नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; शिंदे सरकारचा मोठा निर्णय! यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? | Shetkari Nuksan Bharpai Maharashtra

मित्रांना शेअर करा:

Shetkari Nuksan Bharpai Maharashtra

Shetkari Nuksan Bharpai Maharashtra: मित्रांनो आज विधिमंडळामध्ये राज्य शासनाचा एक मोठा निर्णय झालेला आहे, मागील दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले; त्या नुकसानाची भरपाई राज्य सरकार करणार आहे. त्यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, विधिमंडळात हा प्रश्न विरोधी पक्षाद्वारे उचलून धरला गेला होता.

विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंना विधिमंडळात विधान केले होते, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे.

Shetkari Nuksan Bharpai Maharashtra – महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023

उद्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 जाहीर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणार आहे, त्यासंबंधी शासन निर्णय देखील उद्याच निघणार आहे; असा अंदाज आपण लावू शकतो.

जनतेचे बजेट महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023

त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नवीन योजना देखील शिंदे सरकार अमलात आणणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री स्वरूपात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. त्याच दृष्टीने त्यांनी मागील महिन्यात महाराष्ट्रातील जनतेकडून अर्थसंकल्पासाठी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना घेतल्या होत्या, त्या कल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 बनवला गेला आहे.

9 मार्च 2023 म्हणजेच उद्या हा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, अनेक कल्याणकारी योजना यामध्ये राबवल्या जाणार आहेत. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 हा विकासात्मक असणार आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींचा पूर्ण विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *