलाची पगार सर्व गोष्टी पाहून मदत राशी ठरवली जाईल.
  • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यासच लाभ मिळेल.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे (Documents)

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents: योजनेसाठी ज्या व्यक्तींना अर्ज करायचा आहे, त्यांना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे कोणती कोणती लागतात ते पुढीलप्रमाणे तुम्हाला पाहता येईल.

  • वयाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला/ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा.
  • अपंगत्व/ रोगग्रस्त बाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/ सरकारी हॉस्ल्च्य  रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला.
  • किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला.
संपूर्ण कागदपत्रे पाहण्यासाठीक्लिक करा
संजय गांधी निराधार योजना अर्ज (फॉर्म PDF)डाउनलोड करा

संजय गांधी निराधार योजना हेल्पलाईन नंबर (Helpline Number)

Sanjay Gandhi Niradhar Yojana Free Helpline Number : संजय गांधी निराधार योजनेसाठी अधिकृत रित्या न्याय व विशेष सहाय्य विभागाने टोल फ्री हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या हेल्पलाइन नंबर द्वारे अर्जदार आपल्या अडचणी दूर करू शकतो सोबतच, योजनेसंबंधी माहिती देखील या हेल्पलाइन नंबर वर तुम्हाला दिली जाईल.

टोल फ्री हेल्पलाईन नंबर1800-120-8040
वेबसाईट होम पेजक्लिक करा

संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Apply)

Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Application step by step guide : संजय गांधी निराधार योजना म्हणजेच श्रावण बाळ पेन्शन योजना साठी अर्जदारांना अर्ज करावयाचा आहे, त्यांना खालील पायऱ्यांचा वापर करणे गरजेचे आहे.

  • संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट जावे लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर व्हावे लागेल, त्यासाठी नवीन युजर या पर्यायावर क्लिक करा. नंतर सर्व माहिती टाकून आपली आयडी आणि पासवर्ड बनवून संकेतस्थळावर लॉगिन व्हा.
  • त्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या डाव्या बाजूला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असा option दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना या option वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला सांगितल्या प्रमाणे माहिती भरायची आहे.
  • फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती चुकीची आढळल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता असते, त्यामुळे माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे.
  • वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यानंतर अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जासाठी पेमेंट करायचे आहे रुपये 33 एवढे अर्ज शुल्क आहे.
  • पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे.
  • तुमचा अर्ज Verification साठी तहसील कार्यालयात जमा होईल.
  • परंतु जर 30 दिवसांनी देखील तुमचा अर्ज मंजूर झाला नाही, तर तुम्हाला स्वतः सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात जाऊन जमा करावी लागणार आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

संजय गांधी निराधार योजना बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

संजय गांधी निराधार योजना साठी लाभार्थी व्यक्तीला किती रुपये मदत राशी मिळते?

दर महिन्याला 1,500 रुपये

संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (लेखामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे)

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी वयाची मर्यादा काय आहे?

65 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *