Shirur-Karjat Expressway :- पुण्याचा विचार केला तर हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असून एक औद्योगिक दृष्ट्या प्रगत असे शहर आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे शहर एक आयटी हब म्हणून देखील वेगाने विकसित झाले असून पुणे शहराच्या आजूबाजूचा परिसर हा कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील प्रगत आहे. जर आपण पुण्याचा विचार केला तर या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असून पुणेकर या समस्येमुळे खूप त्रस्त आहेत.
तसेच महत्वाचे म्हणजे इतर शहरांकडून दुसऱ्या शहराकडे जाणारी वाहतूक देखील बऱ्याचदा पुणे शहरातून जात असल्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरांमध्ये अनेक प्रकल्पांचे कामे सुरू असून यामध्ये पुणे रिंग रोड तसेच उड्डाणपुले आणि इतर महत्त्वाच्या उपाययोजना देखील करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये पुणेच नाही तर अनेक महत्त्वाच्या शहरांचा विकास व्हावा याकरिता या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी देखील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे अहमदनगर ते चाकण हा जो काही महामार्ग आहे यावरील होणारी ट्रॅफिक जॅमची समस्या सोडवण्यासाठी शिरूर- खेड- कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. याबद्दल आपण महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.
शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित
सार्वजनिक बांधकाम विभागाने अहमदनगर -पुणे-चाकण महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन महामार्ग प्रस्तावित केला असून यामुळे आता मराठवाडा या ठिकाणाहून मुंबईकडे जे काही वाहतूक येते ती आता शिरूर आणि खेड मार्गे थेट कर्जतला जाऊ शकणार आहे. त्यामुळे वेळेत व इंधनात बचत होणार असून पुणे शहरावरील जो काही वाहतुकीचा ताण आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.जर सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ या परिसरातील वाहनांना जर मुंबई किंवा ठाणे तसेच पिंपरी चिंचवड यासारख्या मोठ्या शहरांकडे जायचे असेल तर त्यांना शिरूर मार्गे चाकण आणि शिक्रापूर तसेच तळेगाव या मार्गे जायला लागते.
परंतु मधल्या मार्गामध्ये रांजणगाव आणि चाकण येथील एमआयडीसी असल्यामुळे अहमदनगर रस्त्यावर कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. ही समस्या मिटावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन महत्त्वाच्या प्रस्तावांचा विचार करण्यात आला होता. यामधील पहिला प्रस्ताव म्हणजे वाघोली ते शिरूर यादरम्यान उड्डाणपूल तयार करणे व दुसरा प्रस्ताव म्हणजे शिरूर मार्गे रस्ता तयार करणे हा होय. यामध्ये दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यात आला व त्याप्रमाणे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला हा प्रस्ताव सादर केला आहे.
कसे राहील या महामार्गाचे स्वरूप?
हा राज्यमार्ग 140 किलोमीटरचा प्रस्तावित असणारा असून हा मावळ तसेच खेड व शिरूर तालुक्यामधून जाणार आहे. एकंदरीत विचार केला तर मावळ तालुक्यातून या राज्य मार्गाचे अंतर 22 किलोमीटर, खेड तालुक्यातील 72 किलोमीटर आणि शिरूर तालुक्यामधील अंतर पकडून असे एकूण 140 किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे. हा रस्ता बांधताना दहा मीटरने या रस्त्याची रुंदी पूर्ण करण्यात येणार आहे व भविष्यामध्ये जर गरज पडली तर या दृष्टिकोनातून 45 मीटर रुंदीने रस्त्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे.
म्हणजेच भविष्यामध्ये दहा मीटर वरून 45 मीटर पर्यंत हा रस्ता वाढवता येणार आहे. या मार्गाच्या भूसंपादन आणि बांधण्यासाठी सुमारे 12000 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती देखील सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली आहे. हा मार्ग शिरूर- पाबळ-राजगुरुनगर (खेड)- शिरवली मार्गे पाईट- वांद्रे- कर्जत असा सुमारे 140 किलोमीटरचा प्रस्तावित करण्यात आला आहे. पुढे कर्जत वरून हा पनवेल-उरणला कनेक्ट केला जाणार असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
या दोन टप्प्यात पूर्ण केले जाईल या महामार्गाचे काम
हा प्रस्तावित महामार्ग दोन टप्प्यात बांधला जाणार असून यातील पहिला टप्पा हा 60 किलोमीटरचा चौपदरी असणार असून दुसऱ्या टप्प्यात उरलेले 80 किलोमीटरच्या बांधकामाचा समावेश असणार आहे. हा महामार्ग प्रकल्प रस्ते कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे तसेच ज्या शहरांमधून जाणार आहे ती शहरे आणि परिसरातील व्यापार आणि कृषी क्षेत्राला देखील एक मोठा दिलासा मिळणार आहे.
या बायपास मुळे आता पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर तीस मिनिटांनी झाले कमी
पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वपूर्ण शहरे असून या दोन शहरांमध्ये अंतर 212 किलोमीटरच्या असून हे अंतर पूर्ण करण्यासाठी साडेचार तासांचा वेळ लागतो. परंतु आता पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या महामार्गावर खेड म्हणजेच राजगुरुनगर येथील 4.9km चा बायपास नुकताच वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे पुणे आणि नाशिक या दोन शहरातील अंतर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे पुणे शहराचा विचार केला तर शहरातील सिंहगड रस्ता ते कर्वेनगर आणि कोथरूड येथे जि ट्रॅफिकची समस्या येते ती दूर व्हावी याकरता एन एच ए आय च्या माध्यमातून पुण्यात दोन नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. यातील सन सिटी ते कर्वेनगर दरम्यानच्या फुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून यासाठीचे निविदा प्रक्रिया देखील राबवले जाण्याची शक्यता आहे.