Top 10 DJ Sound System in Maharashtra : हे आहेत महाराष्ट्रातील टॉप १० DJ Sound System !

मित्रांना शेअर करा:

महाराष्ट्र तसेच आपला भारत देश हा वेगवेगळ्या सण उत्सवासाठी, तसेच मैफिली साठी ओळखला जातो. या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये साऊंड सिस्टीम ही एक प्रमुख आकर्षण बिंदू असते. त्यामुळेच मागील काही वर्षापासून ध्वनी प्रणाली क्षेत्रात व्यवसाय वाढीस लागले आहेत.

महाराष्ट्र मध्ये पण या प्रकारचे ध्वनी उपकरणे कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. राज्यातील सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच गणेशोत्सव मध्ये पण, ध्वनी प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. महाराष्ट्र मध्ये अत्याधुनिक ध्वनी प्रणाली उपलब्ध आहेत, यामध्ये High Quality Sound System आहेत. कार्यक्रमांना शक्य तितका चांगल्या दर्जाचा Audio अनुभव करून देण्यासाठी, डिझाईन आणि सेटअप यांसारख्या अतिरिक्त सेवा देखील याद्वारे दिल्या जातात.

Top Sound System in Maharashtra 2023

महाराष्ट्र मधील Top 10 साऊंड सिस्टिम विषयी, आज आपण माहिती घेणार आहोत. DJ म्हणजे नक्की काय असत, या बद्दल पण आम्ही तुम्हाला यात सविस्तर माहिती देऊ.

DJ Sound System म्हणजे नक्की काय:

DJ Sound System ही मुळात 4 पार्ट द्वारे बनते, त्यामध्ये Input, Process, Amplify, Output हे ते चार पार्ट आहेत.

1) Input: ज्या सोर्स माध्यमातून आपण गाणे चालवतो, त्याच्या सोर्सला Input असे म्हणतात.

2) Process: प्रोसेस मध्ये मिक्सर, इक्वलायझर आणि प्रोसेसिंग युनिट या गोष्टींचा समावेश असतो.

3) Amplify: यामध्ये छोट्याशा ऑडिओ ला ऍम्प्लिफिकेशन च्या मदतीने मोठे केले जाते. यामध्ये मिक्सर च्या माध्यमातून कार्य पार पाडले जाते.

4) Output: याद्वारे प्रत्यक्षरीत्या Sound बाहेर निघतो, यामध्ये मुख्य रूपाने स्पीकर चा वापर केला जातो.

महाराष्ट्रातील Top 10 DJ Sound System पुढीप्रमाणे:

1] Mauli DJ & Sound System 

माऊली डीजे साऊंड सिस्टिम ही मुळात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. महाराष्ट्रातील सर्वात उत्तम डीजे साऊंड सिस्टिम मध्ये माऊली डीजे आणि साऊंड सिस्टिम येते. या साऊंड सिस्टिम द्वारे निघणारा ध्वनी अत्यंत उच्च प्रतीचा असतो, त्यामुळेच या साऊंड सिस्टिम ला महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी भाड्याने घेतले जाते. डीजे साऊंड सिस्टिम स्वतंत्ररित्या खरेदी करणे खूप महागात पडते, म्हणून राज्यात लोक साऊंड सिस्टिम हे भाडे तत्त्वावर घेणे आधीक पसंत करतात.

2] SK Sound System 

SK साऊंड सिस्टिम ही पुण्यामधील सर्वात प्रसिद्ध असलेली साऊंड सिस्टिम आहे. मुळात ही साऊंड सिस्टिम पुण्यामधील चिंचवड पूर्व भागातील आहे. या साऊंड सिस्टिमचा देखील वापर पुण्यामधील बऱ्याचशा कार्यक्रमात केला जातो. माऊली डीजे अँड साऊंड सिस्टिम प्रमाणे एस के साऊंड सिस्टिम ची ऑडिओ क्वालिटी अप्रतिम आहे.

एस के साऊंड सिस्टिम ची सुरुवात 2018 मध्ये पुण्यामध्ये करण्यात आली, याची आणखी खास बात म्हणजे एस के साऊंड सिस्टिम द्वारे कार्यक्रमासाठी होम डिलिव्हरी सुविधा देखील देण्यात येते.

3] Athrv Digital DJ Sound System 

अथर्व डिजिटल डीजे साऊंड सिस्टिम पुण्यामधीलच आणखीन एक प्रसिद्ध साऊंड सिस्टिम आहे. ही साऊंड सिस्टिम पुण्यामधील कामठे आळी, गणपती मंदिरासमोर फुरसुंगी येथे आहे. अथर्व डिजिटल डीजे साऊंड सिस्टिम द्वारे वेगवेगळ्या साऊंड सिस्टिम भाडेतत्त्वावर दिल्या जातात.

4] Pailvan Series 

सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे पैलवान सिरीज साऊंड सिस्टिम ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम साऊंड सिस्टिम च्या यादीतील एक साऊंड सिस्टिम आहे. या साऊंड सिस्टिम द्वारे देखील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रणाली भाडे तत्त्वावर दिले जाते.

5] Jay Ganesh 76 

पुणे हडपसर मधील जय गणेश साऊंड सिस्टिम ही देखील सर्वोत्तम साऊंड सिस्टिम च्या यादीतील एक सुप्रसिद्ध अशी साऊंड सिस्टीम आहे. जय गणेश साऊंड सिस्टिम पुण्यामधील हडपसर येथील लोणी काळभोर, कावडी पथ टोल नाका येथे आहे. तुम्ही ही साऊंड सिस्टिम भाडेतत्त्वावर देखील कार्यक्रमासाठी घेऊ शकता.

6] Shrimant Balaaji Electricles & Sound 

श्रीमंत बालाजी इलेक्ट्रिकल्स आणि साऊंड सिस्टिम पुण्यामधील बुधवार पेठ येथे उपलब्ध आहे. तुम्ही येथे साऊंड सिस्टिम भाड्यावर घेऊ शकता, सोबतच साऊंड सिस्टिम भाडेतत्वावर घेण्यासाठी तुम्ही अगोदर नोंदणी देखील करू शकता.

7] Ambika DJ Sound System 

अंबिका डीजे साऊंड सिस्टिम पुण्यामधील थेरूर चिंतामणी मंदिराजवळ आहे. अंबिका डीजे साऊंड सिस्टिम द्वारे दोन्ही प्रणाली भाड्यावर दिली जाते, सोबतच साऊंड सिस्टिम वेडिंग डेकोरेशन यांसारख्या सुविधा देखील अंबिका डीजे साऊंड सिस्टिम द्वारे दिला जातो.

8] Jay Hanuman DJ Sound System

जय हनुमान डीजे साऊंड सिस्टिम हे छत्रपती संभाजी नगर मधील आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये फुलंद्री येथे तुम्हाला जय हनुमान डीजे साऊंड सिस्टिम मिळू शकते. तुम्ही ही साऊंड सिस्टिम भाड्यावर देखील घेऊ शकता, एका अतिशय सुप्रसिद्ध अशी साऊंड सिस्टिम आहे.

9] Sanyog Sound System

संयोग साऊंड सिस्टिम पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध असे साऊंड सिस्टम आहे. साऊंड सिस्टिम ला डॉन नंबर 1 असे देखील म्हणतात, हे साऊंड सिस्टिम तुम्ही पुण्यामध्ये मांजरी बुद्रुक येथे पाहू शकता.

10] Omkar 72 

ओमकार डीजे साऊंड सिस्टिम पुण्यामधील एक नंबरची साऊंड सिस्टीम आहे, ही साऊंड सिस्टिम तुम्ही पुण्यामधील मोहम्मद वाडी येथे पाहू शकता. सोबतच या साऊंड सिस्टिम ला तुम्ही भाड्यावर देखील घेऊ शकता.

तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रामधील टॉप 10 साऊंड सिस्टिम, मला आशा आहे तुम्हाला ची माहिती आवडली असेल. अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *