या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार! उद्या पासून खात्यात पैसे जमा होणार | Shetkari Nuksan Bharpai 2023

मित्रांना शेअर करा:

shetkari-nuksan-bharpai-2023

Shetkari Nuksan Bharpai 2023: नमस्कार मित्रांनो! एक महत्त्वाची अशी अपडेट आली आहे, राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली आहे. उद्यापासून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे. त्यासाठी शासन निर्णय देखील झालेला आहे, सोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी तब्बल 675 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही? व कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आहे, यासंबंधी माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये भेटेल आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी किती रुपये नुकसान भरपाई मिळणार? हे पण तुम्हाला कळेल त्यामुळे Shetkari Nuksan Bharpai 2023 ही पोस्ट संपूर्ण वाचा; आणि तुमच्या शेतकरी बांधवांना पण शेअर करा.

नुकसान भरपाई साठी मंजूर 10 जिल्ह्यांची यादी आणि जिल्हा निहाय निधी

  • पुणे : 42 कोटी 82 लाख रुपये
  • सांगली : 42 कोटी 25 लाख रुपये
  • कोल्हापूर : 03 कोटी 76 लाख रुपये
  • सोलापूर : 110 कोटी 56 लाख रुपये
  • सातारा : 17 कोटी रुपये
  • नाशिक : 89 कोटी 20 लाख रुपये
  • नंदुरबार : 06 लाख 68 हजार रुपये
  • धुळे : 51 कोटी 04 लाख रुपये
  • अहमदनगर : 290 कोटी 91 लाख रुपये
  • जळगाव : 27 कोटी 76 लाख रुपये

शेतकऱ्याला किती रुपये नुकसान भरपाई मिळणार?

कृषी क्षेत्रासाठी 13 हजार 600 रुपये प्रति
हेक्टर, बागायती क्षेत्रासाठी 27 हजार रुपये आणि
बारमाही क्षेत्रासाठी 36 हजार रुपये शासनाकडून सरसकट शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत. (Shetkari Nuksan Bharpai 2023)

हे पण वाचा: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना नव्याने सुरू, या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी!

तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी नुकसान भरपाई संबंधीची अपडेट. माहिती आवडली असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना {Shetkari Nuksan Bharpai 2023} पोस्ट नक्की शेअर करा, आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या Agrobharti वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *