या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी! 31 मार्च पर्यंत रक्कम बँक खात्यावर जमा होणार | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नव्याने सुरु

मित्रांना शेअर करा:

shetkari-karjmafi-yojana-maharashtra

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना: नमस्कार शेतकरी बांधवांनो! एक महत्त्वाची अपडेट आली आहे, शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. या संबंधीची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधासभेत दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी मंजूर, योजना नव्याने सुरू

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने ला पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बजट मध्ये या योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली होती, योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे मुख्यमंत्र्यांचा उद्देश होता परंतु त्यावेळी संपूर्ण शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नव्याने सुरू करून उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे.

अधिक माहिती जाणून घ्या: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

विधानसभा कामकाजामध्ये प्रश्न उत्तरांच्या तासात मंत्री अतुल सावे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे त्यांच्या माहितीनुसार 31 मार्च च्या अगोदर कर्जमाफी मिळणार आहे. योजनेतील पात्र शेतकऱ्यांना लवकरच अनुदान त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 28 हजार 464 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही, याबाबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नांची उत्तर देत असताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी कर्जमाफी संबंधीची मोठी घोषणा केली आहे.

प्रश्नाचे उत्तर देत असताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तीन टप्प्यांत राबविली आहे. आतापर्यंत दीड लाख कर्ज परतफेड योजना, वनटाइम सेटलमेंट आणि नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहनपर ही योजना राबविली गेली आहे.

या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थीना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत त्यांना मार्च 2023 अखेर अनुदान देण्यात येईल. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

म्हणजेच आता राज्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे सोबतच रक्कम देखील मिळणार आहे.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *